हरवलेले आधार कार्ड कसे काढावे ? How to get lost Aadhar card

 

आधार कार्ड हे आजच्या युगात एक महत्वाचे कार्ड बनले आहे.सरकारच्या कोणत्याही योजना ,बँकेतील कामे,बँकेतून पैसे काढणे अशा भरपूर ठिकाणी आधार कार्ड हे सक्तीचे बनले आहे. भरपूर असे लोक आहेत त्यांचे आधार कार्ड हे हरवलेले आहे.त्या लोकांना हरवलेले आधार कार्ड कसे काढता येईल त्याबाबदल आजच्या लेखात आपण माहिती घेणार आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कार्डधारकांसाठी विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवा प्रदान करते आणि कोणत्याही अद्यतनांची माहिती देखील प्रदान करते.

आधार (UIDAI)ने आधार रेप्रिंट ही सेवा बंद केलेली आहे.आता आधार रेप्रिंट ऐवजी आपण PVC Aadhaar Card ऑनलाइन घरपोहच घेऊ शकतो.


PVC Aadhaar Card म्हणजे काय ?

PVC Aadhaar Card हे एकप्रकारचे प्लॅस्टिक कार्ड जे की UIDAI द्वारा लोकांना मात्र 50 रु  मध्ये घरपोहच बोलवता येते. हे कार्ड पूर्णतः प्लॅस्टिक असल्यामुळे लवकर खराब होत नाही. हे कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाइन बोलवू शकतात.त्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक असला पाहिजे. UIDAI द्वारा PVC Aadhaar Card हे रजिस्टर पत्यावर स्पीड पोस्टने पाठवले जाईल. 

 

PVC Aadhaar Card ची फायदे

  • चांगली व स्पष्ट छपाई
  • अधिक टिकाऊ आणि वापरण्यास सोपे
  • QR code द्वारे ऑनलाइन सत्यापन
  • कार्डवर नक्षीदार आधार लोगो
  • UIDAI द्वारा मान्यताप्राप्त

PVC Aadhaar Card ऑनलाइन ऑर्डर कसे करावे ?
 


PVC Aadhaar Card ऑर्डर करण्यासाठी 

इथे क्लिक करा Click Here


  •  आधार नंबर Enter करा.
  •  चित्रात दिसणारा Captcha टाका
  • मोबाइल नंबर टाका (रजिस्टर नसला तरीही चालेल)
  • send otp बटणावर क्लिक करा.
  • मोबाइलवर आलेला OTP टाका
  • 50 रु Payment करा
  • UIDAI स्पीडपोस्ट द्वारे PVC Aadhaar Card पत्यावर पाठवले जाईल
Previous Post Next Post