Pm kisan mandatory KYC update पीएम किसान KYC करने अनिवार्य

 


Pm kisan mandatory KYC update-
शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केन्द्रसरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे PM-Kisan (पीएम - किसान सन्मान निधी योजना). ही केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांपैकी सर्वात यशस्वी योजना आहे . आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे .

या योजेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना दर 4 महिन्यांनी सरकार 2000 रुपये देते. हे सर्व रुपये शेतकऱ्याचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून ट्रान्स्फर केले जातात.

आता पर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 9 हप्त्यांचे रूपये अकाउंट मध्ये जमा केलेले आहे .आणि PM-KISAN योजनेचा 10 वा हप्ता 15 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये सरकारकडून संबंधित शेतकऱ्याचा बँक अकाऊंट मध्ये जमा करण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी PM-Kisan चे फॉर्म भरले होते आणि त्याचा फायदा ते घेत आहे.त्यांना आधार e-KYC करणे अनिवार्य केले आहे.जर तुम्ही 10 व्या हप्त्याचे वाट पाहत असाल तर तुम्हाला e-KYC करणे गरजेचे आहे.जे शेतकरी e-KYC करणारा नाहीत त्यांना PM-Kisan च्या 10 व्या हप्त्यात लाभ मिळणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

PM-Kisan या योजनेत होणाऱ्या फ्रॉडला आळा घालण्यासाठी सरकारने या योजनेत हा महत्वपूर्ण असा बदल केला आहे . ज्यांना अजून या बदलाबद्दल माहिती नाही त्यांना माहिती द्या.

सरकारने PM-Kisan अंतर्गत केलेल्या सर्व शेजाऱ्यांना e KYC करने बंधनकारक केले आहे.त्याची kyc करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटर मध्ये जावे लागेल.तसेच तुम्ही स्वतः देखील आधार otp नुसार e-KYC करू शकतात पण ह्या ऑप्शन्स साठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.


अशी करा PM-KISAN Yojana Process
1)यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PM-Kisan पोर्टलवर जावे लागेल इथे क्लिक करा
2) उजव्या बाजूला Farmer Corner तुम्हाला ऑप्शन दिसेल .सर्वात वर तुम्हाला e-KYC ऑप्शन दिलेले त्यावर क्लिक करा.
3) आता त्यामधे तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा टाका इमेज मध्ये दाखवल्याप्रमाने आणि search बटणावर क्लिक करा.
4) नंतर आपला मोबाईल नंबर टाकून otp टाका आणि otp आल्यावर संबंधित चौकटीत भरा.
5) त्यानंतर तुमची e-KYC पूर्ण झालेली असेल

Previous Post Next Post