HSRP Number Plate Maharashtra : सर्व गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणे आता बंधनकारक

HSRP Number Plate Maharashtra : HSRP नंबर प्लेट नेमकी काय? कोणत्या गाड्यांच्या नंबर प्लेट बदलणार? - 

राज्य सरकारकडून HSRP Number Plate अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट हे बंधनकारक करण्यात आलेले आहेत 30 जून 2025 नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते नक्की HSRP Number Plate नंबर प्लेट कशी असणार आहे ही नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलून मिळणार आहे यासाठी किती खर्च आहे आणि जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड आपल्यावर होऊ शकतं हे यामध्ये आपण बघणार आहे.


ह्या HSRP Number Plate ची खासियत म्हणजे  ह्या नंबर प्लेटला एक युनिक पिन नंबर असतो फ्रंट नंबर प्लेटला हा युनिट पिन नंबर असतो तसेच सेम बॅक नंबर प्लेटला देखील एक युनिट पिन नंबर असतो.ह्या पिन नंबरची एंट्री वाहन प्रणालीमध्ये ज्याप्रमाणे चाशिस नंबर ,इंजिन नंबरची एंट्री असते त्याप्रमाणे या पिन नंबरची देखील वाहन प्रणालीमध्ये एंट्री असते आपण या नंबर प्लेटच्या पिन नंबर वरून देखील वाहनाच्या डिटेल्स काढू शकतो. दुसरी गोष्ट या नंबर प्लेटला जे स्क्रूज लावलेले असतात ते आपल्या की स्क्रू सारखे नसतात. हे स्क्रू काढून पुन्हा फिट करता येत नाही त्याच्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे यासारख्या गोष्टींना आळा बसू शकतो.

सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून त्याचा काय फायदा होणार आहे थेट कारवाई करणं हे सोपं होणार आहे आरटीओ विभागाला या नंबर प्लेटची विजिबिलिटी आणि रिफ्लेक्टिव्हिटी तुलनेनं चांगली आहे त्याच्यामुळे आयटीएमएस प्रणाली असेल किंवा जे आपण स्पीड चलान वगैरे देतो त्यामध्ये ह्या नंबर प्लेट स्पष्टपणे कॅप्चर होतात म्हणजे लवकर डिटेक्ट होतात. 


HSRP Number Plate Maharashtra नंबर प्लेट कोणत्या गाड्यांना हवी आहे ?

1/4/2019 नंतर उत्पादित आणि वितरीत झालेल्या वाहनांना यापूर्वीच केंद्र शासनाने HSRP Number Plate बंधनकारक केलेली आहे. आणि सर्व वाहनांना ते HSRP Number Plate बसूनच वाहने ताब्यात देतात जे 01/04/2019 च्या आधीची वाहने आहेत ,अशा सर्व वाहनांना 30/07/2025 पूर्वी नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने कंपलसरी केलेला आहे. त्या मुदतीनंतर जर कोणी त्या मुदतीच्या आतमध्ये जर कोणी वाहनांना HSRP Number Plate बसवली नाही तर त्या वाहनांचे कोणतेही ट्रांजेक्शन वाहन प्रणाली वरती होणार नाही तसेच रस्त्यावरती असं वाहन विदाऊट एचएसआरपी नंबर प्लेट जर आढळून आले  तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल 

2019 पूर्वी नोंदणी झालेलं कोणतही वाहन असेल ते 2015 असो 1990 असो 2000 असो अशा सर्व वाहनांना सर्व प्रकारच्या वाहनांना  HSRP Number Plate बंधनकारक आहे त्या HSRP Number Plate शासनाने निर्धारित केलेले दर मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी ₹450 रुपये थ्री व्हीलर साठी ₹500 रुपये आणि इतर सर्व वाहनांसाठी 745 रुपये आहेत एक्सक्लुडिंग जीएसटी.

 

HSRP Number Plate नंबर प्लेट कुठे मिळणार ?

सर्व नागरिकांनी घर बसल्या https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने  HSRP Number Plate बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्याच्यामध्ये फिटमेंट सेंटरची लिस्ट येते आपल्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करायचं आपल्या अपॉइंटमेंटच्या तारखेच्या दिवशी आपण तिथे गेले तिथे वेंडर्स आपल्याला नंबर प्लेट बसवून त्याची वाहन प्रणालीमध्ये नोंद करतील शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणी नंबर प्लेट बदलून घेऊ नये. HSRP Number Plate सारखी दिसणारे नंबर नंबर प्लेट बसवू नये त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची एंट्री वाहन प्रणालीमध्ये होणार नाही आणि वाहन प्रणालीमध्ये आपल्या वाहनाला HSRP Number Plate पेंडिंग आहे असंच दिसेल. जे रजिस्टर जे वेंडर्स शासनाकडून म्हणजेच त्यांना देण्यात आलेले आहेत तेच वेंडर कडून फक्त ही चालणार आहे.


