प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना काय आहे ? लाभार्थी कोण ? योजनेचा फायदा कसं घ्यावा ?कागदपत्रे कोणती लागतात? pm-kisan-yojana-maharashtra-2022

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने शेकर्‍यांसाठी   काढलेल्या महत्वाच्या योजनांपैकी एक योजना आहे. ह्या योजनेचा फायदा २ हेक्टर (४.९ एकर ) पेक्षा कमी असलेले लहान व अल्पभूधारक शेतकरी घेऊ शकतात.या योजनेमध्ये नोंदणी करणार्‍या शेकार्‍यांना भारत सरकार प्रतिवर्षी ६००० रु  आर्थिक सहाय्य प्रदान करते.३ हप्त्यामध्ये हे ६००० रु शेकर्‍यांच्या खात्यात जमा केले जातात.म्हणजेच प्रत्येक वर्षी ४ महिन्यांनी २००० रु  थेट लाभार्थीच्या बँक खात्यात सरकारकडून जमा केले जातात.  ही योजना भारत सरकारने १ डिसेंबर २०१८ पासून भारतात लागू केली ही योजना शेकर्‍यांसाठी वरदांनच ठरत आहे.

खाली सविस्तर माहिती दिली आहे आपण ती वाचावी म्हणजे तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही

या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे ?

याआधी ही योजना ज्या शेतकर्‍यांचे क्षेत्र हे २ हेक्टर (४.९ एकर )आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र होते, पण आता ज्या शेतकर्‍याच्या नावावर जमीन आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

१)पीएम किसान या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या केंद्रात (CSC) तुम्हाला जावे लागेल.

२)शेतकर्‍याला सर्व कागदपत्रे घेऊन त्या केंद्रात जावे लागेल.

३)सर्व कागदपत्रे त्या सरकारमान्य केंद्रात दिल्यानंतर तेथील संचालकाला पीम किसान योजनेसाठी अर्ज करायचा आहे असे सांगावे.

४) अर्जाचे शुल्क भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन केले जाईल. तुमचा फोरम पुढे पाठवण्यात येईल.

५)अर्ज पुर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे १० ते १५ मिनिटात तुमचा अर्ज भरण्यात येईल

६) महत्वाची सूचना अर्ज भरल्यानंतर प्रत्येक शेतकर्‍याने अर्जाची पावती घेणे विसरू नये.

प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित नवीन माहिती 2021-2022-

किसान सन्मान निधी योजनेबाबत नवीन माहिती अशी की, आता या योजनेत सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांचा समावेश होता. परंतु भारत सरकारने नियम व अटीमध्ये बादल केला आहे.9 ऑगस्ट 2021 पर्यंत शेतकर्‍यांना 2 हजार रुपयांचे 9 हप्ते पाठवण्यात आले आहेत.

प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. जमिनीचा ७/१२ उतारा
  4. राष्ट्रीयकृत बॅंकचे पासबूक
  5. जमिनीचा ८ अ  खाते उतारा
  6. मोबाइल नंबर

माहिती आवडली  असल्यास  शेअर करायला विसरू नका .

 

Previous Post Next Post