एक चूक ? बँकेतून पैसे गायब !!!!आजच करा हे काम

 

 गेल्या 4 ते 5 वर्षात भारतामध्ये डिजिटल व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.upi च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात डिजिटल व्यवहार पूर्ण होतात.भारत अगदी वेगाने कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे धावत आहे.हे व्यवहार आपल्याला सोपे जरी वाटत असले तरी जसे याचे फायदे आहेत   तसे तोटेही आहेत.ह्या व्यवहारांमध्ये हायटेक चोरांनी देखील आपले पाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे डिजिटल चोरांची तसेच गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे. खात्यावरून ऑनलाईन पद्धतीने पैसे गायब झाल्याच्या अनेक तक्रारी कानावर ऐकण्यात येत आहे. 

बाजारात अनेक असे ॲप आहेत जे डिजिटल पेमेंट ची सुविधा आपल्याला देतात. जसे की फोन पे (phone pe ) ,गूगल पे (Goggle Pay) , भीम यु पी आय (Bhim upi), Paytm असे अनेक ॲपच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार काही सेकंदात पूर्ण होतो.आणि त्यामधे चुका झाल्याचं तर तेवढ्या सेकंदात तुम्ही पण कंगाल होऊ शकतात.


जर तुम्हाला अशाच धोक्यापासून सावध राहायचं असेल तर तुम्हाला काही चुका करणे टाळावे लागेल.खाली दिलेल्या  उपायांचा वापर करून तुम्ही  तुमचे पैसे वाचवू शकता.चला तर मग बघुया कोणत्या चुका करु नये ते


1) कुणालाही UPI ॲड्रेस शेअर करू नका

अनेकदा काही लोक स्वतः चुका करतात आणि आपले पैसे गमावून बसतात.त्यामुळे तुमचा upi अकाऊंट चां अड्रेस सुरक्षित ठेवा तो कुणालाही शेअर करू नका.(Vertual Payment Adress) 


2)फोन ला स्क्रीन लॉक सेट करून ठेवा 

तुमचे बँक अकाउंट ज्या फोन मध्ये चालू आहे त्या फोनला तुम्ही स्क्रीन लॉक (screen lock) सेट करून ठेवा , screen lock ठेवताना कुणालाही तो कळता काम नये , किंवा त्याला अंदाज बांधता आला नाही पाहिजे . स्क्रीन लॉक साठी मजबूत pin ठेवा.लॉक ठेवत असताना  तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, जन्म वर्ष असे पासवर्ड ठेऊ नका.तुमचा पासवर्ड इतर कुणासोबत शेअर करू नका शंका आल्यास तत्काळ पासवर्ड change करा.

3) unverified Link आणि कॉल पासून सावध रहा

आजकाल खूप unwanted messages येत आहे.जसे की तुमच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे जमा झाले ही लिंक ओपन करा अशाप्रकारचे , तर मित्रांनो अशा फसव्या संदेशापासून सावध रहा. अनेक फसवे मेसेज हे बँकच्या नावासारखे दिसतात . त्यामधे लिंक दिलेल्या असतात अशा लिंक ओपन करून बघू नका.लिंक जर तुम्ही क्लिक केले तर तुमचे बँक अकाउंट मधून चोरी केली जाईल . तसेच येणाऱ्या फेक कॉल्स ला काहीही माहिती जसे की ATM Card नंबर, ATM पिन शेअर करू नका.मी अमुक बँकेतून बोलतोय,kyc अपडेट करा, तुमचे खाते अपडेट नाही अशा थापा मारून तुमच्या बँक खात्यातून रक्कम वळविण्यात येत.


4) पेमेंट साठी एकापेक्षा जास्त ॲप्स चां वापर करू नका

अनेक वेळेस पेमेंट केल्यावर कॅशबॅक भेटेल, reward मिळतील यासाठी आपण अनेक ॲप च वापरत असतो तर मित्रानो हे करणे टाळा, त्यामुळे tusted ॲप वापरा.

5) ॲप प्रत्येकवेळी अपडेट करीत रहा.

तुम्ही ज्या upi ॲप्स चां वापर करत असाल त्या ॲप ला अपडेट आले की लगेच अपडेट करीत चला.अपडेट केल्याने तुम्हाला पेमेंट मध्ये  येणाऱ्या अडचणीमध्ये सुधारणा केलेली असते. त्यामुळे प्रत्येकवेळी अपडेट करीत रहा.अपडेट केल्याने तुमचे बँक अकाउंट देखील सुरक्षित राहते .

Previous Post Next Post