एसटी महामंडळात लवकरच भरती.5000 जागांसाठी भरती करण्यात येणार | Recruitment of 5,000 drivers in ST Corporation

 


एसटी महामंडळातर्फे लवकरच 5000 कंत्राटी पद्धतीने जाहिरात करण्यात येणार आहे ,शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपा दरम्यान प्रवाशांचे खूपच हाल झाले होते .त्यामुळे एसटी महामंडळात कंत्राटी भरती करण्याचा विचार सरकार करीत होते. आणि येत्या काही दिवसात याबाबत सूचना अधिकृतपणे सरकारद्वारे काढण्यात येणार आहे.

 सैन्याची भरती अग्निपथ योजनेमधूनच ,अग्निपथ योजना मागे घेणार नाही - संरक्षण मंत्रालय agneepath scheme details मोठा परिणाम!!
इथे क्लिक करा


एसटी संपादरम्यान सरकारने कंत्राटी चालकांची भरती केली होती आणि त्यांच्या मार्फत मंडळाचे नुकसान भरून काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते.त्यामुळे आता त्याच पद्धतीने कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येणार आहे.

त्यात रायगड ,रत्नागिरी,सिंधदुर्ग,पालघर,लातूर,बीड,जालना,उसन्मानाबाद या विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे.या विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीनेलवकरच 5000 चालक भरती करण्यात येईल.

राज्यात 30 हजारांपेक्षा अधिक  चालक आहेत,त्यापैकि काही चालक हे सेवेत रुजू झाल्यानंतर 3 ते 5 वर्षांची सेवा केल्यानंतर आपआपल्या गावी किवा शहरात बदली करून घेतात . अशाने त्यांची जागा रिक्त राहते आणि तीथे चालकांची कमतरता भासते .अशावेळेस त्या जागी कंत्राटी चालकांची भरती करून ती पोकळी भरण्याचे काम सरकार करणार आहे.कमी मनुष्यबळामुळे एसटी बसेच ह्या आगारामध्येच उभ्या राहतात.परिणामी प्रवाशांचे हाल होतात

 

 

एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

 

 

पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़.


Previous Post Next Post