व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅन कार्ड आणि आधार कार्डच काय होते ?PAN card and Aadhar card after death of a person?

केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड हे सक्तीचे केले आहे ज्याचे कडे आधार कार्ड नाही त्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही.आधारकार्ड बरोबरच पॅन कार्ड देखील महत्वाचे आहे.आधार कार्ड किवा पॅन कार्ड यातील एक जारी कार्ड नसले तरी अनेक सरकारी कामांमध्ये अडचणी येतात. व्यक्ती जोपारुयांत जीवंत आहे तोपर्यंत हे दोन्ही कार्ड त्याला आपल्या जवळच ठेवावे लागतात. पण कधी असा विचार केला आहे का ?व्यक्ती मृत्युनंतर  ह्या कर्डांचे काय होते ? असा प्रश्न तुम्हाला कधी न कधी पडलेला असेलच. मग आज बघूया नेमके काय होते या कर्डांचे? आजच्या या लेखामध्ये हे आपण समजून घेऊ. माहिती संपूर्ण वाचा.


मृत्युनंतर  नंतर सरकारने दिलेल्या आधार कार्डांचे काय होते ?

भारत सरकारने सर्व नागरिकांना आधार कार्ड दिलेले आहे, आधार कार्ड ओळखपत्र हे एक प्रकारचे रहिवासी प्रमाणपत्र असून अतिशय महत्वाचे कार्ड आहे.आधार कार्डवरील नंबर हा एक प्रकारचा युनिक आयडी असतो.कारण हा नंबर कायमस्वरूपी वापरासाठी सरकारकडून दिला गेलेला असतो.हा नंबर इतर कुणालाही देता येत नाही. प्रत्येकाला आयुष्यात एक आधार नंबर असतो. त्यामुळे हा नंबर बंद करता येत नाही. व्यक्तीचा मृत्यू देखील झाला तरी हा नंबर डीअॅक्टिवेट करण्यासाठी कोणतीही सॉफ्टवेअर प्रणाली अस्तित्वात करण्यात आलेली आहे.


मृत्युनंतर  नंतर पॅनकार्डांचे काय होते ?

पॅन कार्ड हे तुमचा इन्कम टॅक्स वाचवते.तसेच बँकेतून मोठी रक्कम काढण्यासाठी हे कार्ड अतिशय महत्वाचे आहे.बँकेत खाते असल्यास,डीमॅट अकाऊंट असल्यास आणि तसेच आयकर रिटर्न्स  भरण्यासाठी पॅनकार्ड अतिशय महत्वाचे आहे.पॅन कार्डाचे सर्व अधिकार हे भारतीय आयकर विभागाकडे असतात . जर मृत व्यक्तीचे टॅक्स रिफंड बाकी असल्यास ते रिफंड संबंधित व्यक्तीच्या खात्यात आले की नाही हे तपासणे आवश्यक असते.या संबंधीत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास ते पॅन कार्ड आयकर विभागाकडे सोपवता येते. पॅन कार्ड बंद करण्यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीची सर्व बँक खाती केली आहेत की नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे.

pan card and Aadhar card after death of person?

Pancard कसे सरेंडर करायचे ?

मृत्यूनंतर पॅन कार्ड कसे सरेंडर कसे करायच? समजा मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तिला असेसिंग ऑफिसरला एक अर्ज द्यावा लागेल.ज्याच्या अधिकार क्षेत्रात पॅनकार्ड रजिस्टर आहे.अर्जामध्ये पॅन कार्ड सरेंडर करण्याचं कारण द्यावे लागेल. तसेच त्या मृत झालेल्या व्यक्तीची माहिती जसे की नाव,पॅन नंबर,जन्म दिनांक ( Date of Birth),आणि मृत्यू प्रमाणपत्र ह्या सर्वांची माहिती तुम्हाला त्यामध्ये जोडावी लागणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पॅन कार्ड सरेंडर करणे अनिवार्य नाही.कारण काही कारणासाठी किवा इतर कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता लागलीच तर ते तुम्ही सोबत ठेऊ शकतात.मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची सर्व बँक खाती बंद करून टाका.किवा वरासदारावर ट्रान्सफर करून घ्या.

Previous Post Next Post