Aaple Sarkar Portal हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे एका पोर्टल अंतर्गत नागरिक-केंद्रित सेवा सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केले आहे. Aaple Sarkar Portal महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या अनेक विभाग आणि ऑफर केलेल्या सेवांबद्दल अनेक वैशिष्ट्ये आणि संबंधित माहिती प्रदान करते. या लेखात, आम्ही Aaple Sarkar Portal द्वारे ऑफर केलेल्या अनेक सेवांचा तपशीलवार विचार करतो. आपले सरकार एक सर्वसमावेशक वेबसाइट पोर्टल सर्व नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. Aaple Sarkar Seva Kendra मुळे सेवांसाठी अनेक सरकारी कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व सरकारी सेवा सर्वसमावेशक वेबसाइट पोर्टल तयार केले आहे त्यालाच आपले सरकार सेवा पोर्टल असे म्हणतात. आपले सरकार पोर्टलवर सर्व सरकारशी संबंधित विभाग उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्यात राहणारा प्रत्येक रहिवासी कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता आपले सरकार पोर्टल वेबसाइटवरून उत्पन्नाचा दाखला आणि सरकारच्या इतर सेवांचा लाभ घेऊ शकतो.
आपले सरकार पोर्टल हे राज्यातील रहिवाशांसाठी एक सोपे, पारदर्शक आणि सोयीस्कर वेबसाइट पोर्टल आहे. आपले सरकार हे सर्व विभागीय सेवांसाठी डिझाइन केलेले एक पोर्टल आहे. Apale Sarkar portal हे सर्व महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे ज्यांना सरकारी सेवांची आवश्यकता आहे. aaple sarkar पोर्टलचा उद्देश राज्याचा विकास, नागरिक सेवा पोर्टल आणि विविध योजना आणि सेवांसाठी वर्कफ्लो व्यवस्थापन आणि सामग्री व्यवस्थापन व्यासपीठ आहे.
आपले सरकार पोर्टलची वैशिष्ट्ये
- हे आपल सरकार पोर्टल विविध वैशिष्ट्यांची ऑफर देते ज्याचा राज्यातील रहिवाशांना लाभ घेता येईल. Aaple Sarkar Seva Kendra
- नागरिक कोठूनही, कधीही त्यांचा अर्ज ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि सबमिट करू शकतात.
- Application Track मॉड्यूलमध्ये Application ID प्रविष्ट करून नागरिक त्यांच्या अर्जाची स्थिती सत्यापित करू शकतात किंवा ट्रॅक करू शकतात.
- सुलभ पारदर्शकता आणि पडताळणीसाठी सहाय्यक कागदपत्रे अपलोड करणे.
- अर्जदारांना अर्ज प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर ई-मेल किंवा एसएमएस सूचना प्राप्त होतील.
- नोंदणीकृत अर्जदारांना आधार लिंक केलेले बँक खाते थेट लाभ.
- भूमिकेवर आधारित लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणार्या प्राधिकरणासाठी विनंती केलेल्या सर्व अर्जांना सहज मंजूरी.
- राज्य सरकारच्या विभागाकडून किंवा दोन्हीकडून शिष्यवृत्तीच्या देखरेखीत पारदर्शकता.
आपले सरकार सेवा केंद्र साठी कागदपत्रे:-
- सेतु मिळविण्यासाठीचा अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- संगणकीय प्रमाणपत्र - MSCIT/CCC/OTHER
- शैक्षणिक पात्रता - १२ वी / त्यापेक्षा जास्त
- Csc सेंटर असल्यास त्या संबंधी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाण पत्र (असल्यास)
- अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
ज्यांच्याकडे आधीपासूनच CSC आयडी आहे त्यांना Aaple Sarkar Seva Kendra मिळवण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडून प्राधान्य देण्यात येत असते, आणि त्यांना Aaple Sarkar Seva Kendra अर्जासोबत csc सेंटर असल्याचे प्रमाणपत्र जोडायचे असते . जर अर्जदार अपंग असेल तर त्यांना अधिक प्राधान्य देण्यात येत असते परंतु अपंगत्व हे ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याची पद्धत How to Get Apale Sarkar sewa kendra
मित्रांनो जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळवायचे असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा जिल्हा सेतू समिती मार्फत Aaple Sarkar Seva Kendra साठी जागा(vacancy) निघत असतात.Mahaonline registration त्यावेळेस आपल्याला संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईट वर जाऊन vacancy निघाल्या का नाही हे पहायच्या असतात आणि निघाल्या असेल तर तुम्हालातिथे दिलेला सेतु अर्ज फॉर्म डाऊनलोड करायचा असतो.जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट माहित नसेल तर Google च्या search बॉक्स मध्ये तुमच्या District चे नाव व समोर Website असे टाईप करून सर्च केल्यावर तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट मिळेल.
