ई – श्रम कार्ड नोंदणी कशी करावी ,ई -श्रम ऑनलाइन अर्ज ,कार्ड डाऊनलोड कसे करावे eshram पोर्टल नोंदणी :


 

भारत सरकारने असंघटित कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. जे कामगार या योजनेसाठी नोंदणी करतील त्यांना 12 अंकी (UAN)  युनिक नंबरचे ई-श्रम कार्ड दिले जाईल. जे त्यांना सामाजिक सुरक्षा तसेच केंद्रसरकारच्या योजनांमध्ये मदत करेल. कामगार त्यांचे आधार कार्ड, बँक तपशील आणि मोबाईल नंबर, पत्ता, तसेच एका वरासदारचा तपशील इत्यादी इतर महत्वाच्या महितींचा  वापर करून या योजनेसाठी सहज नोंदणी करू शकतो. कामगारांची नोंदणी सक्षम करण्यासाठी सरकार देशभरात जागृती मोहिमा आयोजित करीत आहे. श्रमिक नोंदणी बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी,ई –श्रम पोर्टलवर असलेली माहिती वाचा.

ई श्रम कार्ड नोंदणी 2021

कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशातील असंघटित कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या योजनेमध्ये 38 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे,स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, घरगुती कामगार, दुधवाला, स्थलांतरित कामगार, ट्रक चालक, मच्छीमार, कृषी कामगार आणि तत्सम इतर कामगार या योजनेसाठी आपली नोंदणी करू शकतील. योजनेसाठी नोंदणी मोफत आहे आणि कामगारांना कोणतेही नोंदणी शुल्क भरावे लागत नाही. जे उमेदवार नोंदणी करणार आहेत त्यांनी ई श्रम कार्ड सरकारमान्य केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.

ई-श्रम कार्ड स्थिती आणि फायदे:

  • श्रमिकांसाठी नोंदणी करणाऱ्या असंघटित कामगारांना एक वर्षासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे (PMSBY) अपघाती विमा सुरक्षा मिळेल.
  • नोंदणी केलेल्या व्यक्तींना रु.२ लाख रुपये विमा सुरक्षा भेटेल अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व यासाठी 2 लाख किंवा आंशिक अपंगत्वासाठी 1 लाख रुपये भेटतील.
  • या योजनेअंतर्गत 38 कोटीहून अधिक कामगारांची नोंदणी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
  • राज्य आणि केंद्र सरकार नैसर्गिक आपत्ती, महामारीच्या बाबतीत पात्र आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ई-श्रम कार्ड उपयुक्त ठरेल.
  • देशभरात या ई-श्रम कार्डला मान्यता आहे

ई श्रम कार्ड नोंदणी आणि डाउनलोड करण्यासाठी आवश्यक तपशील

  • आधार क्रमांक
  • आधार लिंक केलेला मोबाईल नंबर
  • बँक खात्याचा तपशील
  • वय
  • वन टाइम पासवर्ड (OTP)
  • घरातील एका व्यक्तीची माहिती वारसदार (Nominee) जोडण्यासाठी

 यां व्यक्तींना लाभ घेता येणार नाही

  • कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) चा लाभ घेणारे कर्मचारी
  • कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) चा लाभ घेणारे कर्मचारी

 

 

Previous Post Next Post