कोणत्याही नोकरीसाठी तसेच CSC केंद्र चालक, Cyber Cafe चालकांसाठी police Verification Certificate online म्हणजेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.ज्या व्यक्तीला किंवा उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवे असेल किंवा काढायचे असल्यास त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो . त्यानंतर मग तो अर्ज संबंधित पोलीस स्टेशनला ऑनलाईन पध्दतीने सादर केला जातो.तर काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि त्याला कागदपत्रे जोडून जमा करावा लागतो. त्यानंतर जिल्हा स्तरावर उमेदवाराची चारित्र्य पडताळणी पोलिस यंत्रणेमार्फत केली जाते.त्यामध्ये उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत का ? किंवा उमेदवारावर न्यायालयात काही खटले सुरू आहेत का ? याची पोलिसांमार्फत पडताळणी केली जाते.
पोलीस स्टेशन मध्ये तो अर्ज संबंधित पोलीस आयुक्तालय कार्यालय / पोलीस अधीक्षक कार्यालयात पडताळणीसाठी दाखल करण्यात येतो. पोलिस पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ' चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ( Police Verification Certificate) अर्जदारास मिळते . डेस्कटॉप किंवा मोबाईलवर चारित्र्य पडताळणीसाठी (police Verification) ऑनलाईन अर्ज कसा करावा ? याबद्दल माहिती या लेखात दिली आहे. मित्रांनो , हा लेख पूर्ण वाचा यामध्ये तुम्ही घरीबसल्या जागी कसा पोलीस चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता याबाबतची माहिती स्टेप बाय स्टेप सांगितली आहे . तुम्हाला हा लेख आवडल्यास इतरांना शेअर करा व मित्रांना शेअर करा .
Online Form filling Step
1. नोंदणी | Registration
2.लॉगीन | Login
3. अर्ज भरा | Fill Application
4. शुल्क भरणा | Pay Fees
5. स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावरील पडताळणी | Verification by Local Police Station
6.पोलीस आयुक्तालय / पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावरील पडताळणी | Verification by CP Office / SP office
1.नोंदणी | Registration
1. महाऑनलाईन अधिकृत संकेतस्थळ वर गेल्यानंतर Registration वर क्लिक करा .
आपल्यासमोर आपली वैयक्तिक माहिती विचारणारे एक पेज उघडलेले दिसेल .त्यात विचारलेल्या माहितीनुसार आपला आधार नंबर टाकावा .आणि नाव आणि दिलेली सर्व वैयक्तिक माहिती इंग्रजीमध्ये टाकायची आहे त्यानंतर आपोआप मराठीमध्ये लिहिलेले दिसेल.
2. त्यामध्ये काही चुका असल्यास आपण त्या दुरुस्तही करू शकतो .त्यानंतर आपले पोलीस अधीक्षक कार्यालय / पोलीस आयुक्तालय निवडायचे ..Email ID च्या समोरील रकान्यात आपला Email ID अचूकपणे नोंदवायचा आहे .
police Verification Certificate online
3. आपले Username म्हणून आपल्याला आपला मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे .
त्यानंतर आपल्या या महाऑनलाईन खात्यासाठी एक पासवर्ड नोंदवायचा आहे .
शेवटी विचारलेल्या सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊन Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
4. त्यानंतर आपण नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एक Verification Code येईल . तो कोड Enter Verification Code समोरील रकान्यात टाकायचा व पुढील Verify या बटनावर क्लिक करा .
5. शेवटी आपल्यासमोर ' Your registration completed successfully . Kindly login to apply for online services . असा संदेश येईल . म्हणजे आपले Registration यशस्वीपणे पूर्ण झाले आहे .
2.लॉगीन | Login -
आता आपल्यासमोर आलेल्या Log in विंडो मध्ये Username च्या जागी आपला मोबाईल क्रमांक व Password च्या जागी आपण नोंदविलेला पासवर्ड टाकून पुढे आलेला Captcha Code समोरील रकान्यात टाकून Login बटनावर क्लिक करा .police Verification Certificate online
3.अर्ज भरा | Fill Application
1. लॉगीन झाल्यानंतर आपल्यासमोरील डाव्या बाजूला असलेल्या SERVICES वर क्लिक करा व त्यातील CHARACTER CERTIFICATE वर क्लिक करा .
2. आपल्यासमोर आलेल्या Instructions काळजीपूर्वक वाचायच्या आहेत .ज्यामध्ये आपल्याला कोणते कागदपत्रे लागणार आहे ते संगीतलेले असेल.वयाचा पुरावा | Age Proof ( any One ) / ओळख पुरावा | Identity Proof ( any One ) पत्त्याचा पुरावा | Address Proof ( any One ) अनिवार्य कागदपत्रे | Compulsory Document याबाबतची माहिती पूर्णपणे वाचून घ्यावी व समोरील Next Page वर क्लिक करा .
3.त्यानंतर Address Information मध्ये आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्ये व समोरील रकान्यात मराठीमध्ये आपले नाव लिहा . [ आपल्याला ID Name मध्ये आधार कार्ड , मतदान कार्ड , चालक वाहन परवाना विद्यार्थी किंवा इतर पैकी एक पर्याय निवडून त्याचा क्रमांक ID Number मध्ये आपला ID क्रमांक टाकावा .
