UPI म्हणजे काय आहे ? Upi चे फायदे आणि तोटे काय आहेत ? Upi चा full form काय आहे ?

 

UPI म्हणजे काय आहे ? Upi चे फायदे आणि तोटे काय आहेत ? Upi चा full form काय आहे ?

 


नमस्कार मित्रानो,

आज आपण या लेखामध्ये UPI म्हणजे काय ? आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत. हे बघणार आहोत.तसेच upi कसे काम करते ,upi वापरावे कसे याबद्दल सविस्तर माहिती आज पाहूया .माहिती संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल.

 

Upi म्हणजे काय आहे ?

Upi ही real time Payment system आहे. Upi च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून काही सेकांदांमध्ये दुसऱ्याच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे जमा करू शकता.upi platform IMPS ( Immediate Payment Service) वरती आधारित आहे. Upi आपल्याला लवकरात लवकर रुपये पाठविण्यासाठी मदत करते .काही मिनिटात आपण रुपये पाठू शकतो.आणि ते अधिक सुरक्षित असते .यामधे अकाऊंट नंबर चुकण्याची किंवा चुकून दुसऱ्याच्या खात्यात रुपये जमा होण्याची जोखीम नसते

 

Upi ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व National Payments Carporation of India मार्फत चालू केलेली सर्व्हिस आहे.ही कार्यप्रणाली financial transactions करण्याची सुविधा प्रदान करते.

 

Upi च्या माध्यमातून बँक अकाऊंट माहिती नसला तरी आपण दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या इतर बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकतो.त्यासाठी वापरकर्त्याला फक्त एक UPI Address (Virtual Payment Address) ची आवश्यकता असते.upi ची सर्व्हिस चालू झाल्यापासून cashless Payment अधिक सोपे झाले आहे.भरपूर लोक हे आता cashless Payment वर अधिक भर देत आहे. Upi च्या माध्यमातून केलेले पेमेंट अधिक सोपे व सुरक्षित आहे.तुम्हाला माहीतच असेल की जेव्हा तुम्ही बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता त्यावेळी बँक खाते क्रमांक, बँक IFSC Code द्यावा लागत असे .भरपूर वेळेस तो चुकतो.पण जेव्हापासून UPI आले आहे तेव्हापासून payment करणे किंवा खात्यात पैसे जमा करने अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे.NPCI (National Payments Carporation of India) ने 16 एप्रिल 2016 ला UPI Payment सर्व्हिस लाँच केली होती.

 

UPI चा फुलफॉर्म काय आहे?

UPI चा  "Unified Payment Interface" आहे .

UPI - Unified Payment Interface

 

VPA म्हणजे काय आहे ?

VPA ला virtual Payment Address असे म्हणतात. UPI च्या माध्यमातून पैसे पाठविण्यासाठी वापरकर्त्याला एका विशिष्ट VPA ची गरज असते .VPA एक विशिष्ट प्रकारचा आयडी असतो जो बँक आणि बँक अकाउंट ला लिंक असतो. एखादा व्यक्ती जर तुम्हाला पैसे पाठवीत असेल तर तो तुमच्या VPA च्या सहाय्याने पाठवतो.VPA ला बँक अकाऊंट लिंक असल्यामुळे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की VPA आणि UPI वेगवेगळे आहेत का ? तर मित्रानो VPA आणि UPI ID हे दोन्ही एकच आहेत. VPA लाच उपी ID असे म्हणतात.

 

UPI ( यू पी आय) फायदे कोणते ?

 

  • Real time money Transfer systems तत्काळ पैसे पाठविण्याची सिविषण

 

  • पैसे पाठविण्यासाठी प्रत्येक वेळेस अकाऊंट नंबरची आणि अकाऊंट होल्डरची गरज नाही

 

  • Virtual Payment Address च्या माध्यमातुन लवकरात लवकर पैसे पाठविण्याची सुविधा प्रदान करते

 

  • सर्वात सुरक्षित आणि जलद गतीने पैसे पाठविण्याची सुविधा

 

  • एकाच upi id च्या माध्यमातून अनेक वेळेस पैसे पाठवता येतात.आणि सर्व बँकामधे transaction करता येतात.

 

  • वापरण्यास सोपे

 

  • दिवसातील 24×7, आणि वर्षातील 365 दिवस चालू असते. कधीही transaction करू शकता.

