फळ पिकांसाठी आंबिया बहार पीक विमा सुरू-आजच अर्ज करा

पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना

Fal Pik Vima Yojana 2022-2023  राज्यात फळ पिकांच्या नुकसान भरपाई करण्यासाठी आंबिया बहार फळ पीक विमा राज्य तसेच केंद्रसरकार शेतकर्‍यांसाठी राबवित असते.या वर्षी झालेल्या अधिकच्या पावसामुळे अनेक शेतीपिकांचे नुकसा झाले आहे.शेती पिकांची नुकसान भरून काढण्यासाठी सरकार विमा योजना राबवित असते.त्याच पैकी एक योजना म्हणजे पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना होय.तर शेतकरी मित्रांनो वर्ष 2022 - 2023 साठी या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.आजच ज्या शेतकर्‍यांनी केळी,मोसंबी,संत्री,द्राक्ष,पपई,काजू,आंबा व डाळिंब या पैकी एका किवा अधिक पिकांची शेती केलेली असेल तर त्यांनी त्वरित फळ पीक विमा भरून देणे गरजेचे आहे.


आंबिया बहार फळ पीक विमा योजना काय आहे ?

Fal Pik Vima Yojana 2022 आंबिया बहार फळ पीक विमा योजना फळ वर्गांमद्धे समाविष्ट होणार्‍या पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे काम करते.अवेळी पाऊस,गारपीट,कमी तापमान ,जास्त तापमान,वेगाचा वारा यामुळे जर फळ पीक शेतीचे नुकसान झाले असल्यास त्याची भरपाई सरकार या योजनेच्या माध्यमातून करीत असते.त्यामुळे ही योजना शेतकर्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अधिक शेतकर्‍यांनी या योजनेत समाविष्ट होपून आपल्या पिकांचे विमा काढून घ्यावा असे आवाहन सरकारकडून शेतकर्‍यांना केले आहे.

 

हे देखील वाचा »  कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India

आंबिया बहार फळ पीक विमा योजना रब्बी 2022-2023 समाविष्ट पिके 

अ.क्र
फळपिके
सहभागी जिल्हे
अर्ज शेवटची दिनांक
1
द्राक्ष बुलढाणा,नांदेड,धाराशीव,पुणे
15 ऑक्टोबर 2022
2 केळी बुलढाणा,जळगाव,नांदेड,धाराशीव,पुणे
31 ऑक्टोबर 2022
3
मोसंबी बुलढाणा,जळगाव,नांदेड,धाराशीव,पुणे 31 ऑक्टोबर 2022
4 पपई जळगाव,धाराशीव,पुणे
31 ऑक्टोबर 2022
5 संत्रा बुलढाणा,पुणे
30 नोव्हेंबर 2022
6 काजू रायगड
30 नोव्हेंबर 2022
7 आंबा(कोकण) रायगड
30 नोव्हेंबर 2022
8 आंबा(इतर जिल्हे) बुलढाणा,जळगाव,नांदेड,धाराशीव,पुणे 31 डिसेंबर 2022
9
डाळिंब बुलढाणा,जळगाव,धाराशीव,पुणे 14 जानेवारी 2023


कोणत्या हवामान धोक्यांसाठी नुकसान भरपाई मिळेल

Fal Pik Vima Yojana 2022  फळ पीक तसेच शेतीचे वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान होत असते.परंतु या योजनांमद्धे ठराविक पद्धतीने शेतीचे किवा फळ पिकांचे नुकसान झाले असल्यास तरच नुकसान भरपाई मिळेल.त्यातील संभाव्य धोके खालीलप्रमाणे.

हे देखील वाचा »  इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

fal-pik-vima-yojana-maharashtra अवेळी पाऊस,गारपीट,जादा तापमान,वेगाचा वारा,कमी तापमान,सापेक्ष आद्रता,जास्त पाऊस या पैकी एखाद्या कारणाने एखाद्या शेतकर्‍याचे नुकसान झाले असल्यास तेव्हाच संबंधित शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळेल.तसेच प्रती शेतकरी 4 हेक्टरपर्यंत शेतीचा विमा काढता येईल.एखाद्या शेतकर्‍याला 4 हेक्टर पेक्षा जास्त जमीनीवर फळ शेती केलेली असेल तर त्या शेतकर्‍याला जास्तीत जास्त फक्त 4 हेक्टर पर्यन्त फळ पीक विमा उतरवता येईल. याची सर्व शेतकर्‍यांनी नोंद घ्यावी.


