मित्रांनो जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख पुन्हा पुन्हा बदलू शकता . तर ते पुर्णपणे चुकीचे आहे .आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी मर्यादा UIDAI कडून सांगण्यात आली आहे.
How many times can you change address, name and date of birth on Aadhaar Card
आधारमधील कोणते तपशील किती वेळा तुम्ही अपडेट करू शकता ते पाहू .
aadhar card correction online
1 ) लिंग बदल
जर तुमच्या आधार कार्ड मध्ये Gender चुकले असेल ,तर त्यासाठीही एक वेळची सुविधा आहे .तुम्ही ते फक्त एकदा बदलू शकता .
आधार आम आदमी का आधार
2 ) नाव
जर मित्रांनो आधार वरील तुमचे नाव चुकले असेल किवा नावात काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यावेळेस आधार फक्त दोनदा अपडेट करता येते तुम्ही आधारमध्ये तुमचे नाव फक्त दोनदा अपडेट किंवा बदलू शकता .
3) जन्मतारीख
भरूपूर लोकांच्या बाबतीत आधारवरील जन्मतारीख ही चुकलेली असते.अशावेळेस तुम्ही तुम्ही केवळ एकदाच date of birth बदलू शकता .
aadhar card correction online
4) पत्यात बदल
दुसरीकडे , जर तुम्ही पत्त्याबद्दल बोललात , तर तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता .
AADHAAR Update करण्यासाठी संपर्क कराल ?
प्रथम तुम्हाला जवळच्या आधार केंद्र कार्यालयाला भेट द्यावी लागेल किंवा help@uidai.gov.in ला ई - मेल करावा लागेल . मग तुम्हाला बदल का करायचा आहे त्याचे कारण स्पष्ट करावे लागेल . त्यानंतर त्याच्याशी संबंधित तपशील आणि त्याचे पुरावे द्यावे लागतील . तुमच्याकडे योग्य कारण असेल तरच त्याला मान्यता दिली जाईल , अन्यथा तुमची विनंती फेटाळली जाईल .
मर्यादेपेक्षा जास्त बदल करण्यासाठी काय करावे लागेल ?
जर तुम्हाला नाव , जन्मतारीख आणि लिंग अनेकवेळा बदलायचे असेल तर ते शक्य आहे ; परंतु त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती असेल तरच हा बदल करण्यात येईल.यासाठी तुम्हाला पुन्हा आधारच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल . aadhar card correction online
मोबाइल नंबर अपडेट करणे आवश्यक
जर योग्य मोबाइल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट केलेला नसेल , तर प्रथम तुम्हाला तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल . जर मोबाइल नंबर अपडेट केला असेल तर तुम्ही ऑनलाइन काही बदल करू शकता .
किती द्यावे लागेल शुल्क ?
आधार कार्डमध्ये बदल करताना तुम्हाला थोडे शुल्कही द्यावे लागेल . उदाहरणार्थ , बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये भरावे लागतील , तर डेमोग्राफिक अपडेटसाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील . रंगीत आधार डाऊनलोड करण्यासाठी ३० रुपये शुल्क भरावे लागेल .