शेतीवर लागणारे विविध कर भरण्यासाठी तुम्हाला तलाठ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही.आता सर्व कर शेतकरी बांधव स्वतच्या मोबाईल मधून भरू शकतात.मोबाईल मधील फोन पे ,गूगल पे किंवा इतर UPI नेटवर्कच्या माध्यमातून शेतीवरील कर भरू शकतात.यामुळे तलाठ्याकडे जाण्याचा शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल.भूमी अभिलेख विभागाच्या ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या पिकाच्या क्षेत्रानुसार करविषयक ऑनलाईन माहिती घेऊन शेतकरी ऑनलाईन पद्धतीने सर्व कर भरू शकतात.राज्यातील जवळपास 356 तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात याची प्रथम चाचणी सुरू झाली आहे.लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना महाराष्ट्र सरकार लागू करणार आहे.
राज्यात मागील वर्षी भूमी अभिलेख विभागाने ई पीक ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदणी करण्यास सुरुवात केली.त्याला आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे.या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये भूमी अभिलेख विभागाला ई पीक पाहणी ॲपमधे अनेक नवीन बाबी समावेश करण्याची संधी मिळाली.त्यानुसार आता भूमी अभिलेख विभागाने या ॲप मध्ये अनेक नवीन सुधारणा केल्या आहे.आता नवीन बाबी 1 ऑगस्ट रोजी ॲप मध्ये समाविष्ट करण्यात येईल अशी माहिती जमावबंदी v भूमी अभिलेख संचालक निरंजन कुमार सुधांशू यांनी दिली आहे .
ई पीक पाहणी ऑटो approved,फसवणुकीला बसेल आळा
ई पीक पाहणी ॲपमध्ये भूमी अभिलेलख विभागाने अनेक सुधारणा केल्या आहेत.आता ई पीक पाहणी नोंदवल्यानंतर 90 % ई पीक पाहणी ऑटो ॲपृव्ह पद्धतीने होईल.उरलेल्या 10 % पीक नोंदणीची तलाठ्यांकडून पाहणी करण्यात येईल.पीक नोंदवताना त्या पिकाचा फोटो अपलोड करावा लागेल.तो फोटो सांगितलेल्या ठराविक अंतरावरून शेतकऱ्याला घ्यावा लागेल.जास्त अंतरावरून घेतल्यास ॲप कडून शेतकऱ्याला सूचना दिली जाईल आणि पुन्हा फोटो घेण्यासाठी सांगण्यात येईल.तरी देखील शेतकऱ्याने त्यात दुरुस्ती न केल्यास त्याच्या पिकाची नोंद होणार नाही .अशा अटी आता लागू करण्यात आलेल्या आहे.
कृषीविषयक योजनांचा लाभ,कर्जप्रकरण किंवा नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याने चूकीची नोंद केल्यास त्याची देखील नोंद यावर होईल.परंतु अशा शेतकऱ्यांची पाहणी तलठ्यांमर्फत केली जाणार आहे.त्यामुळे चुकीच्या माहितीला आला बसेल व योग्य ,अचूक माहिती राज्य सरकारला मिळेल.त्यावर सरकारमार्फत योग्य तो कर लावण्यात येईल.
कृषीविषयक योजनांचा लाभ,कर्जप्रकरण किंवा नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याने चूकीची नोंद केल्यास त्याची देखील नोंद यावर होईल.परंतु अशा शेतकऱ्यांची पाहणी तलठ्यांमर्फत केली जाणार आहे.त्यामुळे चुकीच्या माहितीला आला बसेल व योग्य ,अचूक माहिती राज्य सरकारला मिळेल.त्यावर सरकारमार्फत योग्य तो कर लावण्यात येईल.
ऑनलाइनचे फायदे
- ई पीक पाहणीच्या ॲपला नवीन आवृत्तीत ई चावडी प्रकल्प जोडण्यात आला आहे.
- शेतकऱ्याला जमिनीवर असलेला शेतसारा,शिक्षण उपकर,जिल्हा परिषद कर,रोजगार हमी कर अशा विविध करांचा भरणा घरबसल्या करण्यात येईल.
- तसेच महसूल भरणा देखील ऑनलाईन होईल.
- नवीन ॲपच्या माध्यमातून पिकाच्या नोंदीमुळे शेतीवर किती कर आहे हे शेतकऱ्याला ॲपमध्येच समजेल.
- शेतकऱ्याला तलाठ्याकडे मारावे लागणार हेलपाटे कमी होतील.
- राज्य सरकारला देखील एका क्लिकवर किती कर जमा झाला,किती कराची वसुली बाकी आहे याची माहिती मिळेल.
- एखाद्या शेतकऱ्याला कर्ज प्रकरण करायचे असल्यास बँकांनाही एका क्लिकवर माहिती मिळेल.
- सरकारची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना आळा बसेल.
Tags:
कृषी योजना