आता मोबाइल द्वारे करता येईल ऊसनोंदणी,ऊस नोंदणी काशी करायची स्टेप बाय स्टेप

चालू वर्षी राज्यात १३४३ लाख मेट्रिक टन इतके विक्रमी ऊसगाळप अपेक्षित आहे . ऊसनोंदणीच्या कामी साखर आयुक्तालयाने ऊसाची नोंदणी करण्यासाठी' महा- ऊसनोंदणी ॲप विकसित केलेले आहे . ते शेतकऱ्यांना वापरासाठी अत्यंत सुलभ असून , सोमवारपासून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे . ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड करून त्यावरून आपल्या चालू हंगामातील ऊसक्षेत्राची माहिती भरावी लागेल . ॲपमध्ये ऊसलागवडीचा जिल्हा तालुका , गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊसक्षेत्राची माहिती भरावी . 

----------xxxxxxxxxx-------------------

त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ७ ऊसनोंदणीसाठी कळवायचे , यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील . आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल . त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊसनोंदणीची पाहता येईल . या ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील १०० सहकारी व १०० खासगी अशा एकूण २०० कारखान्यांकडे ऊसनोंदणीची माहिती पाठवू शकणार असल्याची माहिती साखर सहसंचालक ( विकास ) पांडुरंग शेळके यांनी दिली . सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत अॅपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी विकास जगताप म्हणाले , ' ऊसनोंदीचा अॅप मराठीत असून , वापरण्यास सुलभ आहे . शिवाय तांत्रिकदृष्ट्या तो सोपा व त्यामध्ये माहिती भरण्यास सोपा असल्याने आम्ही ऊसनोंदणी करू शकलो . '

--------xxxxxxxx---------

ऊस नोंदणी ॲप कसे वापरावे

महा - ऊस नोंदणी साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी ऊस पिक नोंदणीसाठी " महा - ऊस नोंदणी " हे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहेत . यामार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही . असे शेतकरी या मोबाईल अॅप मार्फत स्वतःच्या ऊस क्षेत्राची नोंद करू शकतात . तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊस क्षेत्र नोंद केली आहे , त्यांच्या नोंदणीची माहिती या अॅप मध्ये दिसून येईल .


मोबाईल ॲप वापरण्याबाबत सूचना सर्व प्रथम गूगल प्ले स्टोअर मधून " महा - ऊस नोंदणी ( Maha - US Nondani ) " हे अॅप डाउनलोड करून घ्यावे . खालील QR Code आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून आपण Google Play Store वरती जाऊ शकता . अॅप डाउनलोड केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्याकडील चालू हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती नोंदविण्यासाठी येथे Click करा . " ऊस क्षेत्राची माहिती भरा " असे दिसून येईल . त्या ठिकाणी आपण बटन दाबावे .

 

------xxxxxxxxx-------


त्यानंतर ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती " हे पेज दिसून येईल . त्यामध्ये क्रमाने माहिती भरावी मोबाईल नंबर , आधार नंबर पहिले नाव , मधले नाव , आडनाव भरावे . त्यांनतर “ पुढे ” हे बटन दाबावे . यानंतर " ऊस क्षेत्र असलेल्या ठिकाणाची माहिती " हे पेज दिसून येईल . या ठिकाणी आपण प्रथम जिल्हा निवडावा , नंतर तालुका निवडावा , यानंतर गाव निवडावे . शेवटी गट नंबर / सर्वे नंबर टाकावा . यानंतर " पुढे " हे बटन दाबावे .


यानंतर आपणास धन्यवाद .. ! असा मेसेज दिसून येईल व आपण निवडलेले संबंधित साखर कारखाने आपणास संपर्क साधतील . यानंतर आपणास साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी " असे दिसून येईल या ठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदविलेला मोबाईल नंबर भरावा नंतर " पुढे " या बटनावर क्लिक करावे .




यानंतर या ठिकाणी आपणास आपण अॅपमध्ये प्रविष्ट केलेली ऊस नोंद साखर कारखान्याने स्वीकारलेली ऊस नोंद साखर कारखान्याने नाकारलेली ऊस नोंद दिसून येईल



Previous Post Next Post