आधारकार्ड काढा सोप्या पद्धतीने .नवीन आधारकार्ड कसे काढावे ? कागदपत्रे कोणती ?
मित्रांनो
आधार कार्ड हे काळाची गरज बनले आहे.आधार कार्ड शिवाय आता कोणतेही काम होत नाही ,प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हे लागतेच.सरकारी कामे, शासकीय संस्था, पेन्शन, मतदान ,सरकारी योजना या सारख्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्वाचे आहेत .तरीही अजून भरपूर लोकांकडे आधार कार्ड नाही तसेच काहींचे आधार कार्ड हरवले आहे , तर काहींच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये भरुपुर चुका झालेल्या आहेत . काहींची नावात चूक तर काहींची ॲड्रेस मध्ये आणि काहींची जन्मतारखेत चुका आहे.ह्या सर्व चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला जवळच्या आधार केंद्रामध्ये जावे लागते .तिथं गेल्यानंतर आधार अपडेटचा फॉर्म भरावा लागतो आणि कागदपत्रे जोडावी लागतात. पण आपल्याला त्या चुका दुरुस्त करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे माहीत नसते . आज बघुया अधारकार्डमधील चूकांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.खाली सर्व कागदपत्रे दिलेली आहे . पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल कोणती कागदपत्रे लागतात.
लहान मुलांचे वय वर्ष 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना कोणती कागदपत्रे लागतात?
- आईचे किंवा वडिलांचे आधारकार्ड लागेल
- ओरिजनल जन्म दाखल्याची नोंद
- तसेच त्या लहान मुलांचे आई किवा वडील दोन्हीपैकी एकाने तरी सोबत असावे
5 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
1)UIDAI ने ठरवून दिलेल्या स्टँडर्ड फॉरमॅट मध्ये शाळेचे मुख्याध्यापक,सरपंच, तहसीलदार, नगराध्यक्ष, गट अ अधिकारी, गट ब अधिकारी,आमदार, खासदार, वॉर्डन यापैकी कुणाचे तरी त्या स्टँडर्ड फॉरमॅट वरती सही वा शिक्के पाहिजे.
ओळखीच्या पुरव्यात कोणती कागदपत्रे देऊ शकतो?
- पासपोर्ट
- पॅनकार्ड
- रेशन कार्ड फोटो सहित
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स ( गाडी चालवण्याचा परवाना)
- बँकेचे पासबुक
जन्म तारीख टाकण्यासाठी / अपडेट करण्यासाठी लागणारी डॉक्कुमेंट ?
- बर्थ सर्टिफिकेट ( जन्म दाखला)
- पासपोर्ट
- पॅनकार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स (गाडी चालवण्याचा परवाना)
- SSC सर्टिफिकेट ( दहावीचे प्रमाणपत्र)
- शाळेचा दाखला किंवा बोनाफाइड
पत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती कागदपत्रे दिली जाऊ शकतात?
- पासपोर्ट
- बँकेचे स्टेटमेंट
- बँकेचे पासबुक
- रेशनकार्ड
- पोस्टात खाते असेल तर अकाउंट स्टेटमेंट
- मतदान कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- लाईट बिल
- पाण्याचे बिल
ज्या लोकांकडे काहीही कागदपत्रे नाही त्यांनी काय करावे?
ज्या लोकांकडे कोणतेही कागदपत्रे नाही असेल लोक सुद्धा आधारकार्ड मध्ये सुधारणा करु शकतात.कारण त्यांची संपूर्ण माहिती ही आधार केंद्रात असते , त्यामुळे त्यांनी घाबरून जायचे काम नाही.
आपल्या जवळील आधार केंद्र शोधा -. Click Here
आपल्या जवळील केंद्रावर अपॉइंटमेंट घेण्यासाठी - Click Here
आधार कार्डचे स्टेटस चेक करा - Click Here
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी - click Here
आधार केंद्र चालकाची तक्रार करण्यासाठी - Click Here