Kukut Palan Anudan Yojana Maharashtra marathi point
Kukut Palan Anudan Yojana Maharashtra – कुक्कुटपालन’साठी मिळणार २२७८ शेतकऱ्यांना अनुदान. ३३ कोटी ४३ लाख रुपयांचा होणार लाभ.
राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच एक पूरक व्यवसाय सुरू व्हावा यासाठी राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी अनुदान देण्यात येणार आहे.यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 1 हजार कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील 2 हजार 278 शेतकरी तसेच इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 33 कोटी 43 लाखाचे अनुदान दिले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय उदिष्ट राज्यसरकारकडून निश्चित करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना 50 टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. {Kukut Palan Anudan Yojana Maharashtra}
अनुदान देण्यासाठी यावर्षी राज्य सरकार कडून मागील वर्षापेक्षा अधिक लाभाची तरतूद केली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा लाभार्थी संख्या अधिक पटीने वाढली आहे.कुक्कुटपालन व्यवसायाच्या उभारणीसाठी योजनेतून अनुदान मिळावे, या साठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी l लाखभर शेतकऱ्यांनी या योजवाठी अर्ज केले होते. मागील वर्षीपासून ऑनलाइन अर्ज करण्याला सुरुवात झाली. ज्यां शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते तोच अर्ज पाच वर्षे चालेल. योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1 लाख 12 हजार 500 तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना 1 लाख 68 हजार 750 रुपये अनुदान दिले जात आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सरकारद्वारे सोडत पद्धतीने (लॉटरी पद्धत) लाभार्थी निवडले जातात. Kukut Palan Anudan Yojana Maharashtra
जिल्हानिहाय लाभार्थी अनुदान
अ. क्र | जिल्हा | लाभार्थी संख्या | अनुदान रक्कम (रू) |
---|---|---|---|
1 | ठाणे | 28 | 38,27,000 |
2 | पालघर | 25 | 29,77,000 |
3 | रायगड |
36 | 47,13,000 |
4 | रत्नागिरी | 30 | 39,99,000 |
5 | सिंधुदुर्ग | 30 | 27,28,000 |
6 | पुणे | 120 | 1,82,80,000 |
7 | सातारा | 81 | 1,16,96,000 |
8 | सांगली | 77 | 1,13,04,000 |
9 | सोलापूर | 112 | 1,85,97,000 |
10 | कोल्हापूर | 104 | 1,54,16,000 |
11 | नाशिक | 94 | 1,29,33,000 |
12 | धुळे | 36 | 49,73,000 |
13 | नंदुरबार | 26 | 31,63,000 |
14 | जळगाव | 92 | 1,30,92,000 |
15 | अहमदनगर | 134 | 1,97,60,000 |
16 | अमरावती | 91 | 1,38,27,000 |
17 | बुलठाणा | 102 | 1,56,67,000 |
18 | यवतमाळ | 77 | 1,13,40,000 |
19 | अकोला | 63 | 97,10,000 |
20 | वाशीम | 51 | 78,60,000 |
21 | नागपूर | 66 | 97,15,000 |
22 | भंडारा | 43 | 64,19,000 |
23 | वर्धा | 34 | 50,14,000 |
24 | गोंदिया | 37 | 60,65,000 |
25 | चंद्रपूर | 56 | 80,01,000 |
26 | गडचिरोली | 33 | 43,35,000 |
27 | औरंगाबाद | 76 | 1,10,91,000 |
28 | जालना | 65 | 96,45,000 |
29 | परभणी | 50 | 76,56,000 |
30 | बीड | 82 | 1,20,82,000 |
31 | लातूर | 94 | 1,45,30,000 |
32 | उस्मानाबाद | 61 | 91,60,000 |
33 | नांदेड | 123 | 1,87,62,000 |
34 | हिंगोली | 49 | 66,82,000 |
TOTAL | 2278 |
तरी अनुदान देण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जर आपण ऑनलाइन पद्धतीने महा बीएमएस या पोर्टल वरती अर्ज केले असतील. तर ते पुढील पाच वर्षांसाठी प्रतीक्षा यादी मध्ये असणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला पुढील वर्षी देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1 लाख 12 हजार 500 रुपये. तसेच अनुसूचित जाती जमातीतील एक लाख 68 हजार 750 रुपये अनुदान ही दिले जात आहे. तर सोडत पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत ?, आणि त्यांना किती निधी दिला जाईल हे पाहण्यासाठी वरती देण्यात आलेली माहिती आपण पहावी.
मर्यादा वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी
ही कुक्कुटपालन योजना अन्य विभागामार्फतही राबवली जात होती. त्यात पक्ष्यांची संख्या आणि अनुदान अधिक होते. आता ते कमी केले आहे. मात्र शेतकन्यांच्या मागणीचा विचार करता मर्यादा, तसेच लाभार्थी वाढावेत म्हणून अनुदान वाढवण्याची गरज असल्याचे शेतकयांचे मत आहे. “Kukut Palan Anudan Yojana Maharashtra”
Online अर्ज -इथे क्लिक करा