देशातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विमा काढीत असतो.प्रत्येक व्यक्ती विमा काढू शकतोच असे देखील नाही.भरपूर कंपन्या आहेत ज्या विमा सुविधा प्रधान करीत असतात परंतु त्यांचे वार्षिक प्रिमियम देखील जास्त असते .त्यामुळे गरीब लोक यापासून वंचित राहतात.परिणामी त्यांना आर्थिक सहाय्य मिळत नाही.त्यामुळेच महागड्या प्रिमियममध्ये विमा काढू न शकणाऱ्या गरिबांसाठी पोस्ट विभागाने नवीन विमा योजना आणली आहे.या योजनेत वर्षाला 299 ते 399 रू भरून तुम्हाला 10 लाखाचा विमा मिळणार आहे.तसेच हे प्रीमियम वार्षिक आहे त्यामुळे वर्ष संपल्यावर पुन्हा विमा रक्कम भरून या विम्याचे नूतनीकरण तुम्हाला करावे लागेल.विमा काढण्यासाठी व्यक्तीचे पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते असणे अनिवार्य आहे.पोस्ट पेमेंट बँकेचा प्रत्येक खातेदार हा विमा काढू शकतो.
योजनेचे नाव | Group Accident Guard Policy Yojana |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील सर्व लाभार्थी |
उद्दिष्ट | सर्वांना कमी पैशात चांगला विमा पुरवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
प्लान | 399 रू 299 रू |
या विम्याचा फायदा काय ?
1.मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास किंवा आंशिक अपंगत्व यावर 10 लाख रुपयांपर्यंत हा विमा संरक्षण करेल.
2.299 हजार रुपयांच्या या विम्यात अपघात झाल्यास त्यावरील उपचारासाठी 60 हजार रुपयांपर्यंत IPD खर्च मिळेल.
3.तसेच OPD क्लेममध्ये 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च विमा संरक्षणमध्ये देण्यात येईल.
योजनेचा कालावधी काय आहे ?
30 जुनपासून ही विमा योजना इंडिया पोस्ट विभागाने सुरू केली आहे ,आणि 15 ऑगस्टपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक विमा प्लॅन 1 - 399 रू
1.अपघाती मृत्यू - 10 लाख रुपये2.कायमचे अपंगत्व - 10 लाख रुपये
3.दवाखान्याचा खर्च - 60 हजार रुपये
4.मुलाच्या शिक्षणासाठी खर्च - 1 लाख
5.ॲडमिट असेपर्यंत दररोज - 1000 रू(10 दिवस)
6.OPD - 30000
7.अपघाताचे पॅरालिसिस झाल्यास - 10 लाख
8.कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च - 25000 रुपये
9.वेटींग पिरियड नाही
इंडिया पोस्ट पेमेंट बँक विमा प्लॅन 2 - 299 रू
1.अपघाती मृत्यू - 10 लाख रुपये2.कायमचे अपंगत्व - 10 लाख रुपये
3.दवाखान्याचा खर्च - 60 हजार रुपये
4.मुलाच्या शिक्षणासाठी खर्च - 1 लाख
5.ॲडमिट असेपर्यंत दररोज - 1000 रू(10 दिवस)
6.OPD - 30000 रू
योजनेचे लाभार्थी
इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि टाटा एआयजी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार ,18 ते 65 वर्ष वयाच्या लोकांना याचा लाभ घेता येईल.
पात्रता काय आहे ?
1.Only For IPPB ACCOUNT HOLDERS ( पोस्ट पेमेंट बँकेचे अकाऊंट असायला हवे नसेल तर पोस्टमन काढून घ्यावे)2.वयाची अट - 18 ते 65 मध्ये वय असणे गरजेचे
3.Policy Tenure - 1 Year ( 399 रू मध्ये एक वर्ष कालावधी असेल, नंतर पुन्हा सुरू करू शकता)
PREMIUM - Rs.399 Per Annum only (एका वर्षाचे फक्त 399 रू. लागतील)
काय कव्हर होईल
1.सर्व प्रकारचे अपघात2.सर्पदंश
3.विजेचा शॉक
4.गाडीवरून पडुन अपघात
5.कायमचे किंवा आंशिक अपंगत्व
6.अर्धांगवायू
7.झाल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळेल
आणखी कोणत्या योजना आहेत
इंडिया पोस्ट खात्यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांसाठी अनेक योजना असून ,त्यामधे गुंतवणूक केल्यास मोठा फायदा आणि करसवलत देखील मिळते.