7/12 ला मिळणार ULPIN,राज्यातील सर्व 7/12 होणार डिजिटल

राज्यातील शेतजमीन तसेच शहरातील जमिनीला आता ११ आकडी युनिक भूभाग ओळख क्रमांक यूएलपीन (ULPIN) देण्यात येणार असून त्यासोबत एक क्यूआर कोडही मिळणार आहे.त्यामुळे डिजिटल 7/12 वर पोटहिस्से आणि जमिनीचे भूभाग एकत्र येणार आहे.आणि हा डिजिटल सातबारा उतारा तुम्ही स्मार्ट फोनच्या माध्यमातून कुठेही पाहू शकतात.राज्यातील सर्व भूभागांना हा क्रमांक (ULPIN) व QR कोड देण्याचे काम येत्या महिनाभरात पूर्ण केले जाणार आहे सध्या राज्यात सध्या संगणीकृत २ कोटी ६२ लाख सातबारा तर ६० लाख प्रॉपर्टी कार्ड आहेत . या सर्व सातबारा उताऱ्याना संगणकावरील क्रमांक (ULPIN) देण्यासाठी केंद्र सरकारने ११ आकडी यूलिप अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (unique identification number) भूभाग ओळख क्रमांक देण्याचे ठरवले आहे.

डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रामअंतर्गत देशभरात हा उपक्रम राबविला जात आहे .आणि राज्यात देखील या उपक्रमा अंतर्गत शेतजमीन तसेच पोटहिस्से जमीन यांना विशिष्ट नंबर देण्यात येणार असल्यामुळे सातबारा शोधणे सोपे होणार आहे.शेतजमीन सातबारा उतारावर नोंदली जाते एका सातबारावर अनेक पोट हिस्से असतात त्यासाठी सातबारा उताराची सध्याची नोंद आठवेळा झालेली असते त्यामुळे सामान्यांना 7 12 समजण्यास अडचण येत होती.शेतकऱ्याला आपल्याकडे जमिनीचे किती भाग आहेत,हे माहीत नव्हते तसेच समजत देखील नव्हते त्यासाठीच हा ULPIN चा पहिला उद्देश सातबारा उतारा नोंदणीमध्ये सुटसुटीतपणा आणणे हा आहे .यामुळे 7/12 वाचण्यास आणि समजण्यास सोपा होईल.

महाराष्ट्रात जमिनीचे भूभाग संख्या जास्त असल्याने प्रत्येक जमिनीला ULPIN देण्याचे काम २ ते ३ वर्षे चालणार आहे.


ग्रामीण भागासाठी १ ते ४ तर शहरी भागासाठी ५ ते ९ पासून सुरुवात 

ग्रामीण भागातील बहुतांश जमिनी हळूहळू कमी होत असून,शहरी भागातील भूभाग वाढत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींसाठी१,२,३ व ४ या नंबरने सुरु होणारे क्रमांक देण्यात येणार आहे,यासाठी सुमारे ४००० कोटी क्रमांक उपलब्ध झाले आहेत.तर शहरी भागातील जमिनीचे भूभाग तुलनेने कमी आकाराचे असतात व संख्येने जास्त असतात,त्यामुळे त्यांना ५ ते ९ अंकांनी सुरू होणारे क्रमांक असतील.यासाठी ५००० क्रमांक उपलब्ध असतील.


सध्याच्या उपलब्ध असलेल्या सातबारा व प्रॉपर्टी कार्डला हा क्रमांक देऊन झाला आहे.सातबारावर फेरफार नोंद झाल्यानंतर त्याचा पोटहिस्सा तयार होतो किंवा एकत्रीकरण होते.त्यामुळे अशा नव्या भूभागांना आता नवीन क्रमांक देण्यात येणार आहे.त्यासाठी संपूर्ण सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले.

__________tele__________

जमिनीच्या सीमा निश्चितीसाठी जिओ फेन्सिंगही 


राज्यात ULPIN या क्रमांका व्यतिरिक्त सर्व भूभागांचे जिओ फेन्सिगही केले आहे.त्यामुळे प्रत्येक जमिनींना अक्षांश व रेखांश देता येणार असून त्याच्या सीमाही निश्चित करता येईल.सुरुवातीला भूभागांना Unique Identification Number दिला जाईल त्यानंतर जिओ फेन्सिंगचे काम करण्यात येणार आहे.सध्या सर्व सर्व्हे क्र . जिओ टॅग केलेले आहेत.त्यानंतरचे जमिनीच्या पोटभागाचे काम झालेले नाही.मात्र , त्याचे काम सध्या सुरू आहे .

ULPIN ( Unique Identification Number Maharashtra)

ULPIN (Unique Identification Number हा क्रमांक संगणकातून उपलब्ध होणार आहे.तो अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवला जाईल.त्या नंबरमध्ये कुणीही छेडछाड किंवा बदल करू शकणार नाही . एखाद्याने बनावट क्रमांक दिल्यास तो संगणकाच्या साह्याने ओळखता येईल . तसेच 7/12 वर असलेल्या क्यूआर कोड द्वारे स्कॅन केल्यावर सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड लगेच दिसेल त्यामुळे तुमच्याकडे मोबाईल फोन असल्यास तो कोड तुम्ही सेव्ह करू शकाल.नवीन सातबारा उतारे यूएलपीन क्रमांकासह असतील,त्याला सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

Previous Post Next Post