तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती निधी,योजना,कामे पाहा मोबाईलवर egramswaraj-gram-panchayat-nidhi-2022

नमस्कार मित्रानो तुमच्या गावात ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत किती निधी आला,आणि तो निधी चे कामे झाली का ते तुम्ही बघू शकतात ते ही तुमच्या मोबाईल वर,


केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमार्फत विविध योजना ,विकासकामे यांसाठी निधी हा ग्रामपंचायत कार्यालयासाठी दिला जातो .परंतु हे तुम्हाला माहीत नसते आणि काही ग्रामपंचायत कार्यालय वितरित केलेल्या निधीतून विकासकामे करीत नाहीत.अशा कार्यालयांना तुम्ही प्रश्न विचारू शकतात तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करू शकतात .परंतु त्यासाठी तुम्हाला सर्व निधी ,विकासकामे,योजना यांची माहिती असायला हवी.ती माहिती कशी बघायची याबद्दल माहिती आज आपण या लेखात बघणार आहोत.लेख संपुर्ण वाचा.


स्टेप 1 -  सर्वप्रथम तुम्हा ई-ग्राम स्वराज वेबसाईटवर जावे लागेल , किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ग्रामस्वराज वेबसाइटवर जाऊ शकतात.

👇👇👇 ई-ग्रामस्वराज वेबसाइटवर जाण्यासाठी 👇👇👇 

इथे क्लिक करा

स्टेप 2 - वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही काही ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग ऑप्शन शोधायचा आहे

स्टेप 3 - त्यामधे Approved GPDP ऑप्शनवर क्लिक करा.



स्टेप 4 - त्यांनतर समोर एक विंडो ओपन होईल तिथे तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे ,त्यानंतर जिल्हा आणि शेवट गाव सिलेक्ट करायचे आहे.




स्टेप 5 - त्यानंतर समोर तुमच्या गावाची सर्व लिस्ट ओपन होईल.



स्टेप 6 - त्यांनतर Section 4- Priority Wise Activity Details या ऑप्शनमध्ये कोणत्या कामासाठी किती निधी आला? त्याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला भेटेल.

अशाप्रकारे तुम्ही सर्व माहिती बघू शकतात,तसेच त्याची pdf कॉपी देखील प्राप्त करू शकतात.


Previous Post Next Post