आयटीआर फॉर्म
आयटीआर भरताना कोणता फॉर्म वापरायचा हे उत्पन्नाचे स्वरूप आणि कर भरणाऱ्या व्यक्तीच्या श्रेणी यानुसार ठरवले जाते. कर भरणाऱ्या व्यक्तीने त्याला लागू असलेला फॉर्मच निवडणे बंधनकारक आहे . चुकीचा फॉर्म वापरल्यास आयटीआर अग्राह्य (reject) केला जाईल आणि संबंधित व्यक्तीला विभागाकडून डिफेक्ट नोटीस पाठवण्यात येईल .आणि त्यानंतर झालेली ही चूक दिलेल्या मुदतीत दुरुस्त करून पाठवावी लागतेव्यक्तिगत माहिती व बँक तपशील
२०२१ २२ चे आयटीआर फाइलिंग जेएसओएन (json) युटिलिटीवर आधारित आहे . त्यात वैयक्तिक तपशील टॅक्स पोर्टलच्या आयटीआर फॉर्ममधून स्वयंचलित पद्धतीने येतो . करदात्याने व्यक्तीने टॅक्स पोर्टलमध्ये पत्ता , संपर्क क्रमांक , ई - मेल आयडी बरोबर भरावा ,घाई गडबड करू नये . बँक अकाउंटचा तपशीलही असायला हवा नाहीतर तुम्हाला रिफंड क्रेडिटमध्ये समस्या येतील .उत्पन्नाची योग्य माहिती दाखल होण्यात पारदर्शकता आणण्यास सरकारने वार्षिक माहिती निवेदन ( एआयएस ) फॉर्म सादर केला आहे . करदात्यांना फॉर्म एआयएस व फॉर्म २६ एएस यांना अनुरूप आयटीआर भरायचे असते दोन्हींतील आकडेवारीत तफावत येता कामा नये .
उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती
कर भरणाऱ्या व्यक्तीने बचत खात्यांतील व्याज , मुदत ठेवींवरील व्याज , घराचे भाडे , इत्यादी सर्व स्रोतांच्या उत्पन्नाची माहिती आयटीआरमध्ये देणे बंधनकारक आहे . काही व्यक्ती कर चुकविण्यासाठी उत्पंनाचे स्रोत लपवतात अशाने तो व्यक्ती अडचणीत येऊ शकतो .
सूट असलेल्या उत्पन्नाची माहिती देणे
संबंधित व्यक्तीला जर पीएफ मिळत असेल तर पीपीएफवरील व्याजाचे उत्पन्न , सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज , नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटी , इत्यादीं उत्पन्नाच्या स्रोतांवर प्राप्तिकर (टॅक्स) लागत नाही . मात्र यांची देखील माहिती आयटीआर भरतेवेळी देणे त्या व्यक्तीला बंधनकारक आहे . अन्यथा तुम्हाला यावर सूट मिळू शकणार नाही .
आयटीआर - व्ही पडताळणी
आयटीआर भरल्यानंतर ई - पडताळणी करावी लागते . सीपीसीला मॅन्युअल स्वरूपात हस्ताक्षर केलेली आयटीआर - व्ही प्रत पाठवावी लागते . आयटीआर - व्ही पडताळणी केली नाही , तर मेहनत फुकट जाते .
फॉरिन टॅक्स क्रेडिट क्लेमसाठी फॉर्म ६७ आवश्यक
एखाद्या व्यक्तीला विदेशातील प्राप्तिकराचे क्रेडिट क्लेम करावयाचे असल्यास आयटीआर दाखल करण्यापूर्वी फॉर्म ६७ भरणे आवश्यक आहे . याशिवाय विदेशात अदा केलेल्या सर्व करांचे (TAX) पुरावे जोडणेही आवश्यक आहे .
अशाप्रकारे तुम्ही ITR भरताना या सूचनांचे पालन केले पाहिजे ,म्हणजेच तुमचा अर्ज योग्यरीत्या भरला जाईल.आणि प्राप्तिकर डिपार्टमेंट करून कोणतीही क्वेरी तुम्हाला येणार नाही.