सैन्याची भरती अग्निपथ योजनेमधूनच ,अग्निपथ योजना मागे घेणार नाही - संरक्षण मंत्रालय agneepath scheme details

 


काल झालेल्या संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत अग्निपथ योजना कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही स्पष्ट करण्यात आले आहे. आता यापुढे सैन्याची भरती ही याच योजनेद्वारे करण्यात येईल असे देखील संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.डिसेंबर 2022 पर्यन्त अग्निपथ योजनेद्वारे 25000 सैनिकांची पहिली बॅच लष्करात भरती झालेली असेल.

 agneepath scheme details

केंद्र सरकारद्वारा 14 जुन 2022 ला अग्निपथ या योजनेची घोषणा करण्यात आली.त्यानंतर जागोजागी या योजने विरोधात निदर्शने करण्यात येत आहे.आज देशात भारत बंदची हाक देण्यात आली होती.हरियाणा,पंजाब,उत्तरप्रदेश अशा विविध ठिकाणी हिंसक निदर्शने कार्यात आली आहे.

 

 👇👇👇हे ही वाचा👇👇👇

अग्निपथ योजना संपूर्ण माहिती आणि मिळणारे लाभ कोणते?

कोचिंग इंस्टीट्यूट चालविणार्‍यांनी मुलांची माथी भडकवली ,असा स्पष्ट आरोप लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी केला.जर विद्यार्थ्यांना अग्निपथ योजनेद्वारे लष्करात सहभागी होण्याची इछ्या असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची निदर्शने तसेच जाळपोळ आणली नाही असे शपथपत्र सादर करावे लागणार आहे.सर्वांना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी झाल्याशिवाय कुणीही लष्करात भरती होऊ शकणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंदघ्यावी व कोणत्याही प्रकारची निदर्शने करू नये असे सांगण्यात आले आहे

 agneepath_scheme

 

एयर मार्शल एस के मार्शल म्हणाले की अग्निपथ योजनेद्वारे नोंदणी 24 जून रोजी सुरू होईल आणी 24 जुलैला ऑनलाइन परीक्षा असेल.सोमवारी याबाबत  सैन्याकडून अधिसूचना जारी करण्यात येईल.अग्निपथ योजनेद्वारे भरती रॅली ऑगस्ट,सप्टेंबर आणि आक्टोंबर मध्ये देशभरात सुरू होईल.या रॅली द्वारे जवळपास 25000 हजार कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया केली जाईल.अंगीपाठ योजनेची पहिली बॅच डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणाला सुरुवात करेल.त्यानंतर दुसरी बॅच ही 23 फेब्रुवारीपासून सहभागी होईल.40 हजार कर्मचार्‍यांच्या भरती प्रक्रियेसाठी देशभरात 83 भरती रॅली आजोजित करण्यात येईल.

Previous Post Next Post