Ration Card new update – घरात ट्रॅक्टर, कार असेल तर रेशनचे धान्य होणार रद्द. घरोघरी होणार तपासणी:
गरीब जनतेला अन्न धान्य पुरवठा व्हावा यासाठी सरकारतर्फेप्रत्येक नागरिकांची चौकशी होणार आहे.भरपूर असे शेतकरी,नोकरदार व्यक्ती आहेत. ज्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या चांगली असूनही ते रेशनच्या धान्याचा लाभ घेत आहेत.असे सरकारच्या निदर्शनात आले आहे.त्यामुळे सरकारने चौकशीचे आदेश दिउले आहे.
आर्थिकदृष्ट्या चांगल्या असणार्या लाभर्थ्यांनी स्वतः हून रेशनचे धान्य सोडल्यास त्या धान्याचा लाभ हा गोर गरीब लोकांना देण्यात येऊ शकतो.असे रेशन धान्य दुकानदार संघटनेचे नितिन पेंटर यांनी संगितले.
तर चौकशी होणार
तलाठी यांच्या मार्फत आता घरोघरी चौकशी करण्यात येणार आहे.घरी आल्यावर तलाठी पुढील माहिती भरून घेणार आह.तुमचे घर कच्चे कीपक्के,घराची किंमत, शेतजमीन किती आहे. कुटुंबातील व्यक्ती,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे,तसेच घरात कार ,दुचाकी ,ट्रॅक्टर असणार्यांचे धान्य हे आपोआप बंद होणार आहे.
सरकारी नोकरदार , बागायती सक्षम शेती , खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार तसेच आर्थिकदृष्ट्या असणाऱ्यांनी रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा ,Ration Card new update
अन्यथा तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल , असा इशाराही त्यांनी दिला . शहर , जिल्ह्यात सध्या रेशनकार्डला आधार जोडणीचे काम सुरू आहे . जिल्हाभरात दुबार तसेच आधार न जोडलेल्या सुमारे ९० हजारहून अधिक लाभार्थी कमी केले आहेत .
या मोहिमेत रेशनवरील धान्य घेत असलेल्या उच्च श्रीमंतांनी धान्यावरील हक्क सोडावा . त्याचा वापर अन्य गरीब व गरजूंना देता येईल . याबाबत पुरवठा निरीक्षक तपासणी करत आहेत . त्यात आढळलेल्या दोषींची नावे कमी करण्यात येणार आहेत . -सुरेखा माने , जिल्हा पुरवठा अधिकारी , पुणे उत्पन्न गटातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे .
यातून केली जाणारी कारवाई टाळण्यासाठी आयकर भरणारे , तसेच उच्च उत्पन्न नागरिकांनीही माहिती द्यावी शिधापत्रिकाधारकांनी गटातील स्वत : हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी , धान्यावरील हक्क सोडावा , असे आवाहनही जिल्हा अधिकाऱ्यांनी केला आहे
नागरिकांनीही त्यांच्या माहितीतील अशा लोकांची माहिती पुरवठा विभागाकडे द्यावी . त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील . त्यासाठी गिव्ह इट App चे अर्ज सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . Ration Card new update
पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी
अनेक धनदांडगे लोक गरज नसताना तसेच त्यांची बाहेरून धान्य खरेदी करण्याची ऐपत असतानाही रेशनचे धान्य उचलत आहेत .
धान्यावरील हक्क सोडण्यासाठी हे नागरिक स्वतःहून पुढे यावेत , अन्यथा पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करून स्वस्त धान्य मिळविण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती सादर करून शिधापत्रिका मिळविल्याबद्दल थेट कारवाई करण्यात येणार आहे .
यात सहकार्य केल्यास गरीब व गरजू नागरिकांना प्राधान्याने धान्य उपलब्ध करून देण्यास मदत होईल , असेही सुरेखा माने सांगितले .Ration Card new update