महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ

 

राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून ते शेती तसेच शेतीच्या कामांकरिता लागणारी अवजारे घेण्यासाठी बँका तसेच सहकारी संस्था यांच्याकडून कर्ज हे घेत असतात सन 2015-16 ते 2018-19  या सलगच्या 4 वर्षांमध्ये राज्याच्या विविध भागात दुष्काळ तसेच अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षामध्ये कर्जाची दिलेल्या मुदतीत परतफेड होऊ शकली नाही.त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी बनला आहे,त्यामुळे नवीन पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.ही परिस्थिती लक्षात घेऊन 2019 वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कमी मुदतीच्या पिक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार पर्यंत अतिरिक्त लाभ देण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.याचा निर्णय 2020 च्या अधिवेशनात करण्यात आली होती परंतु राज्यात उद्भवलेल्या covid -19 कोरोना व्हायरसमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला.राज्याची आर्थिक स्थिती बिघडली त्यामुळे ह्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

त्यानंतर 2022 च्या अधिवेशनामध्ये कमी मुदतीच्या कर्जाची परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत अतिरिक्त लाभ सरकार तर्फे देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार लाभ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.

हे देखील वाचा »  आधार कार्ड अपडेट कसे करावे I अपडेट करा घरबसल्या

योजनेचा तपशील

  1. या योजनेला "महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना" असे म्हणण्यात येईल.
  2. योजनेमध्ये 2017-18,2018-19 आणि 2019-20 या कालावधीमध्ये नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांचा विचार करण्यात येईल.
  3. 2017-18 यवर्षात घेतलेले अल्प मुदत कर्ज 30 जून 2018 पर्यन्त परतफेड केलेले असावे,2018-19 यवर्षात घेतलेले अल्प मुदत कर्ज 30 जून 2019 पर्यन्त परतफेड केलेले असावे,2019-20 यवर्षात घेतलेले अल्प मुदत कर्ज 30 जून 2020 पर्यन्त परतफेड केलेले असावे.
  4. लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत कर्जाची परतफेड रक्कम विचारात घेऊन रु 50 हजार या कमाल मर्यादेत लाभ देण्यात येईल.
  5. मागील कर्ज माफीप्रमाणे या योजनेची अंबलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.
  6. योजनेसाठी असलेल्या मार्गदर्शक सूचना या मधील बदल मा.मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार कार्यांत येईल.
  7. सदर योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ऑनलाइन फॉर्म प्रक्रिया पार पडली जाईल. 

👇👇 हे ही वाचा 👇👇

👉शेतकर्‍यांना मिळणार वीज दरात सवलत

👉 299 रु मध्ये 10 लाखाचा विमा

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अटी व नियम 

  1. कर्ज मुक्तीचा लाभ शेतकर्‍यांना देण्यासाठी वैयक्तिक शेतकरी ग्राह्य धरण्यात येईल.
  2. या योजनेससाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका ,खाजगी बँका,ग्रामीण बँका,जिल्हा मध्यवर्ती बँका व कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकरी बांधवांना दिलेले अल्पमुदतीचे कर्ज विचारात घेण्यात येईल.
  3. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्यामुळे आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी या योजनेस पात्र राहतील.
  4. एखादा शेतकरी मयत झाला असल्यास त्याच्या वारसांनी जर कर्जाची परतफेड केली असेल तर त्या शेतकर्‍याचे वारस देखील या योजनेच्या लाभास पात्र राहतील.
हे देखील वाचा »  शेतीचा बांध कोराल तर होईल कारवाई I शेती बांध कोर कायदा


मराठी पॉइंट चॅनल जॉइन करा

या व्यक्तींना लाभ मिळणार नाही

  1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी
  2. महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री,आजी/माजीलोकसभा/राज्यसभा सदस्य,आजी/माजी विधानसभा /विधान परिषद सदस्य शेतकरी
  3. केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी/कर्मचारी,(25000 पेक्षा जास्त पगार असणारे,चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  4. महावितरण,एस टी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी . 25000 पेक्षा जास्त पगार असणारे (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) 
  5. शेती बाहेरील उत्पन्नातून आयकर कर भरणारे
  6. पेन्शन मिळणारी व्यक्ती ज्यांचे पेन्शन 25000 रु पेक्षा जास्त आहे.(माजी सैनिक वगळून)
  7. कृषि उत्पन्न बाजार समिती,सहकारी साखर कारखाना,सहकारी सुतगिरणी,नागरी सहकारी बँका,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी.

Previous Post Next Post