अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना
Ahilyabai-Holkar-Free-ST-Travel-Scheme स्त्री शिक्षण हे प्रगतीचे निर्विवाद सूत्र मानून महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत . पालकांची विशेषत : ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे , ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत .
ahilyabai holkar scheme of maharashtra government त्याकरिता , मुलींना शाळेत दाखल करण्याकरिता पालकांना प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी . ५ वी ते १2 वी पर्यंतच्या ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्याकरिता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत महाराष्ट्र शासनाकडून अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास या योजनेअंतर्गत देण्यात येते.
या योजनेला " अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना " असे संबोधण्यात येते.
अहिल्याबाई होळकर मोफत एस . टी . प्रवास
1. ही सवलत फक्त विद्यार्थीनीसाठी (मुलींसाठी) अनुज्ञेय आहे .
2. ग्रामीण भागातील स्थानिक ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची सोय असल्यास दुस-या गावात अथवा शहरात जावून माध्यमिक शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींना ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही .
3. शाळेच्या मुख्याध्यापक पात्र विद्यार्थीनींची तपशिलवार यादी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुखांना पाठवतात . Ahilyabai-Holkar-Free-ST-Travel-Scheme
4. मुख्याध्यापकांमार्फत यादी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थीनीस संबंधित आगार प्रमुखांमार्फत तिमाही पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतात . ahilyabai holkar scheme of maharashtra government
5. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना दर महिन्यास विद्यार्थीनींची किमान उपस्थिती ७५ % असण्यासंबंधीचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास द्यावे लागते . त्याशिवाय पुढील तिमाहीचा पास महामंडळ देत नाहीत . Ahilyabai-Holkar-Free-ST-Travel-Scheme
6. संबंधित शिक्षणाधिकारी - यांनी प्रत्येक तिमाहीस शाळांकडून आलेल्या माहितीच्या आधारे माहिती एकत्र करून कोषागारामध्ये देक सादर करतात व राज्य परिवहन महामंडळास चेक अथवा डिमांड ड्राफ्टने रकमेची प्रतिपूर्ती करतात .
अहिल्याबाई मोफत पास योजना नियम
1. ही योजना फक्त शिक्षण घेणार्या मुलींसाठी लागू असेल. ahilyabai holkar scheme of maharashtra government
2. 5 वी ते 12 पर्यंतच्या सर्व मुलीया योजनेचा लभ घेऊ शकतात.
3. मुलींची 75 % हजेरी आवश्यक असते.
4. माध्यमिक शिक्षण घेणार्या सर्व मुलींना याचा फायदा होतो.
Ahilyabai-Holkar-Free-ST-Travel-Scheme ही योजना ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १2 वी च्या विद्यार्थीनींना लागू आहे,या योजनेसाठी लागणारा सर्व खर्च राज्य शासनाकडून करण्यात येतो.
मित्रानो माहिती महत्वाची आहे त्यामुळे शेअर करायला विसरू नका. ahilyabai holkar scheme of maharashtra government