राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सुरू Application for Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme

 


सन २०२२-२३ या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra
महाराष्ट्र शासन प्रत्येक वर्षी राज्यातील अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहित) १०० विद्यार्थ्यांना देशातील भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या http://mhrd.gov.in/institutions या संकेतस्थळा वरील मान्यता प्राप्त AIIMS, IIM, IT, HITS, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges तसेच शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "ब" मध्ये नमूद शैक्षणिक संस्थांच्या इतर शाखा / उपशाखा असल्यास तसचे भविष्यात सदर शैक्षणिक संस्थांच्या इतर शाखा/उपशाखा निर्माण झाल्यास त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सदरहू योजना लागू राहील. या नामांकित संस्थामधील पदवी / पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका (आय. आय. टी. मधील प्रिपरेटरी कोर्स वगळुन पुर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार सन २०२२ २०२३ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहित) विद्यार्थ्यांकडून वार बुधवार दि. १२/१०/२०२२ सायंकाळी ६.१५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
 
Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra

 

अटी व शर्ती पूर्ण करणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील


१. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.

२. विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या/ केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या/ केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.

हे देखील वाचा »  कुक्कटपालन साठी मिळणार अनुदान I पात्रशेतकर्‍यांना मिळणार लाभ

३. या शिष्यवृत्तीसाठी विहीत केलेल्या विद्यापीठ/संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

४. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्याथ्र्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील. 

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra


५. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्याथ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे सन २०२१ २०२२ या आर्थिक वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न र ६.०० लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

६. विद्यार्थ्याचे पालक नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. १६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांनी दिलेले मागील अर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणान्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

७. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी ( तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांनी दिलेले मागील अर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आवश्यक  

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra

(अ) या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडल अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता १० वी व १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

(आ) या योजनेंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे इयत्ता १२ वी च्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांने इयत्ता १२ वी च्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील.

(इ) तसेच, पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परिक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्यांने डिप्लोमाच्या परिक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहिल.

(ई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीकरीता पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांने पदवी परीक्षेमध्ये किमान ५५ टक्के गुण (संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीतील सर्व सत्रांच्या एकूण प्राप्त गुणांची टक्केवारी) मिळविणे आवश्यक राहील. तसेच, CGPA व GPA च्या बाबतीत संबंधित विद्यापीठाचे टक्केवारी रुपांतरण प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

हे देखील वाचा »  श्रम योगी मानधन योजना I श्रमिकांना मिळणार 3000 रु महिना

(उ) संबंधित अर्जदार विद्यार्थी हा या योजनेअंतर्गत विहीत केलेल्या संस्थांमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांसाठी त्या त्या संस्थांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेशित झालेला असावा.

टीप : (१) १०० विद्यार्थी संख्येच्या मर्यादेच्या अधिन राहून एखाद्या परिक्षा मंडळामध्ये कमी विद्यार्थी पात्र ठरल्यास दुसऱ्या मंडळातील विद्यार्थ्याची गुणानुक्रमानुसार अंतर्गत परिवर्तनाने बदल करून निवड 'करण्याचे अधिकार निवड समितीस राहतील.Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra


(२) इतर परिक्षा मंडळाच्या परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारांचा विचार हा तो ज्या जिल्ह्यातून परिक्षा उत्तीर्ण झाला असेल त्या जिल्ह्यासाठीच्या विभागीय शिक्षण मंडळांतर्गत करण्यात यावा. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात येईल,

१०. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ खालील प्रमाणे असतील : (अ) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बैंक खात्यात जमा करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांने विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेला शुल्क अदा केल्याचे पुरावे आयुक्तालयास सादर करणे आवश्यक राहील.

(आ) संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच, भोजन शुल्काची सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात करण्यास पात्र असतील.

(इ) जे विद्यार्थी वसतिगृहात जागेअभावी अन्यत्र राहात असतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या वसतिगृह शुल्क व भोजन शुल्क रक्कमेच्या मर्यादेत सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या अधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास पात्र असतील.

(ई) जे विद्यार्थी डे स्कॉलर म्हणून शिक्षण घेत असतील त्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील गटानुसार निर्वाह भत्ता सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बैंक खात्यावर जमा करण्यास पात्र असतील.

(उ) योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी ५,०००/- व शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण ५,०००/- अशी एकूण र १०,०००/- प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात अदा करण्यात येईल. यासाठीचा तपशिल संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत विहित नमुन्यात आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक असेल.
 
Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra

 

इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे

(१) महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परिक्षा मंडळाच्या विभागीय मंडळाच्या एखाद्या परिक्षेत्रातून संबंधित शैक्षणिक वर्षामध्ये विहित विद्यार्थी संख्या उपलब्ध झाली नाही तर अन्य विभागीय परिक्षा मंडळातून तेवढ्या संख्येच्या विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.

(२) संबंधित निवड वर्षामध्ये योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०० पेक्षा कमी असल्यास व शासन निर्णय क्र. इबीसी-२०१७/प्र.क्र.४०२/ शिक्षण-१, दि. ८ नोव्हेंबर, २०१८ व शासन शुध्दीपत्रक क्र. इबीसी-२०१७ /प्र.क्र. ४०२ / शिक्षण-१, दि. १९ मार्च, २०१८ परिशिष्ट- "ब" येथील संस्थामधील प्रवेशित अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनी द्वितीय किंवा पुढील वर्षी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असल्यास त्यांचे अर्ज योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे विचारात घेता येतील.

(३) वरील (१) व (२) प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर संबंधित निवड वर्षामध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्याथ्र्यांची संख्या १०० पेक्षा कमी असल्यास शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेता येतील व त्यांच्या बाबत किमान गुणवत्तेची अट शिथिल करण्यात येईल. मात्र, उर्वरित अटी व शर्ती या कायम राहतील.

(४) या योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्ज करेल त्यावर्षी तो पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला (अर्जदार विद्यार्थी डिप्लोमाधारक असेल तर तो पदवीच्या दुसऱ्या वर्गाला शिकत असला पाहिजे.

हे देखील वाचा »  आधार मतदान कार्ड लिंक कसे करावे?

 (५) या योजनेअंतर्गत संपुर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यार्थी एक वेळ अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण झालेल्या वर्षाची शिष्यवृत्ती त्यास देय ठरणार नाही. परंतु, संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यास पुढील शिष्यवृत्ती देय ठरेल. तसेच संबंधित विद्यार्थी अभ्यासक्रम कालावधीत दोन वेळा अनुत्तीर्ण झाल्यास पुढील कालावधीची शिष्यवृत्ती देय होणार नाही.
 

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पध्दती

या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी या निवेदनासोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज नमूद विहित कालावधीत समक्ष / पत्राद्वारे आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे सादर करावा.Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme maharashtra,

(अ) शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्याने पुढील कागदपत्र जोडणे आवश्यक आहे

(0) महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र,

() जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला) तसेच, जात वैधता प्रमाणपत्र, (i) फॉर्म नं.१६, उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला व आयकर विवरण

पत्र परिच्छेद (इ) (२) व (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, (v) इयत्ता १२ वीचा शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला,

(M) संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र,

हे देखील वाचा »  Whats App वर करा कागदपत्रे डाऊनलोड I ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन कार्ड,आधार कार्ड

 (vi) आधार कार्ड, पैन कार्ड (पालकाचे) व आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल.

(vii)संपुर्ण गुणपत्रिका, इ.१२वी / डिप्लोमा/ पदवी इत्यादी परिक्षांच्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिका

इतर नियम

1. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी १०० पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास पुन्हा जाहिरातीद्वारे अर्ज मागवुन १०० विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ण करण्यात येईल.

2. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. तसेच, विद्यार्थ्याला संबंधित संस्थेत मिळणारे विद्यावेतन, फेलोशिप अन्य कोणतेही लाभ अभ्यासक्रम कालावधीत मिळत असल्यास ते वजा करून उर्वरित शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

अर्ज डाऊनलोड करा



3. विहीत केलेल्या विद्यापीठ / संस्थांमध्ये प्रवेशित अभ्याक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेला अभ्यासक्रम विहीत कालावधीत पुर्ण करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल.

4. अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम संबंधित विद्यार्थी/ पालक/ कुटुंबाकडुन वरील अधिनियमाद्वारे वसूल करण्यात येईल.

5. विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती मिळण्यासाठी चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचे आढळून आल्यास तो फौजदारी गुन्ह्याखाली कारवाईस पात्र ठरेल व त्याला अदा करण्यात आलेली शिष्यवृत्ती महसूली अधिनियमाखाली वसूलपात्र राहील.

6. या योजनेअंतर्गत निवड केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम निवडी बाबतचे आदेश शासन स्तरावरुन निर्गमित करण्यात येतील.

7. सदर शिष्यवृत्तीच्या बाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला निर्णय अंतिम असेल.


Previous Post Next Post