अदिवासी उप योजनेंतर्गत अदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच अदिवासी बाह्य क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे .लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे shabri-housing-scheme-maharashtra
योजनेच्या अटी
1) लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला असून अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येते .
2) लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे .
3) लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
4) लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे .
5) विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
6) अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :- अ) ग्रामीण क्षेत्र - रु. 1.00 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र - रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र - रु. 2.00 लाख
7) लाभार्थी सामाजिक , आर्थिक व जात सर्वेक्षण प्राधान्य क्रम यादीच्या निकषा बाहेरील असावा shabri-housing-scheme-maharashtra
लाभाचे स्वरूप
घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांचा रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान
shabri-housing-scheme-maharashtra
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांस दिल जाणारे अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते .
आवश्यक कागदपत्रे
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
2. जातीचे प्रमाणपत्र
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
shabri-housing-scheme-maharashtra
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
9. ग्रामसभेचा ठराव
संपर्क अधिक माहितीसाठी
संपर्काचे पत्ते shabri-housing-scheme-maharashtra
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
👇👇👇 शबरी घरकुल आवास योजना अर्ज 👇👇👇
Click Here To Download