घरकुल योजना - रमाई आवास योजना महाराष्ट्र राज्य

रमाई आवास योजना ramai awas yojana maharashtra

रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे.ग्रामसभेने निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची अंतिमतः निवड करण्यासाठी घरकुल निर्माण समिती स्थापन करण्यात आली आहे.अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पक्क्या घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे .


योजनेचा तपशील

योजनेचे नाव
रमाई आवास योजना महाराष्ट्र ramai awas yojana maharashtra
योजना
महाराष्ट्र सरकार
विभाग ग्रामविकास व पंचायतराज विभाग ,महाराष्ट्र
लाभार्थी
अनुसूचित जाती (SC),नवबौद्ध वर्ग
अर्ज प्रक्रिया
ऑफलाइन
उद्देश राज्यातील गरीब नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देणे
वेबसाइट https://rdd.maharashtra.gov.in/

ramai awas yojana maharashtra योजनेसाठी अटी

1. लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला असून अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येते.

2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे.

3. लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे.

हे देखील वाचा »  मुलींच्या भविष्यासाठी मिळू शकतात 71 लाख रुपये I सुकन्या समृद्धी योजना

4. सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला जातीचा दाखला असावा.

5. लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रूपये आहे.

6. लाभार्थी सामाजिक , आर्थिक व जात सर्वेक्षण प्राधान्य क्रम यादीच्या निकषा बाहेरील असावा.

7. अर्जदार अनुसूचित जाती (SC),नवबौद्ध वर्गातीलअसावा 


योजनेअंतर्गत लाभ

घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान - १ लाख २० हजार रूपये , नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ३० हजार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ९० दिवसांचा रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान ramai awas yojana maharashtra

हे देखील वाचा »  उज्वला गॅस योजना I महिलांना मिळणार मोफत गॅस

रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांस दिले जाणारे अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते .

घरकुल योजना 2022 साठी आवश्यक कागदपत्रे
ramai awas yojana maharashtra अर्ज भरू इच्छिणाऱ्या राज्यातील कोणत्याही व्यक्तीकडे नोंदणी फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे, खाली दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता अर्जदाराने केली पाहिजे.


  1. आधार कार्ड (Aadhaar Card)
  2. शिधापत्रिका ( रेशनकार्ड)
  3. पत्ता पुरावा (Residence Proof)
  4. जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  5. निवास प्रमाण
  6. मोबाईल नंबर
  7. बँक खाते क्रमांक
  8. बँक IFSC कोड
  9. उत्पन्नाचा पुरावा इ.(Income Certificate)

संपर्क - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा परिषद  व सहायक आयुक्त समाज कल्याण , जिल्हा माहिती कार्यालय ,

Previous Post Next Post