दिव्यांगांना मिळणार राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ


केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना समान संधी व हक्क प्रदान केलेले आहेत . अशा प्रदान करण्यात आलेल्या समान संधी व हक्काच्या आधारे दिव्यांग व्यक्तींना सामाजिक , आर्थिक व स्व उत्थानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास तसेच सामान्य व्यक्तींप्रमाणे सुसह्य जीवन जगण्यासाठी योग्य अशा संधी उपलब्ध करुन देणेबाबतची तरतूद केली आहे . त्या अनुषंगाने वाचा मधील क्र .०४ अन्वये महाराष्ट्र शासनाने राज्याचे दिव्यांग धोरण अंमलात आणलेले आहे .government schemes for handicapped in maharashtra

             यापूर्वी अस्तिवात असलेला अपंग व्यक्ती ( समान संधी , हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग ) अधिनियम १ ९९५ अधिक्रमित करण्यात आला असल्याने सदर कायद्यातील तरतुदीनुसार दिव्यांगत्वाच्या एकूण ०७ प्रवर्गासह दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम , २०१६ मध्ये दिव्यांगत्वाच्या एकूण २१ प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे . 

हे देखील वाचा »  गाई,म्हशी लम्पी व्हायरसमुळे रोगग्रस्त I करा हे उपाय
government schemes for handicapped in maharashtra

नव्याने दाखल झालेले २१ दिव्यांग प्रवर्ग खालीलप्रमाणे

  1. Loco Motor Disability ( अस्थिव्यंग ) 
  2. Leprosy Cured Person ( कुष्ठरोग निवारित / मुक्त ) 
  3. Cerebral Palsy ( मेंदुचा पक्षाघात )
  4. Dwarfisrm ( शारिरीक वाढ खुंटणे )
  5. Muscular Dystrophy ( स्नायुंची विकृती )
  6. Acid Attack Victims ) आम्ल हल्ला पिडीत 
  7. Blindness ( पुर्णत : अंध ) 
  8. Low Vision ( अंशत : अंध ) 
  9. Hearing impaired ( Deaf and hard of Hearing ) ( कर्णबधीर / ऐकू कमी येणे )
  10. Speech and Language Disability ( वाचा / भाषा दोष )
  11. Intellectual Disability ( बौध्दिक अक्षम ) 
  12. Specific Learning Disability ( विशिष्ट अध्ययन अक्षम )
  13. Autism Spectrurn Disorder ( स्वमग्न ) 
  14. Mental Behavior / Mental illness ( मानसिक वर्तन / मानसिक आजार ) 
  15. Multiple Sclerosis ( हातापायातील स्नायू कमजोर / शिथिल होणे )
  16. Parkinson's disease ( कंपवात ) 
  17. Haemophilia ( अधिक रक्तस्त्राव ) 
  18. Thalassemia ( रक्तांची कमतरता ) 
  19. Sickle Cell Disease ( रक्ताचे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे .)
  20. Chronic Neurological Condition ( मज्जासस्थेचे तीव्र आजार )
  21. Multiple Disabilities ( बहुविकलांग ) 

government schemes for handicapped in maharashtra

शासकीय कार्यालयांकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेच दिव्यांगत्वाच्या ७ प्रकारांमध्ये येणाऱ्या व्यक्तींनाच शासनाच्या योजना / सवलती इ . चा लाभ देण्यात येत असल्याने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील समाविष्ट झालेल्या २१ दिव्यांगत्वाच्या प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन व तत्सम यंत्रणाच्या योजना , सवलती , लाभ , अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेताना अडचणी / समस्या येत असल्याबाबतच्या तक्रारी दिव्यांग व्यक्तींच्या संघटना / संस्था / पालकांच्या संघटना व दिव्यांग क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती यांच्याकडुन संबंधीत नवीन अधिनियम २०१६ लागू झाल्यापासून सातत्याने प्राप्त होत आहेत.

हे देखील वाचा »  Whats App वपरताय होऊ शकतो गुन्हा दाखल

शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या अखत्यारितील दिव्यांगांच्या कल्याणार्थ अंमलात असलेल्या योजना , उपक्रम व तत्सम यंत्रणाच्या योजना , सवलती , लाभ , अनुदान वा तत्सम इतर फायदे ( शासकीय आस्थापनांतील दिव्यांगांच्या आरक्षणाच्या तरतुदी वगळता ) यांचा लाभ घेण्याकरिता उक्त २१ प्रकारातील सर्व दिव्यांग व्यक्तींना ग्राहय / पात्र करण्यात येत आहे व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे . 

government schemes for handicapped in maharashtra

दिव्यांगांना मिळणार राज्य शासनाच्या योजनांचा लाभ

1) लक्षणीय स्वरुपाचे दिव्यांगत्व धारण करणाऱ्या आणि संबंधित दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिकचे आहे . असे  असणाऱ्या व्यक्तींना सदर शासन परिपत्रकाच्या तरतुदी लागू राहतील .मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग / कार्यालये , स्थानिक स्वराज्य संस्था यांना सुचित करण्यात आले आहे की , विभागाशी संबंधित असलेल्या दिव्यांगांच्या कल्याणार्थ अंमलात असलेल्या योजना , उपक्रम , सवलती , अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरिता उक्त २१ प्रकारातील दिव्यांग व्यक्तीना ग्राहय / पात्र ठरविण्यात येणार आहे .

हे देखील वाचा »  शेततळे अस्तरीकरणासाठी मिळणार अनुदान I 75 टक्के अनुदान

2) कृषीविषयक योजना , गृहनिर्माण विषयक , दारिद्र्य निर्मुलन विषयक योजना , सवलतीच्या स्वरुपात जमीन वाटप व इतर विकासात्सक योजनांमध्ये दिव्यागासाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे  .

3) तसेच शासनाच्या दिव्यांगांना सध्या सुरु असलेल्या योजना तशाच सुरु राहतील .

4) ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरुपी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक आहेत , त्यांना शासनाच्या कायमस्वरुपी लाभाच्या योजनांचे लाभ अनुज्ञेय राहतील . 

5) तर ज्या दिव्यांग व्यक्ती ठराविक कालावधीकरिता दिव्यांग प्रमाणपत्र धारण करतात , त्या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रातील नमुद कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात अंमलात असलेल्या योजनांचे लाभ अनुज्ञेय राहतील .

government schemes for handicapped in maharashtra

6) वरील नियम हे शासनाचे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग त्यांचे नियंत्रणाखालील सर्व विभाग / कार्यालये , अंगीकृत उपक्रम , महामंडळे , शासकीय वित्तीय संस्था , अनुदानित संस्था , स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम , २०१६ , दि .१९ .०४.२०१७ रोजी लागू झाल्यापासून लागू राहणार आहे.

7) सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०९१३१५४८४६०२२२ असा आहे .


Previous Post Next Post