नवीन विहीर,जुनी विहीर दुरुस्ती अनुदानासाठी अर्ज सुरू-महाराष्ट्र योजना

 अनुसूचीत जाती ,नवबौद्ध व आदिवाशी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुसूचीत जाती,नवबौद्ध शेतकर्‍यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच आदिवाशी समाजातील शेतकर्‍यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवण्यात येत आहे.या योजनेमध्ये राज्यातील अनुसूचीत जाती व जमतीतीच्या शेतकर्‍यांना नवीन विहीर तसेच जुनी विहीर दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे.या योजमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.ज्या शेतकर्‍यांना या योजनेत भाग नोंदवायचा असल्यास त्या शेतकर्‍याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.याबाबदल सविस्तर माहिती आपण यालेखात बघणार आहोत.तर मित्रांनो लेख संपूर्ण वाचा आणि अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा .जेणेकरून अधिक शेतकरी या योजनेत सहभाग घेतील.

 

विहीर अनुदानाची सविस्तर माहिती

योजना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना (अनुसूचित जाती व जमती)
नवीन विहीर
2,50,000/-
2,50,000/-
-
जुनी विहीर दुरूस्ती
50,000/-
50,000/- -
इनवेल बोअरिंग
20,000/-
20,000/- -
पंपसंच
20,000/-
20,000/- -
वीज जोडणी आकार
10,000/-
10,000/- -
शेततळ्यांचे प्लास्टीक कागद
1,00,000/- 1,00,000/- -
सूक्ष्म सिंचन संच 90 % अनुदान
👇
👇 👇
  1. ठिबक संच
  2. तुषार संच
  1. 50,000/-
  2. 25,000/-
  1. 50,000/-
  2. 25,000/-
-
H.D.P.E / P.V.C पाईप
-
30,000/-
-
सोलर पंप (महवितरण मंजूरी आवश्यक)
30,000/-
30,000/-
-
परसबाग
-
500/-
-
 

योजनेच्या लाभाकरीता पात्रता

  1. स्वतःचे नावे 7/12 व 8 अ उतारे हे  नगरपंचायत ,नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील असणे आवश्यक 
  2. ज्या शेतकर्‍याने याआधी या योजनेचा लाभ घेतला असल्यास ते शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.
  3. नवीन विहीर ही जुन्या विहीरीपासून 500 फुटांपेक्षा जास्त अंतरावर असावे.
  4. नवीन विहीरीसाठी वरिष्ठ भू वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्याकडील पानी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.(नवीन विहीरीसाठी)

मराठी पॉइंट चॅनल जॉइन करा  

लागणारी कागदपत्रे

  1. स्वतःच्या नावे 7/12 व 8 अ उतारे
  2. अनुसूचित जाती किंवा जमतीचा दाखला
  3. तहशीलदार यांचा मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादारु.1,50,000 लाखापेक्षा कमी)
  4. आधारकार्ड
  5. आधारकार्ड लिंक असलेले बँक अकाऊंट क्रमांक
  6. 7/12 इतर हक्कडर असतील तर तर त्यांचे समंतीपत्र रु 100 च्या स्टॅम्पवर
  7. ग्रामसभा ठराव 

योजनेत सहभागी कसे व्हावे

www.mahadbtmahait.gov.in या वेबसाइटवर शेतकर्‍याने नोंदणी करावी. ऑनलाइन अर्ज भरावा,लाभार्थी ऑनलाइन निवड करण्यात येईल.अधिक महितीसाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करा

Previous Post Next Post