अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई जाहीर

ativrushti nuksan bharpai yadi 2022

अतिवृष्टी,चक्रीवादळ वपुर यांमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई यापूर्वी जाहीर झाली होती.तसेच इतर प्रकारे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना काल नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.त्यामुळे ज्या शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई मिळणार आहे.त्यासाठी खालीलप्रकारे भरपाई देण्यात येणार आहे.

अ.क्र बाब प्रचलित दर मदतीचा वाढीव दर
1 जिरायत पीक 6800/- रु.प्रती हेक्टर,2 हेक्टर पर्यंत 13600/- रु.प्रती हेक्टर,3 हेक्टर पर्यंत
2 बागायत पीक 13500/- रु.प्रती हेक्टर,2 हेक्टर पर्यंत 27000/- रु.प्रती हेक्टर,3 हेक्टर पर्यंत
3 बहुवार्षिक पीक 18000/- रु.प्रती हेक्टर,2 हेक्टर पर्यंत 36000/- रु.प्रती हेक्टर,3 हेक्टर पर्यंत

 ativrushti nuksan bharpai yadi 2022 अतिवृष्टीच्या सरकारने तरुण दिलेल्या नियमात न बसणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या वर्षात जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता.

हे देखील वाचा »  20 हजार पोलिस भारती होणार ,आजच तयार ठेवा ही कागदपत्रे

 ativrushti nuksan bharpai yadi 2022 काल 13 ऑक्टोबर 2022 रोजी याबादलचा शासननिर्णय जाहीर करण्यात आला आहे.यामुळे राज्यातील जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे.

अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी मार्फत केले जातात . शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे , तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने सरकारकडून अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते . 

हे देखील वाचा »  शौचलययासाठी मिळते अनुदान असा घ्या लाभ,असा करा अर्ज

 ativrushti nuksan bharpai yadi 2022 मात्र , महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते . शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र . सीएलएस -५ ९ ८३ / २४८३६१ / प्र.क्र .८२० / म -३ , दि .३१.१.१ ९ ८३ मध्ये अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास अशा नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव पाठविण्याची तरतुद आहे . 


 ativrushti nuksan bharpai yadi 2022 या तरतुदीनुसार चालू हंगामाध्ये विभागीय आयुक्त , औरंगाबाद व विभागीय आयुक्त , अमरावती व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत शासनास प्रस्ताव प्राप्त झाले होते . हे प्रस्ताव निर्णयार्थ मा . मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि .२९/०९/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते . मंत्रिमंडळ उपसमितीने चालू हंगामाकरिता अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून विहित दराने मदत देण्याबाबत निर्णय घेतला आहे . त्यानुसार निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . 


 ativrushti nuksan bharpai yadi 2022 शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहे. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी , लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्यात येणार आहे.सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यातकरण्यात येईल. 

हे देखील वाचा »  शेती पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत हे काम करा.तरच मिळेल नुकसान भरपाई

 ativrushti nuksan bharpai yadi 2022 लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची तसेच चालू हंगामातील नैसर्गिक आपत्तीमध्ये लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रक्कमेमधून कर्जाची कोणतीही रक्कम बँकेने वसूल करू नये याकरिता सर्व संबंधित बँकाना योग्य त्या सूचना देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.


 ativrushti nuksan bharpai yadi 2022 शेतकर्‍यांनी तलाठी तसेच महसूल अधिकारी यांच्याकडून पिकाचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.संबंधित शेतकर्‍याने पंचनामे करून आधार कार्ड व बँक पासबूकची प्रत,आणि नुकसानीचा फोटो संबंधित कार्यालयामध्ये जमा करावा.

शेतकर्‍यांना सर्व रक्कम ही DBT पद्धतीने बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यासाठी शेतकर्‍याने बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे. आधार कार्ड कसे लिंक करावे? यासाठी खालील लेख वाचवा.

हे देखील वाचा »  बँकेला आधार कार्ड लिंक करा या पद्धतीने


Previous Post Next Post