 

  • सरकारमार्फत UPI सर्व्हिस लाँच केली गेलेली आहे.

 

  • Upi च्या माध्यमातून बँकेत पैसे पाठवणे, मोबाईल रिचार्ज , लाईट बील ,पाणी बील अशा प्रकारची सर्व कामे तुम्ही करू शकतात.

 

  • तसेच UPI मध्ये असलेल्या QR Code च्या माध्यमातून सुरक्षित पेमेंट तुम्ही करू शकतात.

 

  • तुम्ही केलेल्या सर्व लेन देन ची माहिती काढू शकता (financial transactions history)

 

  • बँक खात्यातील बॅलन्स चेक करू शकता.

 

UPI चे तोटे ?

  • एखाद्या गोष्टीचे फायदे असतील तर त्याचे तोटे देखील असतात.तसेच upi चे देखील आहे .त्यामुळे तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे .तर बघुया काय तोटे आहेत ते .

 

  • UPI च्या माध्यमातुन पेमेंट करायचे असेल तर वापरकर्त्याकडे जो मोबाईल नंबर आहे तो बँक खात्याशी लिंक असायला हवा.जर नसेल तर तुम्हाला UPI चा वापर करता येणार नाही.

 

  • बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर वापरकर्त्याच्या संबंधित मोबाईल मध्ये असायला हवा.

 

 

  • VPA (virtual Payment Address) नसेल तर तुम्ही UPI चा वापर करू शकणार नाही.तुमच्याकडे upi id असायला हवा तरच तुम्ही transaction करू शकतात.

 

  • UPI च्या माध्यमातून पेमेंट करतेवेळी काही वेळेस इंटरनेट काम करीत नाही त्यावेळेस प्रोसेस पूर्ण होत नाही म्हणून पैसे पाठविण्यास अडथळा येतो.

 

  • UPI ला एक पिन नंबर असतो कर तो पिन नंबर दुसऱ्या व्यक्तीला समजला तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

 

UPI महत्वाचे का आहे ?

 

  • UPI च्या माध्यमातुन real time Payment करता येते.

 

  • UPI वापरण्यास सोपे आणि सुरक्षित आहे.
  • बाजारात खरेदी करते वेळी कॅश पासून मुक्तता.QR Code च्या माध्यमातून लवकर पैसे पाठवता येतात.

 

  • UPI ID द्वारे पैशाची देवाघेवाण करता येते.

 

  • घरी बसून सुद्धा तुम्ही कुणालाही पैसे पाठू शकतात.

 

UPI कसे वापरावे ?

  • UPI वापरण्यासाठी किमान तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवा.एक बँकेत खाते आणि त्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

 

  • एक स्मार्टफोन त्याला इंटरनेट आहे (Smartphone)

 

  • एक बँक अकाउंट (Bank account)

 

  • बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर ( linked Mobile Numbar)

 

  • Outgoing Messages service ॲक्टिवेट असायला हवी.

 

  • आणि एक UPI APP

 

खालील स्टेप फॉलो करा.आणि UPI वापरायला शिका.

 

  • तुम्हाला आवडेल ते UPI APP प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर मधून डाऊनलोड करा.

 

  • डाऊनलोड झाल्यानंतर ते ॲप ओपन करा.

 

  • जो मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक आहे तो मोबाईल नंबर Enter करावा.

 

  • ॲप मध्ये येणाऱ्या सूचनांचे पालन करा.

 

  • त्यानंतर तुमचा virtual ID तयार होईल.

 

  • आता तुमचे UPI ID पेमेंट करण्यासाठी तयार आहे.

 

TOP Best UPI App List

  • BHIM UPI App
  • Google Pay
  • Phone Pe
  • Paytm
  • Amazon Pay
  • ICICI iMobie Pay
  • Baroda mPay
  • SBI pay
  • PNB Pay
  • HDFC BANK
  • IPPB Bank
  • Axis Pay
  • Mi Pay
  • Airtel Thanks
  • Samsung Pay
  • MobiKwik

 

तर मित्रांनो ,

आता तुम्ही समजला असाल की upi म्हणजे काय आणि ते कसे काम करते.

 

तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता . Article आवडले असल्यास तुमच्या मित्रांना Share करा.

 

Previous Post Next Post