सरकार चे हे महत्वाचे 10 कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे 10 important government cards


सरकार चे हे महत्वाचे 10 कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे  10 important government cards

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरपूर प्रकारच्या योजना राबवत असतं आणि याच योजनेअंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड सुद्धा मिळालेले असतील, तर आज आपण यामध्ये दहा असे कार्ड तुम्हाला सांगणार आहेत की ते कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचे आहे आणि जर ते कार्ड तुमच्याकडे नसतील. तर ते कार्ड कशा पद्धतीने तुम्ही काढायचं आहे ते सुद्धा मी या मध्ये सांगणार आहे. 10 कार्ड कोणकोणते आहेत ते कसे काढायचं संपूर्ण माहिती  घेऊयात.


1. आभा कार्ड (ABHA CARD )

मित्रांनो सर्वात पहिलं जे कार्ड आहे ते म्हणजे आभा कार्ड (Abha card) आता हे आभा कार्डचा उपयोग काय आहे फायदा काय आहे ते सांगतो Abha card  म्हणजेच एखाद्या हॉस्पिटल मध्ये जर तुम्ही गेला आणि हे आभा कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची जी काही माहिती आहे ती डिजिटल स्टोअर होईल. तुम्ही एक्सरे स्कॅन केला ,असेल कुठे सोनोग्राफी केली असेल किंवा तुम्ही चिठ्ठी दिली असेल तर अशा प्रकारे तुमची आरोग्याची माहिती त्यामध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे. या Abha card मध्ये आता एका हॉस्पिटल मधून जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणता आजार झाला होता, तुमची अशीच जी काही माहिती आहे ती या आभा कार्ड मध्ये असणार आहे. आणि त्यासाठी हे आभा कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतं.

हे देखील वाचा »  HSRP Number Plate Maharashtra : सर्व गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणे आता बंधनकारक

2. आयुष्यमान कार्ड (Ayushman Bharat Card Golden Card)

आयुष्मान भारत ही जी योजना आहे. केंद्र शासनाची आयुष्मान आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्याची तर या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही जे काही हॉस्पिटलची लिस्ट आहे ,त्यापैकी एका हॉस्पिटलमध्ये तुमच्या शेजारच्या जाऊन पाच लाखापर्यंत तुमचा मोफत उपचार होणार आहे. तुमचे मोठे मोठे आजार कव्हर होतील ऑपरेशन असतील ऑपरेशन सुद्धा कव्हर होतील.पाच लाखापर्यंत तुमचे उपचार होतील इथे तुम्हाला कोणताही एक रुपया द्यायची गरज लागणार नाही. तर लक्षात ठेवा हे कार्ड तुम्ही वेबसाईटवर जाऊन काढू शकता ते कार्ड वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे.हे कार्ड तुम्हाला जर काढायचं असेल तर CSC केंद्रामधून काढून मिळेल.हे कार्ड तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या.

हे देखील वाचा »  फार्मर आय डी असेल तरच मिळेल PM-KISAN चा हप्ता असा काढा फार्मर आयडी

3. फार्मर आयडी कार्ड ( Farmer ID Card)

शेतकऱ्यांसाठी एक फार्मर आयडी कार्ड Farmer ID card आता नवीन आलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना आपली नोंदणी करायची आहे. Farmer ID कार्डचा फायदा काय होईल तर अनेक जे काही योजना येणार आहेत, शेतकऱ्यांसाठी त्या योजनेसाठी हे फार्मर आयडी शेतकऱ्यांना लागणार आहे. आणि त्यासाठीच हे Farmer ID card काढणं गरजेचे आहे. फार्मर आयडी कार्ड कोणत्या वेबसाईट वरून काढायचं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हे कार्ड तुम्हाला जर काढायचं असेल तर CSC केंद्रामधून काढून मिळेल.हे कार्ड तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या.

4. रेशन कार्ड ( Ration Card )

आता रेशन कार्ड स्मार्ट रेशन कार्ड ( Ration Card) आलेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून स्मार्ट रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता आता हे स्मार्ट रेशन कार्ड ( Ration Card) आपलं जसं आधार कार्ड आहे तशाच पद्धतीने स्मार्ट एक डिजिटल रेशन कार्ड आलेला आहे ते तुम्ही डाऊनलोड करून एखाद्या सायबर कॅफे मधून तुम्ही ते जाऊन बनवून घेऊ शकता हे रेशन कार्ड तुम्हाला कधीही कुठेही उपयोगी पडेल. आपलं रेशन कार्ड Mera Ration हे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामधून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

हे देखील वाचा »  सर्व शेतकर्‍यांना मिळणार कृषि सौरपंप ,मागेल त्याला सौरपंप

5. श्रमयोगी मानधन कार्ड (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana)

श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana)आता ही श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे. तर या योजने अंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते. परंतु या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला यामध्ये 18 ते 40 वयोगटामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचे महिन्याला तुमच्या अकाउंट मधून थोडेफार पैसे कट होतील आणि तुमचं जेव्हा 60 वर्ष कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन चालू होईल. हे आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड आहे. Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana हे कार्ड तुम्हाला जर काढायचं असेल तर CSC केंद्रामधून काढून मिळेल.हे कार्ड तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या.

