आता मतदार कार्ड होणार ' आधार ' शी लिंक निवडणूक शाखेची मोहीम : १ ऑगस्ट पासून मोहीम सुरु voter card aadhar card link online

अहमदनगर - how to link aadhaar with voter id through mobile मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्याची मोहीम १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे . त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे . मतदार कार्ड आधार कार्डशी जोडणे ऐच्छिक असले तरी प्रत्येकाने मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करावे , असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले.

 

 अर्ज मिळविण्यासाठी काय कराल ? 

  1. मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ऑनलाईन च ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहेत .  voter link with aadhar online
  2. त्यामुळे मतदारांना इलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे .  
  3. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही , त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे .भरलेला अर्जही तेथेच जमा करता येणार आहे .  
  4. मतदार कार्डसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर मतदार यादी अधिक अचूक होणार आहे . त्यामुळे प्रत्येकाने मतदार कार्डसोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावे .  
  5. ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे . -जितेंद्र पाटील , उपजिल्हाधिकारी
how to link aadhaar with voter id through mobile

अर्ज क्रमांक ६ द्वारे भरा माहिती 

  1. मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ६ क्रमांकाचा • अर्ज भरावा लागणार आहे . 
  2. हा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येणार आहे .  
  3. नवीन मतदार नोंदणी करताना अर्ज क्रमांक ६ भरावा लागणार आहे , तर जुन्या मतदारांना अर्ज क्रमांक ६ व भरावा लागणार आहे .  
  4. संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध ज्यांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे . त्यांच्यासाठी अर्ज क्रमांक ६ हा स्थानिक पातळीवरील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असणार आहे.
  5.  तसेच हा अर्ज ceoelection.com, maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे .  
  6. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे . त्यांच्यासाठी तेथेच माहिती भरून अर्ज सबमिट करण्याची सुविधा असणार आहे .

आधार'चा डेटा लीक झाल्यास कठोर कारवाई होणार निवडणूक आयोगाचा इशारा

  1. मतदाराची माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर करणे आवश्यक असल्यास त्यातील आधार डेटा हटवला किंवा तो लपवला पाहिजे .  voter card aadhar card link online
  2. सुसज्ज अशा फॉर्म -६ बी च्या हार्ड कॉपीचे पाहिजे आधार नंबरने संरक्षण करण्यासाठी आधार प्रमाणीकरण व ऑफलाइन सत्यापन विनिमय -२०२२ च्या तरतुदींचे कठोरपणे पालन करावे . 
  3. मतदारांनी आधार डेटा शेअर करण्यासाठी भरलेल्या अर्जातून कोणतीही माहिती फुटल्यास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे . 
  4. निवडणूक आयोगाने दुहेरी नोंदणी हटविण्यासाठी आधारला मतदार ओळखपत्र जोडण्यास परवानगी देण्यासाठी नियम जारी केल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा दिला आहे . 
  5. मतदारांनी आधार डेटा शेअर करणे स्वैच्छिक आहे , यावरही आयोगाने भर दिला आहे . 
  6. 4 जुलै रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की , २ लोकांचे आधार नंबर प्राप्त करणारी संस्था हार्ड कॉपीच्या प्रती संग्रहित करण्यापूर्वी पहिले ८ अंक लपवून ठेवेल, 

 मतदारांकडून गोळा केलेले फॉर्म 6

  1. हा फॉर्म लीक झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल . 
  2. पुनरिक्षणाच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेऊन मतदारांकडून लिखित स्वरूपात फॉर्म ६ - बीमध्ये स्वेच्छेने आधार नंबर देण्यासाठी राजी केले जाऊ शकते . voter card aadhar card link online
  3. विधी मंत्रालयाच्या एका अधिसूचनेनुसार , अलीकडेच सादर केलेल्या फॉर्म -६ बी द्वारे मतदार आपला आधार नंबर शेअर करू शकतात . 
  4. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की , आधारचा तपशील शेअर करणे स्वैच्छिक आहे . 
  5. आधार नंबर मागण्याचा उद्देश मतदार यादीत त्याची नोंद करणे व भविष्यात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आहे , हे मतदाराला सांगण्यात यावे . 
  6. एखादा मतदार आधार नंबर देण्यास असमर्थता दर्शवित असेल तर मतदार यादीतील कोणतीही नोंद हटविली जाणार नाही .
👇पोस्टची भन्नाट योजना!  गुंतवा 299 रुपये, मिळवा 10 लाखांचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती 👇
 
 👇तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती निधी,योजना,कामे पाहा मोबाईलवर👇
 
 
Previous Post Next Post