शेतीचा बांध कोराल तर शेतकरी व चालकावर होणार कारवाई


अनेक शेतकऱ्यांचे शेतातील बांधावरून  मोठ्या प्रमाणावर वाद विवाद होत असतात, अशावेळी बघ्यांची गर्दी जमते, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या संचारबंदी आदेशाचेही यामुळे उल्लंघन होते. अनेक शेतकर्‍यांवर दखलपात्र गुन्हेही दाखल होतात, त्यामुळे शेतकर्‍याने  शेतीची नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर, तसेच जेसीबी चालकांनी बांध न फोडता शेतातील नांगरणी रोटावेटर करावे, जर एखाद्या शेतकर्‍याने शेताचा बांध कोरलाच तर  शेतकऱ्यासोबतच ट्रॅक्टर ,तसेच जेसीबी किवा सबंधित चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल शेतीच्या मशागती दरम्यान शेतबांधाची  छेडछाड होऊन बांधावरून शेतकर्‍यांमध्ये वाद निर्माण होतो, काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडलेले आहेत.

 

शेत जमिनीचे मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो, मशागत करताना कधी कधी नजर चुकीने सुध्दा बांधाचे नुकसान होऊन वाद होतो. त्यामुळे शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता प्रत्येक शेतकर्‍याने  घ्यावी. वादग्रस्त जमिनीची मशागत करण्यापूर्वी दोन्ही गटाशी सल्ला मसलत करावी.

एखाद्या शेतीचे पुर्वीचे वादविवाद काय  आहेत किंवा कसे याबाबतची खात्री करूनच शेतकर्‍याने जमिनीची मशागत करावी, अन्यथा उद्भवणार्‍या प्रसंगामुळे शेतकरी तसेच संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या नोटिसा पोलीस ठाण्यांमधून गावोगावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मार्फतीने ट्रॅक्टर मालक व चालक यांना गावोगावी देण्यात येत असतात. त्यामुळे यापुढे ट्रॅक्टरचालकांनी व मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 

शेताचा बांध कोर कायदा

  1.  याच्यावरती सुद्धा एक कायदा आहे तर कायद्यामध्ये याच्या विषयी काही तरतूदही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार कलम तयार करण्यात आलेल्या आहेत, तर त्यातल्या  कलमांमध्ये शेताच्या हद्दी ठरवणे विषयीच्या तरतुदी केलेल्या आहेत.
  2. एखादा शेतकरी बांध कोरत असेल किंवा नुकसान करत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते.
  3. कायद्यामध्ये ठरवून दिलेल्या बांधाचे नुकसान कोणी करत असेल, कोणताही शेतकरी करत असेल तर त्याच्या विरोधात शिक्षा शेतकर्‍याला होऊ शकते, शेतकरी याची तक्रार स्थानिक महसूल अधिकारी, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी करू शकतो .जिल्हाधिकारी हे त्या शेतकर्‍याला शिक्षा करु शकतात असा त्यांना एका अधिकार आहे,
  4. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये सीमा व चिन्हे असे 9 नंबरचे एक कलाम आहे.यामध्ये शेती किवा जमिनीच्या सीमा निच्छित करणे,आणि त्या जमिनी संदर्भात असलेल्या वादाचे निराकरण करणे.
  5. तसेच जमिनीवर कोणताही वाद नसल्यास शेतकर्‍याने दाखवलेल्या जमिनीच्या सीमा निच्छित करण्यात येतील.
  6. कोणत्याही जमिनी संदर्भात वाद निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी संबंधित प्रकरणातील शेतकर्‍यांना पुरावे सादर करण्यास सांगू शकतात.आणि चूक दुरुस्त करू शकतात.
  7. एखाद्या शेतकर्‍याने भुमापन चिन्ह नष्ट केल्यास तेव्हा जिल्हाधिकारी किवा भूमापन अधिकारी संबंधित शेतकर्‍याला प्रत्येक चिन्हांसाठी 100 रु दंडाची शिक्षा करू शकतात.
 
👇 शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये ,फक्त हेच शेतकरी पात्र👇

मराठी पॉइंट चॅनल जॉइन करा  

 

सीमाचिन्हे आणि भूमापन चिन्हे

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कायद्यातील सीमाचिन्हे आणि भूमापन चिन्हे

अ.सीमाचिन्हे 

  1. सीमापट्टा,सरबां,किंवा कुंपण
  2. ओबडधोबड आकार दिलेले लांबूडके दगड
  3. दगडाचे खांब किवा सिमेंटचे खांब
  4. लोलककृती किवा आयताकृती सुट्या दगडांचा बुरूज
  5. स्थानिक परिस्थितीनुसार मान्यताप्राप्त चिन्हे

आ.भूमापन चिन्हे

  1. माथ्यावर फुली असलेले कापलेले दगड
  2. संचालकाने स्थानिक पातळीवर सांगितलेली चिन्हे


Previous Post Next Post