पैसे भलत्याच खात्यात ट्रान्सफर झाले तर काय करावे ?money is transferred to the wrong account?

 

आजकालच्या युगात अनेक व्यवहार ऑनलाइनच केले जातात , कोणाला कितीही  पैसे पाठवायचे असतील तरी त्यासाठी नेट बँकिंग किवा Paytm ,G Pay यासारख्या अॅप्सचा वापर केला जातो . त्यामुळे पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार अगदी सोपे झाले आहेत . मात्र , त्याचबरोबर काही धोकेही निर्माण झाले आहेत . पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करत असताना दुसर्‍याच्याच खात्यावर गेले तर काय करायचे ? , असा प्रश्न आपल्यासमोर  उपस्थित होतो त्या संबंधी आजचा हा लेख आहे .

amazon pay ,Mobile Banking ,Paytm ,G Pay हे App  पैसे ट्रान्सफर करण्याचे  असे अनेक पर्याय आहे .

पैसे पाठवताना चूकन पैसे दुसर्‍याच खात्यात गेल्यावर काय करावे ?

)  नेट बँकिंगने किंवा या  अॅप्सच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करताना  ते चुकून दुसर्‍याच खात्यात गेले तर घाबरू नका.

२)  सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या बँकेला फोन करा . किंवा   ई - मेलद्वारे या  प्रकाराची माहिती द्या . किवा तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची भेट घ्यावी

४)  ज्या बँकेत पैसे ट्रान्सफर केले आहेत तीच बँक या अडचणीतून मार्ग काढू शकते . आपली चूक दोन्ही बँकांना कळवा .

५) तुम्ही ज्या व्यक्तिला पैसे पाठवले त्या ट्रॅडझॅक्शनची तारीख आणि वेळ , आपला अकाऊंट नंबर , ज्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले गेले आहेत त्या व्यक्तीचा अकाऊंट नंबर इत्यादी सर्व तपशील तुम्हाला संबंधित बँकांना द्यावे लागेल .


तक्रार दाखल केल्यानंतर काय होते ? काय करायला पाहिजे ?

१)अनेकदा ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झालेले असतात ती व्यक्ती पैसे परत देण्यास तयार असते . त्या त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर त्याच्याविरोधात कायदेशीर पद्धतीने तक्रार केली जाऊ शकते .

२)तुम्हाला बँकेकडे कायदेशीर पद्धतीने तक्रार करून संबंधिक खातेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे.

3) आरबीआयच्या (RBI) नियमानुसार चुकून एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर संबंधित बँकेला तातडीने हाचलाली करून ते पैसे योग्य खातेदाराच्या खात्यात जमा होतील , यासाठी प्रयत्न करावे लागतात . या प्रक्रियेला जास्तीत जास्त दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो .

या गोष्टी लक्षात कायम लक्षात ठेवायला हव्या

पैसे ट्रान्सफर करतेवेळी ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या खातेदारच्या बँक अकाऊंटची माहिती दोनदा चेक करून  घ्यावी . पैसे ट्रान्सफर करते वेळी कोणतीही घाई करू  नका. संपूर्ण माहिती चेक केल्यानंतरच पैसे ट्रान्सफर करा .म्हणजे तुमचे पैसे दुसर्‍याच्या खात्यात जाणार नाही.

 

Previous Post Next Post