लग्नानंतर PF खात्यात वारसाचे नाव कसे जोडावे , जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया EFPO e-nomination process

 लग्नानंतर PF खात्यात वारसाचे नाव कसे जोडावे , जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया e-nomination process



तुम्ही कर ऑफ धारक असाल तर तुम्हाला माहीतच असेल की PF खात्याला वरासाचे नाव जोडले बंधनकारक आहे .आणि ते आपल्या फायद्याचे देखील आहे.ज्या व्यक्तीचे Pf खाते असेल त्याबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्या PF खात्याशी संबंधित सर्व लाभ हे वरासदारास (Nominee) भेटतात.संबंधित खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्यावरती ESIC कडून असलेला विमा रुपये 7 लाख आणि इतर लाभही Nominee ला मिळतात .

जर तुमचे नवीन लग्न झालेले असेल आणि तुम्हाला Nominee अपडेट करने खूपच महत्वाचे आहे. Nominee जोडण्याची प्रक्रिया ही आता कागदोपत्री राहिलेली नसून तर ती ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे.आता तुम्ही घरबसल्या तुमच्या पीएफ खात्याला Nominee जोडू शकता किंवा अपडेट करू शकता.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑनलाईन nominee कसा जोडावा ? याच प्रश्नाचे उत्तर आज बघणार आहोत .चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस step by step.

Nominee Update कसे करावे ?

1) सर्वात प्रथम तुम्हाला EPFO च्या Unified Portal website वरती जावे लागेल ( EPFO Unified Website )


2) आता तुम्हाला तिथे लॉग इन (Log In ) चा पर्याय दिसेल .त्यामधे तुम्हाला तुमचा UAN Number आणि पासवर्ड टाका आणि खाली चौकटीत असलेला कॅप्चा ( Captcha Code ) टाकून साइन इन (Sign in ) वर क्लिक करा.



3) log in झाल्यावर समोर संपूर्ण dashboard दिसेल तसेच Member profile मध्ये  खातेधारकाची माहिती दिसेल.



4) वरती तुम्हाला मेन्यू बार ( Menu bar ) दिसेल त्या ऑप्शन पैकी तुम्हाला Manage हा पर्याय select करायचा आहे.

5) manage पर्यायावर Click केल्यावर तुम्हाला 5 पर्याय दिसेल Basic Details, Contact Details,KYC , E-Nomination आणि Mark Exit


6) पुढे तुम्हाला E-Nomination वरती click करावे लागेल.त्यानंतर प्रोफाइल ओपन होईल.आणि नवीन पेजवर तुम्हाला फॅमिली डीक्लरेशन ( Family Declaration ) या कॉलमवर Yes आणि No असे दोन पर्याय देण्यात येईल.


7) Yes पर्यायावर क्लिक करा आता समोर नवीन पेज ओपन होईल याठिकाणी तुम्हाला AddFamily Details हा पर्याय दिसेल .


8) या ठिकाणी तुम्हाला वारसदाराचे नाव , आधार नंबर, जन्म तारीख, लिंग ,तुमच्या सोबतच नाते, पत्ता, बँक खात्याची तपशील ( bank Details ) आणि एक फोटो इ माहिती  भरून  save या पर्यायावरती क्लिक करा.



9) याव्यतिरिक्त (EPS ) म्हणजेच पेन्शन साठीच्या पेज वरतीही तुम्हाला Nominee Add ( वारसदार) जोडता येतो. 


10) Provident Fund Scheme 1952 च्या नियमानुसार लग्नानंतर ईपीएफ (EPF) या मध्ये Nominee Update केल्यानंतर यापूर्वी जोडलेल्या Nominee ची माहिती आपोआप डिलिट करण्यात येते.


Nominee जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती  

1) खातेधारकाचा UAN Number आणि Password
2) वारसदाराचे आधारकार्ड
3) वारसदाराची जन्मतारीख
4) लिंग
5) नाव
6) नात्याचा तपशील
7) पत्ता (Address)
8) वारसाचे बँक पासबुक
9) वारसदाराचा फोटो

Previous Post Next Post