शेततळे अस्तरीकरणासाठी 75% अनुदान Shettale Astrikaran Anudan Yojana

Shettale Astrikaran Anudan Yojana

 शेततळे अस्तरीकरणास 75 हजारांपर्यंत अनुदान सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकरी शेत तळ्याच्या अस्तरीकरणासाठी अर्ज करू शकतात.या योजनेसाठी सरकार शेत तळे अस्तरीकरणासाठी शेतकर्‍यांना अनुदान देत असते.

एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत वैयक्तीक शेततळे अस्तरीकरणासाठी योजना 

Shettale Astrikaran Anudan Yojana 2022

हे देखील वाचा »  ऊस नोंदणी आता मोबाइलवर I असे करा नोंद
 

योजनेचे स्वरुप 

फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागांमध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे . 

{Shettale Astrikaran Anudan Yojana}

योजनेच्या अटी 

मागेल त्याला शेततळे , मनरेगा , राष्ट्रीय कृषी विकास योजना , इतर योजना स्वखर्चाने खोदकाम केलेल्या तळ्याना प्लास्टिक अस्तरीकरण करणारे शेतकरी या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत . 


योजने अंतर्गत लाभ {Shettale Astrikaran Anudan Yojana}

आकारमान खर्च देय अनुदान
१५ x १५ x ३ 56,551 रु 28,275 रु
२०x१५ x ३ 63,196 रु 31,598 रु
२०x२० x ३ 82,436 रु 41,218 रु
२५ x २० x ३ 99,382 रु 49,671 रु
२५ x २५ x ३ 1,17,399 रु 58,700 रु
३० x २५ x ३ 1,35,457 रु 67,728 रु
३० x ३० × ३ 1,56,127 रु 75,000 रु

हे देखील वाचा »  गाई,म्हशीवर येतोय लम्पी व्हायरस I अनेक जनावरे रोगग्रस्त lampi virus treatment

संपर्क अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , उप विभागीय कृषि अधिकारी , तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा . 

Shettale Astrikaran Anudan Yojana: शेततळे अस्तरीकरण 75% अनुदान

राज्यात शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ह्या वर्षी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणाला शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे, अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच पाणी टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर होण्यासाठी अस्तरीकरणाला 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार 28 हजारांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत तळ्याच्या आकारानुसार अस्तरीकरणाला अनुदान मिळेल.

हे देखील वाचा »  सर्वांचे रेशनकार्ड बंद होणार I आजच हा फॉर्म भरा

मात्र शेतकर्‍याचे फलोत्पादन क्षेत्र एक ते दोन हेक्टरच्या दरम्यान असल्यास 244 24 x 4 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान मिळेल. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच इतर शेतकरी योजनांबाबत माहिती हवी असल्यास कोणत्याही कृषी सहायक, पर्यवेक्षक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करता येईल, असे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले आहे. “Shettale Astrikaran Anudan Yojana” 


Previous Post Next Post