सरकारतर्फे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना आमलात आणल्या जातात.त्यातीलच एक स्कॉलरशिप योजना म्हणजे केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.उच्च माध्यमिक ( इयत्ता १२ वी ) परीक्षेमध्ये कला , वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना , उच्च शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचेतर्फे राबविण्यात येते . या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी नविन मंजूरीचे आणि नूतनीकरणाचे ( Renewal ) अर्ज ऑनलाईन ( Online ) पध्दतीने मागविण्यात येत आहेत.ऑफलाईन ( Offline ) पद्धतीने भरलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत .
नवीन मंजूरीसाठी केंद्रशासनाकडून गुणवत्ता यादी (Merit List ) तयार करण्यात येते . विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्रशासनामार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ( Under DBT Mode ) जमा करण्यात येते . केंद्रशासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी व नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ अशी आहे . शिष्यवृत्ती बाबतच्या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचना ( Guidelines ) व FAQs काळजीपूर्वक वाचून त्यानुसार सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांना कार्यवाही करणे आवश्यक आहे . तसेच सदर योजनेबाबतच्या केंद्रशासनाकडील नवीन / सुधारीत प्राप्त सूचनांसाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळाचे व या संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी करावे . post-matric-Scholarship-for-Minority-student
योजनेचे स्वरूप
केंद्र शासनाकडून राज्यातील मुस्लीम , ख्रिश्चन , शीख , पारशी , जैन व बौद्ध या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते .
शिष्यवृत्ती अकरावी ते पी . एचडी . व्यावसायिक ( डीएड , बीएड , एमएड , आयटीआय ) सर्व अभ्यासक्रमांना देण्यात येते . ( तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून )
योजनेच्या अटी
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
मागील वार्षिक परिक्षेत किमान ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा .
अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती तसेच स्टायपेंड योजनेचा लाभार्थी नसावा .
अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख पेक्षा जास्त नसावे .
एका कुटूंबातील फक्त २ अपत्यांनांच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
post-matric-Scholarship-for-Minority-student शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठी विद्यार्थ्याने पुढील वर्गात प्रवेश घेतलेला असावा . तसेच मागील वार्षिक परिक्षेत किमान ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वतःचे खाते उघडणे आवश्यक आहे .
लाभाचे स्वरूप
अभ्यासक्रमाचे शुल्क , शिक्षण शुल्क , परिरक्षण केंद्रशासनाच्या नियमानुसार भत्ता हे लाभ देण्यात येतात .
रक्कम अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय , नवी दिल्ली यांचेमार्फत विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते .
नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ- www.scholarships.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपध्दती
१. विद्यार्थ्यांनी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे .
२. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि . ३१.१०.२०२२ ही आहे . व महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करण्याचा अंतिम दिनांक १५.११.२०२२ ही आहे .
३. post-matric-Scholarship-for-Minority-student नवीन मंजूरीसाठी ( Fresh ) सदर योजनेसाठी SSC , CBSE व ICSE बोर्डचे टॉप २०h Percentile यादीतील सर्व विद्यार्थी या योजनेचा अर्ज करण्यास पात्र असतील . सदर शिष्यवृत्तीसाठी उच्च शिक्षण कार्यालयामार्फम केवळ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SSC बोर्डचे विद्यार्थ्यांची यादी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल .
४. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक आहे अशा विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक या पर्यायाचा वापर करुन अर्ज भरावा . आधार कार्ड नसेल तर त्याऐवजी अशा विद्यार्थ्याने आधार नोंदणी आयडी स्लीप किंवा बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची फोटोसह असलेली छायांकित प्रत अपलोकड करुन अर्ज भरावा .
५. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे लाभ मिळणेसाठी आधार क्रमांक त्यांच्या बँकखात्याशी संलग्न ( Link ) असणे आवश्यक आहे . ज्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती रक्कम सुरळीतपणे जमा होण्यास मदत होईल .
६. विद्यार्थ्याचा बँक खाते चालू स्थितीत असणे ( Operative / Active Mode ) आवश्यक आहे . जेणेकरून शिष्यवृत्ती रक्कमेचे वितरण अयशस्वी ( Fail ) होणार नाही .
७. विद्यार्थ्यांचे बैंक खाते स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे . जॉईंट खाते नसावे . खाते क्रमांक व इतर बैंक तपशील भरण्यात विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यामुळे शिष्यवृत्ती विलंबाने मिळाल्यास / न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्याची राहील .
८. post-matric-Scholarship-for-Minority-student ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळाच्या Homepage वरील SOP ( standard operating procedure ) वाचून व समजून घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा .
९ . ऑनलाईन अर्ज भरताना विचारण्यात आलेली माहिती पूर्णपणे भरुन , ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह आपल्या महाविदयालयाकडे पुढील कार्यवाहीकरिता सादर करावी .
१०. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण निर्माण झाल्यास आपल्या महाविद्यालय / संस्थेशी संपर्क साधून सदर अर्ज महाविद्यालयाच्या / संस्थेच्या मदतीने पूर्ण करून घ्यावा .
११. एखादा पात्र विद्यार्थी नुतनिकरणासाठी अर्ज करावयाचा राहीला असेल तर पुढील वर्षी अर्ज करण्यास पात्र असेल . ( परंतू ज्या वर्षाचा अर्ज करण्याचा राहीला आहे त्या वर्षाचा लाभ मिळणार नाही . )
१२. एखादया पात्र विद्यार्थ्यांचा नुतनिकरणासाठी अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळणी करावयाचा राहीला असेल तर सर्व अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षी योजनेसाठी अर्ज करता येईल . ( परंतू ज्या वर्षाचा अर्ज करण्याचा राहीला आहे त्या वर्षाचा लाभ मिळणार नाही . )