कर्जमुक्ती योजना ,शेतकर्‍यांनो आजच हे काम करा नाहीतर 50 हजार मिळणार नाही mahatma phule karj mukti yojana

 Mahatma Phule Karj Mukti Yojana : प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता, शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी


शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी  आधार कार्ड लिंक करून घ्यावे असं आवाहन  सरकारकडून करण्यात आले आहे.

Mahatma Phule Karj Mukti Yojana : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotirao Phule Shetkari Karj Mukti Yojana) 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. वर्ष 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 या कालावधीत कर्जाची परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभाची रक्कम 50000 रु पात्र शेतकऱ्यांच्या बचत (सेविंग) खात्यामध्ये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँक खात्याशी आधार कार्डाची जोडणी करावी, असे.ज्या शेतकर्‍यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न नसेल त्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे देखील वाचा »  MAHA DBT कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

ज्या शेतकऱ्यांनी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची बँकेच्या मंजूर नियमानुसार दिलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशा  पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांना सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आणि त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेइतका प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा »  रूफटॉप सोलर योजना I घरच्या छतावर बसवा सोलर

बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे. आधार कार्ड नाहीत अशा पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ 'आपले सरकार सेवा' केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे. ते आधार कार्ड आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावं असे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नाही, त्यांनीही बँकेच्या शाखेत संपर्क साधून आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन  केले आहे.
-
दरम्यान, या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. दरम्यान, या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळनार आहे.तरी सर्व शेतकर्‍यांनी 5 सप्टेंबर पर्यन्त बँक खात्याला आधार जोडणी करून घ्यावी.


Previous Post Next Post