PM Kisan योजनेचा हफ्ता मिळाला नाही? हे असू शकते कारण

PM किसान योजनेचा 12 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.त्या अनुषंगाने सरकारने शेतकऱ्यांना pm kisan योजनेची kyc करण्यासाठी सांगितले आहे.आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी kyc केली आहे तरी kyc न करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

pm kisan samman nidhi yojana installment

Pm kisan च्या नवीन अपडेटनुसार ज्या शेतकऱ्यांनी kyc केली आहे त्यांच्याच खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेची रक्कम जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी kyc केली नसेल त्यांनी लवकरात लवकर kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा सूचना सरकारमार्फत देण्यात आल्या आहेत.



शेतकरी सन्मान योजना काय आहे? (Pm Kisan Yojana)

प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता.या योजनेअंतर्गत केंद्रसरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ठराविक कालावधीत वार्षिक 6000 रू जमा करीत असते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्न व्यतिरिक्त आर्थिक लाभ देणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे या योजनेचा उद्देश आहे.आता पर्यंत भरपूर शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.परंतु अनेकवेळा काही बोगस शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत असे सरकारच्या निदर्शनात आले आहे.pm kisan samman nidhi yojana installment

हे देखील वाचा »  Police Verification कसे काढावे ? तेही घरबसल्या

त्यामुळे सरकारने kyc प्रक्रिया अमलात आणली आहे.kyc प्रक्रियामुळे बोगस शेतकरी जे या योजनेचा लाभ घेत होते त्यांना आळा बसणार आहे.त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

या शेतकऱ्यांना pm kisan योजनेचा लाभ मिळणार नाही (illegal-beneficiaries-of-pm-kisan)

आजी / माजी मंत्री , खासदार , आमदार , महापालीकेचे महापोर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी , शासन अंगीकृत संस्था , स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी / कर्मचारी ( चतुर्थ श्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून ), आयकर भरणारे व्यक्ती,  निवृत्ती वेतनधारक व्यक्ती  निवृत्ती वेतन रु .१०,००० / - किंवा त्यापेक्षा जास्त असलेले व्यक्ती ( चतुर्थ श्रेणी / गट - ड वर्ग कर्मचारी वगळून ), व्यवसायीक डॉक्टर , वकील , अभियंता , सनदी लेखापाल ( सी.ए. ) ,वास्तुशास्त्रज्ञ ( आर्कीटेक्ट ) या व्यक्तींना पम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही .pm kisan samman nidhi yojana installment  तसेच एखादा शेतकरी मयत झाला असेल आणि त्याचा लाभ अन्य व्यक्ती घेत असल्यास त्यांचे हप्ते बंद केले जातील आणि सरकारद्वारे दिलेल्या लाभाची परतफेड त्या व्यक्तीला करावी लागेल.सरकार त्यांच्याकडून लाभाची वसुली करू शकते.



अजून pm kisan योजनेचे हप्ते मिळाले नाही तर हे करा
(pm kisan samman nidhi yojana installment not received)

1 . सर्व प्रथम kyc केली नसेन तर kyc करून घ्यावी 

2. आधार कार्ड व बँक पासबुक यावरील नाव व इतर माहिती बरोबर आहे का ते चेक करावे
 

3.आधार कोणत्या बँकेला लिंक आहे चेक करा 👉 इथे क्लिक करा.pm kisan samman nidhi yojana installment


4. त्यांनतर pm kisan website वर जावे ,तिथे farmer Corner मध्ये Beneficiary list वर क्लिक करा.

5. आता त्यामधे राज्य ,जिल्हा,गाव निवडा आणि कॅपचा टाकून सबमिट करा.तिथे तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी लिस्ट मिळेल त्यामधे आपले नाव आहे का ते शोधा

हे देखील वाचा »  घरकुल योजना - रमाई आवास योजना महाराष्ट्र राज्य


बँकेला आधार कार्ड कसे लिंक करावे? (link aadhaar number with bank account online)

1. Pm kisan योजनेचा 11 व्या अजून काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाहीये.तर मित्रानो याबाबतीत सांगायचे झाल्यास एक तर तुमचे बँक अकाउंटला आधारकार्ड लिंक नसेल किंवा आधारवरील माहिती व बँक पासबुक वरील माहितीत बदल असेल.

2. त्यासाठी सर्वप्रथम संबंधित शेतकऱ्याने सर्व प्रथम आपले आधारकार्ड व बँक पासबुक या वरील माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.
link aadhaar number with bank account



3. जर आधार कार्ड वरील माहितीत चूक असेल तर सर्वप्रथम आधार कार्ड अपडेट करावे.
pm kisan samman nidhi yojana installment

4. त्यानंतर बँक मधे आधार संलग्न करावे ,त्यासाठी खालील फॉर्म डाऊनलोड करा.

👇👇👇

Download File

5. फॉर्म डाऊनलोड झाल्यानंतर त्या प्रिंट घ्यावी आणि तो फॉर्म भरून संबंधित बँकेत आधारकार्ड झेरॉक्स जोडून जमा करावा. अशाप्रकारे तुम्ही बँकेत आधारकार्ड लिंक करू शकतात.


Previous Post Next Post