नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड योजना

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड योजना  

योजनेचे स्वरुप

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड  योजनेअंतर्गत आंबा , डाळिंब , पेरू , सीताफळ , आवळा , कागदी लिंबू व मोसंबी या फळझाडांची कलमे लागवड करता येतात . तसेच लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिता १०० टक्के अनुदान देय आहे.


योजनेच्या अटी

1. वैयक्तीक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येतो .अनुदानाची मर्यादा १०० टक्के आहे. 

2. लाभार्थ्यांस एकूण ३ वर्षाच्या कालावधीत ५० : ३० : २० प्रमाणे अनुदान देय होईल.

3. पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी फळबाग जगविणे आवश्यक राहील.

हे देखील वाचा »  कुक्कटपालन साठी मिळणार अनुदान I पात्रशेतकर्‍यांना मिळणार लाभ

4. फळबाग लागवडीकरिता कलमची निवड स्वतः करावयाची असून कलमे खरेदी करतांना कृषि विभाग , कृषि विद्यापीठ , नामांकित खासगी व कृषि विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकांना प्राधान्य दिले जाईल .

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड योजना  

योजनेअंतर्गत लाभ

1. फळबाग आंबा- अंतर ५४५ , हेक्टरी झाडे ४००- अनुदान १ लाख १ हजार ९७२ रुपये.


2. फळबाग पेरू- अंतर ३x२ , हेक्टरी झाडे १६६६- अनुदान २ लाख २ हजार ९० रुपये , अंतर ६x४ , हेक्टरी झाडे- २७७ , अनुदान- ६३ हजार २५३ रुपये.

3. फळबाग संत्रा - अंतर ६x३ , हेक्टरी झाडे ५५५ अनुदान ९९ हजार ७१६ रुपये.

हे देखील वाचा »  आधार कार्ड अपडेट कसे करावे I अपडेट करा घरबसल्या

4. फळबाग संत्रा , मोसंबी व का . लिंबू- अंतर ६x६ , हेक्टरी झाडे २७७ अनुदान ६२ हजार ५७८ रुपये . • फळबाग सीताफळ अंतर ५x५ , हेक्टरी झाडे ४००- अनुदान ८३ हजार ६३१ रुपये

5. फळबाग आवळा- अंतर ७४७ , हेक्टरी झाडे २००- अनुदान ४ ९ हजार ७३५ रुपये. 


ऑनलाईन संकेतस्थळ : https://mahapocra.gov.in/

अधिक माहितीसाठी - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , उप विभागीय कृषि अधिकारी , तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड योजना 

Previous Post Next Post