आंबिया बहार फळ पीक विमा योजना नियम व अटी

 1. गारपीट व हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अधिकचा विमा हप्ता संबंधित शेतकर्‍याला लागू असेल.

2. ज्या शेतकर्‍यांना गारपीट व हवामान धोक्याचा अधिक विमा संरक्षण घ्यायचे असल्यास मूळ हवामान धोक्यासहित फक्त बँकेमार्फत शेतकर्‍याला तसा प्रस्ताव सादर करावा लागेल.


3. सर्व शेतकर्‍यांनी अधिसूचित केलेल्या धोक्यांना विचारत घेऊनच फळपिकांचा विमा काढावा.fal-pik-vima-yojana-maharashtra

4. प्रत्येक शेतकर्‍याला जास्तीत जास्त 4 हेक्टर पर्यन्त फळपिकांचा विमा काढता येईल.

शेतकर्‍याने या योजनेचा लाभ कसा घ्यावा

1. कर्जदार शेतकरी

कर्जदार शेतकर्‍यांना आपल्या फळपिकांचा विमा करायचा नसल्यास त्यांनी योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम तारखेच्या 7 दिवस आधी बँकेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक राहील.म्हणजेच बँक विमा हप्ता कपात करणार नाही.कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होणार असेल तर त्यांनी तसे घोषणापत्र संबंधित बँकेला देणे गरजेचे आहे.fal-pik-vima-yojana-maharashtra


2 . बिगर कर्जदार शेतकरी

बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव पत्रक भरून फळ बागेची नोंद असलेला 7/12 उतारा,आधार कार्ड,फळ बागेची उत्पादनक्षमता असलेले स्वयंघोषणापत्र,फळ बागेचा Geo Tagging केलेला फोटो व विमा हप्त्याची रक्कम संबंधित बँकेत,वि.का.स.सेवा सोसायटी किवा CSC सेवा केंद्र या ठिकाणी मुदतीपूर्वी जमा करावी.

आंबिया बहार फळ पीक विमा योजना नुकसान भरपाई प्रक्रिया

पुनर्रचित  हवामान आधारित पीक विमा योजनेद्वारे केवळ पीक निहाय अधिसूचित मंडळ स्थित संदर्भ तसेच हवामान केंद्राची आकडेवारी आणि अधिसूचित केलेल्या धोक्यानुसार नुकसान भरपाई करण्यात येईल.


fal-pik-vima-yojana-maharashtra तसेच येखाद्या ठिकाणी गारपीट किवा अतिरिक्त हवामान धोके,वादळी वारा या द्वारे नुकसान झाल्यास संबंधित शेतकर्‍याने 72 तासांच्या आत नुकसान भरपाईची माहिती विमा कंपनीस देणे अनिवारी आहे.

त्यासाठी शेतकर्‍याने प्ले स्टोअरमधून (Play Store) Crop Insurance App डाऊनलोड करावे आणि त्याद्वारे नुकसान भरपाईची माहिती द्यावी.किवा विमा कंपांनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी.

या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार नाही

1. शेतकर्‍याने  अधिसूचित केलेल्या 4 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा केल्यास.


2. शेतकर्‍याने एकाच सर्वे नंबरवरन अनेक बँका/शाखा/वि.का.स.सोसायटी मधून कर्जदार किवा बिगर कर्जदार शेतकरी म्हणून किवा पीक/अधिसूचित फळ पीक लागवड केल्यास नुकसान भरपाईमिळणार नाहीfal-pik-vima-yojana-maharashtra.

3. एकाच क्षेत्राचा दोन्ही खरीप व रब्बी हंगामात विमा केला असल्यास याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

हे देखील वाचा »  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड योजना

आंबिया बहार फळ पीक विमा योजना लागणारी कागदपत्रे

1. विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक भरलेले

2. फळपीक लागवड केलेला 7/12 उतारा

3. क्षेत्राची उत्पादनक्षमता वर्णन असलेले शेतकर्‍याचे स्वयघोषणापत्र 

4. Geo Tagging केलेला फोटो


विमा करण्यासाठी संपर्क कुठे करायचा

CSC सेंटर सीएससी सेवा केंद्र

बँक किंवा वि.का.स सेवा सोसायटी

पीक विमा पोर्टल ( https://pmfby.gov.in )

Previous Post Next Post