सावधान ! व्हॉट्स ॲप वापरताय , गुन्हा होऊ शकतो दाखल ! WhatsApp message can get you arrested u


Whats App
मानवी जीवनातील दैनंदिन वापरतील एक महत्वाचे साधन बनले आहे.कागदपत्रे पाठवायचाई असल्यास ,मित्रमैत्रिणींना व्हिडिओ कॉल करणे,माहितीची देवाणघेवाण अशा अनेक गोष्टी Whats App च्या माध्यमातून करता येतात.तरी देखील अशा काही गोष्टी असतात ज्या की एकमेकांना शेअर केल्यास किंवा Whats App Group वर पाठवल्यास तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते.व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून पाठविल्या गेलेल्या प्रत्येक मेसेजवर सरकारच्या सायबर क्राईमची नजर असल्याने व्हॉट्स ॲपवर मेसेज करताना प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे

 

WhatsApp message can get you arrested

धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण करणारा मेसेज ग्रूप ॲडमिनसह सदस्यांनादेखील अडचणीत आणू शकतो  , Whats Appहे संवादाचे मोबाईल आता प्रत्येकाची गरज सर्वात प्रभावी माध्यम ठरत आहे . सध्या दिवस असल्याने सणासुदीचे सामाजिक व धार्मिक वातावरण बिघडणार नाही , या अनुषंगाने मेसेज पाठविण्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे . एकमेकांना शुभेच्छा देतानाच दोन समाजात तेढ वाढविणारे आक्षेपार्ह असे मेसेज पाठविले तर गुन्हा दाखल होऊ शकतो .

 अनेक जण Whats App चा वापर मनोरंजनासाठी तर काही नागरिक व्यावसायिक कारणांसाठीही वापर करतात . या माध्यमाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेपण आहेत अनेकदा आक्षेपार्ह पोस्टमुळे धर्मीय आणि जातीय तेढ वाढते यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनते . अनेकदा एका छोट्याशा मेसेजमुळे काही ठिकाणी तणाव निर्माण होतो


WhatsApp message can get you arrested

हे देखील वाचा »  Whats App वर करा कागदपत्रे डाऊनलोड I ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन कार्ड,आधार कार्ड

सायबर पोलिसांची विशेष नजर दाखल Whats App च्या प्रत्येक मेसेजवर पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नज़र आहे . एखाद्या पोस्टमुळे गुन्हा घडल्यास आक्षेपार्ह पोस्टकर्त्यावर गुन्हा केला जातो . संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा दाखल होतो . सायबर विभागाची करडी नजर असल्याचे दिसून येते . सर्वांनी योग्य ती काळजी घ्या ! Admin ही पथ्ये पाळा ग्रुपमधील काही सदस्य वारंवार आक्षेपार्ह पोस्ट टाकतात . अशा सदस्यांना ॲडमिनने तत्काळ ग्रुपमधून बाहेर काढावे , आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा व संबंधित ग्रुप ॲडमिन दोषी समजला जातो . आगामी सण उत्सवाच्या कालावधीत सामाजिक , धार्मिक तेढ निर्माण होईल असे मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नये . 


WhatsApp message can get you arrested नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता सहकार्य करावे . Whats App पोस्टमधून कुणाच्याही जातीय व धार्मिक भावना दुखावू नयेत , याची सर्वांनी काळजी घ्यावी . 


धार्मिक तेढ , प्रक्षोभक वक्तव्य पडेल महागात अनेकदा Whats App वापरणारे खात्री न करताच आलेले मेसेज जसेच्या तसे पुढे सरकवितात . त्यात अनेक मेसेज आक्षेपार्ह असतात . त्यातून धार्मिक व जातीय तेढ निर्माण होते . अशा पोस्टमुळे आता संबंधित ग्रुप ॲडमिनसह वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे . 

हे देखील वाचा »  आधार मतदान कार्ड लिंक कसे करावे?

या गोष्टी टाळा ... 

Whats App च्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अनेक गुन्हे दाखल झाले आहेत . त्यामुळे भावना दुखावतील असे मेसेज नको , मॅसेज चांगलेच पाठविण्याकडे लक्ष असावे

WhatsApp message can get you arrested

 कोणतीही पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड करू नये.


कुणाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट टाकू नये .

आक्षेपार्ह पोस्ट असल्यास त्याची तत्काळ खात्री करावी.


काय होते कारवाई ? 

आक्षेपार्ह पोस्ट केल्यास संबंधित सदस्य व ग्रुप ॲडमिन यांच्याविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो . तसेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण केल्यास विविध कलमांनुसार गुन्हा दाखल होतो .cyber crime complaint online maharashtra

Previous Post Next Post