लम्पी रोगामुळे जनावरे मृत्यूमुखी पडल्यास मिळणार आर्थिक मदत

 


लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे . राज्यात दि .४.०८.२०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमतः गोवंशीय पशुधनात विषाणूजन्य लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे .त्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे . राज्यातील उद्भवलेला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना याबाबत दि . १२.० ९ .२०२२ रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्रिमंडळास वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली होती .

maharashtra-to-provide-compensation-for-death-of-animal-livestock-due-to-lumpy-skin-disease

 

लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी / पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे १०० टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत तसेच सदर बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे मंत्रिमंडळाने निर्देश दिलेले आहेत . मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.



आर्थिक मदत मिळण्यासाठी नियम व अटी

1) ज्या शेतकरी / पशुपालक यांच्याकडील पशुधन लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे , अशा शेतकरी / पशुपालकांनी याबाबतची सूचना तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात / संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे .

हे देखील वाचा »  शेततळे अस्तरीकरणासाठी मिळणार अनुदान I 75 टक्के अनुदान


2) संबंधित शेतकरी / पशुपालक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक , ग्रामसेवक / तलाठी , पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरीक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा शेतकऱ्याने पंचनामा करून घ्यावयाचा आहे . 


maharashtra-to-provide-compensation-for-death-of-animal-livestock-due-to-lumpy-skin-disease 

 
3) पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख केलेला असणे आवश्यक आहे .
 
4) सदरचा पंचनामा संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन , तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे किंवा तालुकास्तरावर ही संस्था नसल्यास लगतच्या तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन , तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे तात्काळ शक्यतो त्याच दिवशी सादर करने आवश्यक राहील.



5) त्यानंतर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन , तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय हे सदरचा पंचनामा अर्थसहाय्यास मंजूरी देण्यासाठी उपरोक्त प्रमाणे गठीत केलेल्या समितीचे सदस्य सचिव सहायक आयुक्त पशुसंवर्धन , जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांच्याकडे त्वरीत पाठवतील .


maharashtra-to-provide-compensation-for-death-of-animal-livestock-due-to-lumpy-skin-disease
6)मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने शेतकरी / पशुपलाकांकडील पशुधन लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळेच मृत्यू पावला असल्याची प्राप्त पंचनाम्याच्या आधारे खातरजमा करून , संबंधित शेतकरी / पशुपालक यांना अर्थसहाय्य मिळणेस्तव तशी शिफारस एक आठवड्याच्या आत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे मंजूर करुन पाठवावी लागेल .

हे देखील वाचा »  299 रु मध्ये 10 लाखाचा फायदा I आजच गुंतवा या योजनेत पैसे


7) मंजूर झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी अर्थसहाय्याची रक्कम संबंधित शेतकरी / पशुपालक यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसांच्या आत थेट डीबीटीव्दारे जमा करावी .

8)सदर बाबीवर येणारा खर्च सन २०२२-२३ मध्ये या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “ राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ०६/०४/०२ दुधाळ संकरीत गायी / देशी गायी / म्हशींचे गट वाटप करणे या सर्वसाधारण राज्यस्तरीय योजनेसाठी अर्थसंकल्पीत एकूण निधी रु . ३२.५० कोटीपैकी ३५ टक्के निधी वितरणास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे.



9) पशुधनाची हानी झाल्यास आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्याने आपले बँक खाते चालू स्थितीत व आधार लिंक केलेले असले पाहिजे

maharashtra-to-provide-compensation-for-death-of-animal-livestock-due-to-lumpy-skin-disease 

 शेतकरी / पशुपालक यांच्या मृत पशुधनास देण्यात येणारी रक्कम

अ.क्र मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकार अर्थसहाय्याची रक्कम ( प्रति जनावर ) अर्थसहाय्याची प्रति कुटूंब मर्यादा
1 2 3 4
2
दुधाळ जनावरे गाय व म्हैस रु .३०,००० ३ मोठी दुधाळ जनावरे ( पर्यंत )
3 ओढकाम करणारी जनावरे ( बैल ) रु .२५,००० ३ ओढकाम करणारी मोठी जनावरे ( पर्यंत )
4 वासरे रु .१६,००० ६ ओढकाम करणारी लहान जनावरे ( पर्यंत )

Previous Post Next Post