4.त्यानंतर Present Residential Address यासमोरील रकान्यांमध्ये तुमचा पत्ता इंग्रजी व मराठीमध्ये अचूकपणे टाकावा .
5. पुढील Company Name and Address where NOC / Certificate is to be submitted ( जेथे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे त्याची माहिती ) मध्ये Designation ( पदनाम ) समोरील रकान्यात आपले पद व समोरील Company मध्ये ज्याठिकाणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे त्या कार्यालयाचे नाव टाकून कंपनीचा पत्ता इंग्रजी व मराठीमध्ये अचूकपणे टाकावा .police Verification Certificate online
6. Particulars of places where the Applicant has resided during last 10 years यासमोरील रकान्यांमध्ये आपण मागील १० वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी रहिवास केला असेल तर त्याची माहिती भरावी . नंतर समोरील Next Page वर क्लिक करा .
7. नंतर General Information मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे . ज्यामध्ये आपली जन्मखून , अटकेसंदर्भातील माहिती , राजकीय पार्श्वभूमी व प्रलंबित खटल्याबाबतची माहिती हो किंवा नाही यास्वरूपात द्यायची आहेत . नंतर आपल्या गावातील आपल्याला ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठीत नागरिकांची माहिती भरायची आहे . ज्यामध्ये नाव - पत्ता - मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे .
8. Police Station Information मध्ये आपल्याला आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनची माहिती द्यायची आहे . शेवटी Place मध्ये आपले ठिकाण व Date मध्ये तारीख नोंदवून Save या बटनावर क्लिक करा .police Verification Certificate online
9. आता आपल्यासमोर ' Your application has been successfully received . Your Application ID is ***** असा संदेश आपल्यासमोर येईल .
म्हणजे आपला अर्ज यशस्वीरीत्या दाखल झाला आहे .
10. आपल्यासमोरील पेजवर फोटो सही आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे व पुढील Save बटनावर क्लिक करा . नंतर Continue वर क्लिक करून Proceed to Payment वर क्लिक करायचे आहे .
4.फी भरा| Pay Fees
Proceed to Payment वर क्लिक केल्यानंतर समोरील फीस भरण्याचा पर्याय ( Mode of Payment ) निवडा . समोरील येणाऱ्या सूचनां काळजीपूर्वक वाचून फी भरायची आहे.त्यानंतर पावती प्रिंट काढून घ्यावी. आणि फॉर्मची देखील प्रिंट घ्यावी. अशाप्रकारे आपला अर्ज आपणघरबसल्या भरला आहे..
5.स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावरील पडताळणी | Verification by Local Police Station
फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ,भरलेल्या फी ची पावती आणि अपलोड केलेले सर्व कागदपत्रे जोडून फॉर्म हा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा कारायचा आहे.police Verification Certificate online maharshtra
त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय / पोलीस आयुक्तालय यांच्या मार्फत अर्जाची तपासणी केली जाईल.पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याच वेबसाइटवर पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
ऑनलाइन Police Verification Registration Link 👉 इथे क्लिक करा
टिप- काही जिल्ह्यांमध्ये सर्व प्रोसेस ऑनलाइन आहे त्यामुळे काही ठिकाणी फिजिकल फॉर्म जमा करावा लागत नाही,पडताळणी पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. पोलीस पडताळणी (Police Verification) म्हणजे काय?
उत्तर - पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) उच्चायुक्तालयाद्वारे जारी केले जाते, जे भारतीय पोलिसांकडे असलेल्या व्यक्तीचे गुन्हेगारी रेकॉर्ड प्रमाणित करते . जेव्हा एखादी व्यक्ती व्हिसासाठी/ कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज करते तेव्हा सामान्यतः हे आवश्यक असते.
2. मला स्थानिक पोलिस स्टेशनमधून पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र कसे मिळेल?
उत्तर - संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख/पोलीस आयुक्त पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देतात. ते प्राप्त करण्यासाठी, अर्जदाराने जिल्हा पोलिस कार्यालयात प्रमाणपत्राची आवश्यकता निर्दिष्ट करणारा तपशीलवार अर्ज सादर केला पाहिजे
3. Police Verification किती काळ वैध आहे?
उत्तर- सहा महिने,पोलीस क्लिअरन्स जारी केल्याच्या तारखेपासून फक्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वैध आहे
4. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ( Police Verification)मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर - क्रिमिनल रेकॉर्ड सेंटरमध्ये पूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून क्लिअरन्स सर्टिफिकेट जारी होईपर्यंत सरासरी कालावधी अंदाजे 15 दिवसांचा असतो.
5. मला स्थानिक पोलिस स्टेशनमधून पीसीसी मिळेल का?
उत्तर - PCC अर्ज करताना तुम्ही जवळचे पोलिस स्टेशन निवडू शकता . त्यानंतर, तुमचा पीसीसी सहजतेने मिळवण्यासाठी नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करा. तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला भेट द्या