Ativrushti Nuksan Bharpai
Ativrushti Nuksan Bharpai 2022 –maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे राज्यसरकारने शेतकर्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याबद्दल शासननिर्णय लागू करण्यात आलेला आहे.
या योजनेमध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे भरपूर नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
Ativrushti Nuksan Bharpai maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022
तसेच,राज्य सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने शेतकर्यांना मदत देण्यात येते. राज्यात जुलै, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्हयात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि. 10/08/2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.आणि शेतकर्यांना मदत देण्यात येईल असे शासननिर्णय आमलात आणण्यात आले.त्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहे. {Ativrushti Nuksan Bharpai }
सदरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश [ GR ] आज काढन्यात आला.
शासन निर्णय (GR)
जून ते ऑक्टोबर महिन्यात, 2022 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
जिरायत पिकांचे नुकसान | रू.13,600/- प्रति हेक्टर | 3 हेक्टरच्या मर्यादेत |
बागायत पिकांचे नुकसान | रू.27,000/- प्रति हेक्टर | 3 हेक्टरच्या मर्यादेत |
बहुवार्षिक पिकांचे नुकसान | रू.36,000/- प्रति हेक्टर | 3 हेक्टरच्या मर्यादेत |
शासननिर्णय अटी व सूचना
1) तसेच, जून ते ऑक्टोबर महिन्यात 2022 या कालावधीकरिता शेतीपिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त इतर बाबीकरीता संदर्भाधीन क्र. 2 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढीव दर लागू करण्यास शासनाची आता मान्यता देण्यात आली आहे.
2) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यक्तीरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात येणार आहे. Ativrushti Nuksan Bharpai
Ativrushti Nuksan Bharpai
3) मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकाचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान देय राहणार आहे.
4) पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरीत केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये.
5) लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. तसेच लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या ndmis.mha.gov.in या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी असे सांगण्यात आले आहे. “Ativrushti Nuksan Bharpai “
शेतकऱ्याना कोणत्या कालावधीतील अतिवृष्टी व पूर यांसरख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मदत मिळणार आहे?
शेतकऱ्याना जून ते ऑक्टोबर महिन्यात, 2022 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर यांसरख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मदत मिळणार आहे?
शेतीपिकाचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये शेतकऱ्यांना किती वेळी अनुदान देय राहणार आहे?
शेतीपिकाचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान देय राहणार आहे.