HSRP नंबर प्लेटची किंमत काय?

  1. मोटर सायकल – 450 रुपये + जीएसटी
  2. ट्रॅक्टरसाठी – 450 रुपये + जीएसटी
  3. थ्री व्हीलरसाठी – 500 रुपये + जीएसटी
  4. फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी – 745 रुपये + जीएसटी

HSRP Number Plate साठी  किती वेंडर्स आहेत ?

शासनाने संपूर्ण महाराष्ट्राच्या तीन झोनमध्ये वर्गीकरण केलेलं आहे .ऑनलाइन फॉर्म संबंधी पूर्ण डिटेल्स त्यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सिस्टीम  सर्व त्यांच्या संकेत स्थळावरती सर्व माहिती उपलब्ध आहे. मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी 450 रुपये एक्सक्लूडिंग जीएसटी थ्री व्हीलर साठी 500 रुपये आणि उर्वरित सर्व वाहनांसाठी 745 रुपये एवढा दर शासनाने निश्चित केलेला आहे. जे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही बंधनकारक असणार आहे सर्व वाहनांना अर्थात रस्त्यावर कुठलंही वाहन असलं तरी या सर्व वाहनांना आता अशा पद्धतीच्या नंबर प्लेट्स हे बंधनकारक असणार आहेत. जर 30 जून 2025 नंतर नंतर अशी HSRP Number Plate नसेल तर काय कारवाई होऊ शकते.दंड त्याला भरावं लागू शकतो.


एखाद्या म्हणजे वाहन मालकाला शासनाने सध्या 30 जून 2025 ही HSRP Number Plate बदलून देण्यासाठीची तारीख दिलेली आहे ती मुदत संपल्यानंतर असे वाहनधारक जर रस्त्यावरती आढळले तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्या व्यतिरिक्त असे वाहनधारकांचं कोणतही त्या वाहनाचं ट्रांजेक्शन, त्यांचं ट्रान्सफर, ओनरशिप असेल, वाहन हस्तांतरण ,वाहनाचं डुप्लिकेट असेल ,ते असेल चेंज ऑफ ऍड्रेस असेल किंवा इतर कोणतेही ट्रान्सक्शन असेल, तर ते होणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये आपल्या वाहनांची नंबर प्लेट बदलून घ्यावी.डेट कदाचित वाढू शकते पण मुदतीबाबतचा निर्णय शासन स्तरावरती होईल पण आपण सर्वांनी वेळेत नंबर प्लेट बदलून घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन फिटमेंट सेंटर वरती जाऊन एचएसआरपी नंबर प्लेट बदलून घ्यावी.

HSRP Number Plate Maharashtra राज्यसरकारचा निर्णय

शासनाकडून जे नवीन आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार HSRP Number Plate हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं हे देखील बंधनकारक असणार आहे आणि याचे देखील अनेक फायदे आहेत वाहन चोरीला जाणार नाही नियमांचे उल्लंघन होत असेल तर सहजतेने याच्यावर कारवाई करता येऊ शकते आणि अशीच कुणीही फॅन्सी नंबर प्लेट या या ठिकाणी बसू नये हीच नंबर प्लेट या ठिकाणी आता यापुढे बंधनकारक असणारे असं देखील आरटीओ च्या या अधिकाऱ्यांकडून आणि राज्य शासनाकडून जे नियमावली या ठिकाणी देण्यात आली आहे त्याच्यामध्ये ही बंधनकारक असणार आहे.


HSRP Number Plate Maharashtra online अर्ज कुठे करावा

 HSRP Number Plate Maharashtra साठी अर्ज कण्यासाठी सरकारने महाराष्ट्र राज्याचे तीन झोन मध्ये वर्गीकरण केले आहेत.त्यामुळे झोन नुसार सर्वांना नियुक्त केलेल्या कंपनी कडून HSRP Number Plate तुम्हाला मिळेल.

अर्ज करण्यासाठी CLICK HERE

Previous Post Next Post