भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana फळबाग लागवड योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्प्या-टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत "जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी” फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. राज्यामध्ये ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांच्याकडे जॉबकार्ड नसल्याने ते ह्या योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र असेल.तसेच केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिने अधिक महत्वाची ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पिके व पशुधनासह शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांना फळबागांच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून हवामानातील बदल आणि हंगामी बदलांची तीव्रता आणि तीव्रता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana सहभागी होण्याची कार्यपद्धती :
- राज्य / जिल्हास्तरावरुन वर्तमानपत्रामध्ये दरवर्षी माहे एप्रिलमध्ये जाहीरात प्रसिद्ध करुन तसेच अन्य माध्यमाद्वारे पुरेशी प्रसिद्धी देऊन इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतील.
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जाहिरात दिनांकापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करने अनिवार्य आहे.
- योजनेअंतर्गत तालुक्यास दिलेल्या टारगेट पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास तालुकानिहाय लॉटरी पद्धतीने सोडत काढून लाभार्थी निवड करण्यात येईल.
- लाभार्थी निवडीसाठी लॉटरी सोडतीचे ठिकाण, दिनांक व वेळ हे सर्व तालुका कृषि अधिकारी आणि उपविभागीय कृषि अधिकारी हे निश्चित करतात.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
- तालुक्यास नेमून दिलेल्या अर्जं पेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास त्या तालुक्यासाठी पुन्हा वर्तमान पत्रात जाहीरात देवून ८ दिवसात अर्ज मागविले जातील. प्राप्त होणाऱ्या अर्जामूधन कागदपत्रे पूर्तता केलेल्या लाभार्थी निवड करण्यात येते.
- तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा संधी देऊनही कमी अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना त्या तालुक्याच्या शिल्लक निधीचे वाटप जिल्हयामधील अन्य तालुक्यांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात वाटप करण्याचे अधिकार राहतील.
- त्याचप्रमाणे जिल्हयाचा निधी शिल्लक राहत असल्यास विभागीय कृषि सहसंचालक यांनी प्रथमतः विभागातील अन्य जिल्हयास त्यांच्या मागणीच्या प्रमाणात शिल्लक निधीचे फेर वाटप करावे.
- फेरवाटपानंतर विभागातील तालुक्यातील निधी शिल्लक राहत असल्यास त्याचे कृषि आयुक्तालयस्तरावरुन मागणी असलेल्या अन्य विभागातील जिल्हयांना वाटप आयुक्त कृषि यांच्या मान्यतेने संचालक फलोत्पादन करतील.
- Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana योजनेत निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी २ दिवसात आवश्यक ती सर्व कागदपत्रे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना सादर करावीत.
- कागदपत्रे प्राप्त होताच लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली जाईल. तसेच लाभार्थ्यांची इच्छा असेल तर त्यांना शासकीय किंवा कृषि विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून कलमे / नारळ रोपे घेण्यासाठी करण्याचा परवाना देण्यात येतो..
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळाल्याच्या दिनांकापासून ७५ दिवसामध्ये सर्व अटींसह फळबागेची लागवड करणे शेतकर्याला आवश्यक राहील.
- पूर्वसंमती प्राप्त लाभार्थ्यांने शेतकर्याने ७५ दिवसामध्ये शेतात फळबागेची लागवड केली नाही तर त्याची पूर्वसंमती रद्द करून इतर शेतकर्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना क्षेत्र मर्यादा Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Area Limit
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हे. ते कमाल १०.०० हे. तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हे. ते कमाल ६.०० हे. क्षेत्र मर्यादा आहे.
- कमाल क्षेत्रमर्यादित लाभार्थी शेतकरीत्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.
- शेतकरी लाभधारकाचे ७/१२ च्या नोंदीनुसार, लाभार्थी जर संयुक्त खातेदार असेल तर संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरीता लाभ देण्यात येतो.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या (MREGS) योजनेचा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधन लाभ घेता येईल.
- लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रतेचे निकष Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Eligibility
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच म्हणजे ज्यांच्या नावावर ब्जमिन आहे त्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभाथ्र्यांना लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे. जर लाभार्थी शेतकर्याच्या ७/१२ उताऱ्यावर संयुक्त खातेदार असेल तर उतार्यावरील सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
- जमिन जर शेतकरी कुळ कायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्रदेखील आवश्यक असेल..
- सर्व प्रवर्गा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजिवीका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.
- प्राप्त झालेल्या अर्जामधून लाभार्थ्यांची निवड करताना अनुसूचित जाती/जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक,
- महिला, दिव्यांग व्यक्ती यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
- परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम, २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत लाभ मिळेल.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ देण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार नाही.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे
- जमिन तयार करणे.
- माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे.
- रासायनिक खत वापरून खड्डे भरणे.
- आंतर मशागत करणे.
- काटेरी झाडांचे कुंपण करणे. (ऐच्छिक)
शासन अनुदानीत कामे
- खड़े खोदणे,
- कलमे लागवड करणे. (नारळाच्या बाबतीत रोपे)
- पीक संरक्षण.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कलमा / रोपांचा पुरवठा :
- फळबाग लागवडीकरीता कलमे/नारळ रोपांची निवड लाभार्थ्याने स्वत: करावयाची असून त्यांनी खालीलप्रमाणे रोपवाटिकांना प्राधान्य द्यावे.
- कृषि विभागाच्या रोपवाटिका
- कृषि विद्यापिठांच्या रोपवाटिका
- राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका
- राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिकेतून पुरवठा करण्यात येणा-या कलमे/नारळ रोपांच्या दर्जाबाबत जबाबदारी संबंधित रोपवाटिका धारकांची राहील. रोपवाटिकांमधून कलमे/रोपांची गुणवत्ता तापासूनच भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना लाभार्थ्याने त्याची खरेदी करावी.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ठिबक सिंचन संच :
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थ्यास फळबाग लागवडीकरीता ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरीता १०० टक्के अनुदान द्यावयाचे आहे. त्या करिता ठिबक सिंचन संच उभारणीसाठी प्रचलित असलेल्या सर्व केंद्र व राज्य योजनांच्या निधीतून अनुज्ञेय असणारे अनुदान प्रथमतः अदा करावे आणि तदनंतर आवश्यक असल्यास भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या निधीतून उर्वरीत अनुदान अदा करावे.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
- फळबाग लागवडीसाठी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी ठिबक सिंचन संचाकरीता प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पिक योजने अंतर्गत पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्याकरीता ई-ठिबक प्रणालीवर अर्ज भरुन द्यावेत.
- सदर यादीस प्रथम प्राधान्याने पूर्वसंमती देण्यात यावी.भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेतील शेतकर्याला ठिबक सिंचन संच ७ वर्षापर्यंत त्याच शेतात कायम ठेवणे अनिवार्य राहील.
- कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता शेतकर्याला शेतातील माती परिक्षण करणे अनिवार्य राहील. माती परिक्षण शेतकऱ्याने स्वखर्चाने करावे...
- लाभार्थ्याने फळबाग लागवडीकरीता जमीन तयार करणे, माती व शेणखत/सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खत वापरुन खड्डे भरणे, आंतर मशागत करणे आणि काटेरी झाडांचे कुंपण करर्णे इत्यादी कामे पूर्ण करण्याची जबाबदारी राहील.
- लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी किमान ९० टक्के जगविणे आवश्यक राहील.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकर्याची जबाबदारी
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सहभाग घेणेकामी इच्छुक शेतकऱ्यांनी जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा.
- लाभार्थी निवडीसाठी सोडतीचे ठिकाण, दिनांक व वेळेनुसार उपस्थित रहावे.
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थ्यास फळबाग लागवडीकरीता ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
- तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत अदा केलेल्या परवान्यावर कलमा/ रोपांची उचल केल्यानंतर लागवड करणे आवश्यक आहे अन्यथा सदर कलमा/ रोपांची किंमत शासनास परत करण्याची जबाबदारी राहील. संबंधित लाभार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शासनाने निश्चित केलेली फळपिके, प्रजाती व लागवडीचे अंतर याचे निकष पाळणे बंधनकारक राहील आणि सदर बाबीचा भंग केल्यास संबंधित शेतकरी अनुदानास अपात्र राहील व त्यांनी परवान्यावर घेतलेल्या कलमा / रोपांची रक्कम संबंधित शेतकर्याला शासनास परत करावी लागेल नाहीतर शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळाल्याच्या दिनांकापासून ७५ दिवसामध्ये सर्व अटींसह फळबागेची लागवड करणे शेतकर्याला आवश्यक राहील.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana
- कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता शेतकर्याला शेतातील मातीचे परिक्षण स्वखर्चाने करावे अनिवार्य राहील.
- शेतकर्याने शेतात फळबाग लागवडीकरीता जमीन तयार करणे, माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खत वापरुन खड्डे भरणे,मशागत करणे व काटेरी झाडांचे कुंपण करणे ही सर्व कामे शेतकर्याला स्वखर्चाने करावे लागेल.
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी कमीत कमी ८० टक्के व दुसऱ्या वर्षी कमीत कमी ९० टक्के जगविणे आवश्यक राहील.