महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना या सुरू करत असते.त्यापैकीच एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय.संजय गांधी निराधार योजना ही सामान्यतः अपंग,निराधार महिला, विधवा महिला,घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिलांसाठी ,शेतमजूर महिला, आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबातील महिला,तसेच वेश्या व्यासायातून मुक्त झालेल्या महिलांसाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.या योजनेमध्ये सहभागी होणार्या महिलांना दरमहा रु ५०० ते ७५० रु सरकारकडून मिळत असते.भरपूर महिला या योजनेपासून वंचित आहे. अधिकाधिक महिलांना या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात किवा या योजनेला अर्ज कसं करावा याबद्दल माहिती नाही. अर्ज कसा करावा ?कोणती कागदपत्रे लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखामद्धे घेणार आहोत.लेख संपूर्ण वाचा आणि अधिकाधिक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवा.
(Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra)
(Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra)
(Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra)
अ.क्र |
पात्रता | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
---|---|---|
१ |
वय |
वय वर्ष ६५ पेक्षा कमी असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहे. |
२ |
कुटुंबाचे उत्पन्न |
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.२१००० /- पर्यन्त असायला हवे. |
३ |
आर्थिक सहाय्य/निवृत्ती वेतन |
एक व्यक्ती निराधार कुटुंबाला रु ६०० /- प्रती महिना तर एकापेक्षा जास्त लाभार्थी निराधार महिला कुटुंबाला रु . ९०० /- पार्टी महिना वेतन राहील. |
४ |
पात्रता |
|
५ |
आवश्यक कागदपत्रे |
|
संजय गांधी निराधार अनुदान योजना अतिरिक्त अटी (Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra)
- आवेदन कर्ता १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभर्थ्याच्या कुटुंबाचे वर्षी उत्पन्न हे रु २१००० असणे आवशक.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपत्य संखेची अट राहणार नाही.
- व्यक्ति अपंग असेल तर ४०% अपंग असल्याचा दाखला सोबत जोडणे अनिवार्य.
- ज्या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे अशी महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र राहील.
- तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असलेली व्यक्ति या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
- फॉर्म मंजूर करायचं किवा नाही याचा संपूर्ण अधिकार शासनाकडे राहील या सर्वांनी नोंदघ्यावी.
- लाभर्थ्याची मुले २१ वर्ष होईपर्यंत किवा नोकरी मिळेपर्यंत शासनाकडून लाभ वितरित केला जातो.
- लाभर्थ्याला मुलीच असतील किवा त्यांचे वय हे २५ वर्ष झाले / मुलींचे लग्न जारी झाले तरी शासनाकडून त्या व्यक्तीस लाभ दिला जातो.
- बलात्कार झालेल्या महिला /वेश्या व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला/घटस्फोटीत महिला /आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे कुटुंब देखील या योजनेसाठी पात्र राहतील.
अ.क्र |
योजना |
सविस्तर |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र राज्य |
२ | योजनेचा उदेद्श | राज्यातील निराधार महिला,व्यक्तीना प्रतिमहा आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन देण्यासाठी |
३ | योजना कुणासाठी लागू आहे | ज्या व्यक्ती या योजनेच्या नियम व अटींची पूर्तता करीत असतील ते सर्व प्रवर्गातील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. |
४ | प्रतिमहा मिळणारे लाभ | कुटुंबात एक लाभार्थी असेल तर प्रतिमहा ६०० रु आणि कुटुंबात अधिक लाभार्थी असेल तर ९०० रु आर्थिक सहाय्य देण्यात येईल. |
५ | अर्ज करण्याचे कार्यालय |
|
Tags:
सरकारी योजना