सूचना - काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र मिळविण्यासाठी फॉर्म भरले जातात.ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रत व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावे लागतात.
आपले सरकार सेवा केंद्र कसे घ्यावे
Aaple Sarkar Seva Kendra अटी व शर्ती खालील प्रमाणे.
१.तुम्हाला जर Aaple Sarkar Seva Kendra ज्या ठिकाणी मंजूर झाले असेल त्याच ठिकाणी केंद्र सुरू करावे लागेल .इतर ठिकाणी स्थापन केल्यास केंद्र रद्द करण्यात येईल.
२. शासनाने ज्या वेळी Aaple Sarkar Seva Kendra सुरू ठेवण्यास संहितले असेल त्यावेळी केंद्र चालू असायला हवे.
३. शासनाने Aaple Sarkar Seva Kendra साठी जी branding दिली असेल त्याचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळाचे हेल्पलाईन क्रमांक तपशील Aaple Sarkar Seva Kendra मध्ये लावणे बंधनकारक असेल.
4. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी करता येणार नाही.अधिक शुल्काची मागणी करत असल्याची तक्रार असेल तर केंद्र रद्द करण्यात येईल.
४. सर्व ग्राहकांना चांगली वागणूक देणे आणि आवश्यक ती मदत व सहकार्य करणे केंद्र चालकाची जबाबदारी असेल.
६. ज्या गावात Aaple Sarkar Seva Kendra साठी अर्ज केला असेल , अर्जदार हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील कुणाचाही अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी अर्जदाराचा असलेल्या अर्जाचा विचार करण्यात येतो.
७. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करताना संबंधित अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. एखादे कागदपत्रे राहिल्यास त्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही.
८. अर्जदार फक्त एकाच आपले सरकर सेवा केंद्र साठी अर्ज करु शकतात.त्याच्या कुटुंबातील दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो रद्द करण्यात येईल .
९. नागरिकाच्या अर्जामध्ये माहीती चुकीची आढळल्यास तो अर्ज रद्द करून त्यांच्यावर कार्यदेशीर कार्यवाही येते.
१०.आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळेवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन आपले सरकार केंद्र चालकाला करावे लागेल.
११. जाहिरातीमद्धे दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या गावामध्ये केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सेतु समिती यांच्याकडे आहेत.
Aaple Sarkar Seva Kendra किती दिवसात मिळते ?
संबंधित जिल्ह्याच्या वेबसाइटवरुन अर्ज Download केल्यानंतर व्यवस्थित पणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज व कागदपत्रे दिलेल्या वेळेतच जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये किंवा जिल्हा सेतु समितीमध्ये जमा करावे लागेल. Aaple Sarkar Seva Kendra Registration तुम्ही जिल्ह्याच्या वेबसाईट वरून जो अर्ज download केला असेल त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायत मध्ये जागा रिक्त आहेत याची सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये समजेल. Aaple Sarkar Seva Kendra अर्ज submit केल्या नंतर जिल्ह्याच्या वेबसाईट वर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होत असते.व यामध्ये पात्र व मंजूर लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येते.जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू केंद्र च्या अंतिम लाभार्थी यादी मध्ये पात्र झाला तर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाते व केंद्र दिले जाते. आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी जे साहित्य लागते ते सुद्धा अर्जदाराला विकत घ्यावे लागेल.नंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र ची जिल्हाधिकारी मार्फत आयडी आणि पासवर्ड मिळेल. Aaple Sarkar Seva Kendra Registration