पडीक जमिनीत वैरण पिकवा आणि १०० टक्के अनुदान मिळवा

 

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत केंद्रीय पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जाते. यात वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी  शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाते. पाळीव जनावरांना सकस वैरण उपलब्ध व्हावे हा योजनेमागील उद्देश असून, त्यासाठी केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि उद्योजकता विकास करण्याचाही यामागे उद्देश असून, त्याचा चांगला सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण संशोधन आणि उत्पादकता यांचाही समावेश करण्यात आला आहे. यातून पडीक जमिनीचाही शेतकऱ्यांना उपयोग करून घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. विविध कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर छानणी होवून लाभार्थी निवड होते.


योजनेचे नाव राष्ट्रीय पशुधन अभियान योजना
राज्य महाराष्ट्र
विभाग पशुसंवर्धन विभाग
लाभार्थी शेतकरी वर्ग
लाभस्वरूप विविध घटकांसाठी आर्थिक सहाय्य
शासननिर्णय येथे पहा
अधिकृत वेबसाईट/अर्ज येथे पहा

काय आहे राष्ट्रीय पशुधन पशुधन अभियान ?

ग्रामीण भागात रोजगार निर्मिती उद्योजकता विकास प्रती पशु उत्पादकता वाढविणे आदी या योजनेचे उद्देश आहेत. असंघटित क्षेत्रामध्ये होणाऱ्या उत्पादनासाठी त्यांना संघटित क्षेत्राशी जोडणे हा या योजनेचा मूळ हेतू आहे.

हे देखील वाचा »  महाराष्ट्र सरकारची कृषी यांत्रिकीकरण योजना -शेतकर्‍यांना अनुदान

वैरण आणि खाद्य अभियानाचा लाभ कोणत्या जमिनीत
घेता येतो ?

वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र आणि पड़ीक जमिनीवर वैरण उत्पादन घेता येते. गुणवत्तापूर्ण वैरण बियाणे उत्पादनासाठी आणि पशु खाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते. यात बियाणे उत्पादनासाठी शंभर टक्के ते उद्योजकता विकासासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येते.

वैरण आणि खाद्य अभियान योजनेचे निकष काय?

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना hfipsy/nim.udyamimitra.inl या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. 
  2. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आलेल्या प्रस्तावांची जिल्हास्तरीय समितीमार्फत छाननी करण्यात येते.
  3. अर्जासोबत आधार कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. प्रकल्प अहवाल
  6. जमीन मालकी हक्क पुरावा
  7. आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.


वैरण आणि खाद्य अभियान योजना कोठे अर्ज करणार? 

राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाचे स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहे. वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे.

सन २०१४-१५ पासून देशात ही योजना केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, सन २०२१- २२ मध्ये त्यात काही बदलही करण्यात आले आहे. वैरण उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान या माध्यमातून मिळते. गरजू शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा असे आवाहन पशुसंर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. 



Previous Post Next Post