हे देखील वाचा »  बांधकाम कामगाराला मिळतो सरकारच्या विविध योजनांचा लाभ

6. अपार आयडी कार्ड (Apaar ID)

Apaar ID कार्ड सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असं कार्ड आहे. Apaar ID त्यालाच आपण ABC ID सुद्धा म्हणतो. 12 वी नंतरचे जे काही विद्यार्थी असतील ते ऑनलाईन पद्धतीने Apaar ID कार्ड काढू शकतात. आता Apaar ID कार्ड याचा फायदा काय आहे, तर जी काही शैक्षणिक माहिती असेल आपली पहिली पासून बारावी पर्यंत बारावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत अशा प्रकारची जी काही  माहिती असेल, तुम्ही पास झालेला असाल ,फेल झालेला असाल ,तुमचं मार्कशीट असेल, तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल, सगळी माहिती त्या अप्पर आयडी मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे साठवली जाणार आहे. आणि ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. समजा एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं तर तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही कारण ते Apaar ID चा कार्डचा नंबर टाकला तर सगळी माहिती तिथे शिक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे Apaar ID सगळे विद्यार्थ्यांनी काढून घ्या. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतून काढून घ्या .कॉलेज मधून काढून घ्या. आणि जे काही 12 वी नंतरचे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन काढू शकता. त्याला ABC ID म्हणतात किंवा अपार आयडी सुद्धा म्हणू शकता. 

हे देखील वाचा »  महा-डीबीटी योजनेसाठी शेतकर्‍यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे

7. ई श्रम कार्ड (e-Shram Card)

ई श्रम कार्ड e-Shram Card याचा फायदा काय आहे भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे e-Shram Card  वरती कोणतेही पैसे मिळत नाहीत. येणाऱ्या काही नवीन योजना असतील तर ज्यांच्याकडे e-Shram Card  आहे ते त्यांना भेटतील. योजना आणि ई श्रम कार्डचा असा एक अजून एक फायदा आहे की आपला एक्सीडेंट झाला किंवा एक्सीडेंट ने मृत्यू झाला किंवा एक्सीडेंट ने अपंगत्व आलं तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतात. तर जे काही कामगार वगैरे लोक आहेत ते हे कार्ड काढू शकतात .जर तुम्ही आत्तापर्यंत काढलं नसेल तर ई श्रम कार्ड  e-Shram Card काढून घ्या. e-Shram Card काढायची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे .हे कार्ड तुम्हाला जर काढायचं असेल तर CSC केंद्रामधून काढून मिळेल.हे कार्ड तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या.

8. जॉब कार्ड ( Job Card)

आता जे कोणी छोटे कामगार असतील जे ग्रामपंचायत मध्ये छोटं मोठं काम करतात. म्हणजे ग्रामपंचायत मध्ये म्हणजे ग्रामपंचायत आहे त्यांच्या लेव्हलला आणि जे छोटे-मोठे काम करतात जे मनरेखा योजनेअंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी जॉब कार्ड असतं ते तुम्हाला ग्रामपंचायत मधून काढून मिळेल . मनरेगा म्हणजे जॉब कार्डचे भरपूर असे फायदे आहेत भरपूर अशा योजना आहेत जे की मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड वाल्यांना दिले जातात .तर जॉब कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही स्वतः काढू शकत नाही ते तुम्हाला ग्रामपंचायत मधूनच काढावं लागेल. जर तुम्ही कुठे काम करत असाल मनरेगा अंतर्गत तर आपल्या ग्रामपंचायत मधून हे मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड जे येतं ते काढून घ्या.

हे देखील वाचा »  नवीन रेशन कार्ड कसे बनवायचे -आवश्यक कागदपत्रे

9. इलेक्शन कार्ड ( Votor id Card )

इलेक्शन कार्ड त्यालाच आपण मतदान कार्ड किंवा Votor ID card कार्ड म्हणतो .तर आत्तापर्यंत आपण वोटर आयडी कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. इलेक्शन येत असतात मध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन येतील. तसेच आमदारकीचे झाले खासदारकीचे झाले .अशा इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला मतदान कार्ड Votor ID card अचानक लागतं आणि त्यावेळेस तुमच्याकडे काही नसतं. तर इलेक्शन कार्ड आत्तापर्यंत काढलं नसेल तर काढून घ्या. ज्यांचा 18 वर्ष पूर्ण झाले त्यांनी तर लगेच काढून घ्या. 

हे देखील वाचा »  महाराष्ट्र सरकारची कृषी यांत्रिकीकरण योजना -शेतकर्‍यांना अनुदान


10. किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card)

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आता भरपूर जण म्हणतात आम्ही ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड काढू शकतो का ? किसान क्रेडिट कार्डचा काय फायदा आहे ? तर सर्वात पहिल्यांदा Kisan Credit Card हे तुम्ही फक्त फक्त बँकेतून काढू शकता. तुम्ही ऑनलाईन काढू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याचा फायदा काय आहे तर ,तुम्हाला बँक एक क्रेडिट देते जे की तुम्ही ते वापरू शकता म्हणजेच लोन देते ते तुम्ही वापरू शकता त्याचं व्याज कमी असतं . किंवा आता नवीन जर बँकेचा नियम पाहिला तर बिनव्याजी कर्ज  सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर Kisan Credit Card तुम्ही बँकेमध्ये जाऊन भेट द्या आणि तिथे तुमचं काही डॉक्युमेंट्स असतील ते जमा करून किसान क्रेडिट कार्ड काढून घ्या. शेतकऱ्यांसाठी हे कार्ड सुद्धा महत्त्वाचं आहे.

तर अशाप्रकारे हे 10 कार्ड तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला कुठेही उपयोगी पडतील महत्त्वपूर्ण हा माहिती होती.



Previous Post Next Post