Covid19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकाला सरकारकडून 50000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार असून.त्यासाठी सरकारकडून ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्यास सुरूवात झाली आहे.त्यासाठी सरकारकडून कमीत कमी कागदपत्रे ऑनलाईन अर्जासाठी ठेवण्यात आलेली आहे.
त्यासाठी सरकारकडून स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे.तुमच्याकडे कमीत कमी डॉक्कुमेंट असले तरी तुम्ही अर्ज दाखल करू शकतात.त्यासाठी तुम्हाला त्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
(Close relatives of people who have died covid19)
कारोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार 50000 रुपये आजच करा अर्ज
महाराष्ट्र सरकारने राज्यात ज्या व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 50000 रू देण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे.ही सर्व मदत राज्य आपत्ती निधी म्हणून करण्यात येईल.
सरकारने 30/06/2021 रोजी निर्णय जाहीर केला होता.त्या निर्णयाचे पालन म्हणून आता राज्यातून अर्ज मागविण्यात येत आहे . त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे देखील सुरू झालेले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ह्या आर्थिक सहाय्याचा संपूर्ण रक्कम ही लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून वितरीत करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
याआधीच हा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला होता , आता त्या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात येत आहे.
योजनेबद्दल माहिती Maha Covid19 Scheme 2021
1) योजनेचे नाव - maha covid19 relief योजना 2021
2) योजनेचे आयोजक - महाराष्ट्र शासन व केंद्र शासन
3) योजनेचे लाभार्थी - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईक
4) मदत निधी - 50000 रू मात्र
5) अर्जप्रक्रिया - ऑनलाईन
6) अर्ज कुठे करावा - इथे क्लिक करा
Doccument of Maha Covid19 relief yojana
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड
2) जन्म मृत्यू नोंदणी अधिनयम 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्य प्रमाणपत्र / दाखला
3)मृत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत
4)अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत
5) मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
6) RT-PCR रिपोर्ट किंवा CT -Scan रिपोर्ट किंवा इतर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा ?
1) या वेबसाईट वर जा Click Here
2) अर्जदाराने मोबाईल नंबर टाकावा आणि otp वरती क्लिक करावे.समोर Online ragistration Form ओपन होईल
3) अर्जदाराने स्वतःचे सर्व तपशील टाकावे आणि संबंधित रकान्यात आधारकार्ड नंबर टाकावा
4) आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यक
5) अर्जदाराने स्वतःचे बँक डिटेल्स टाकावे.
6) पुढे गेल्यानंतर जी व्यक्ती मृत झाली त्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील व्यवस्थित भरावा.
7) मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र दाखला अपलोड करावा
अर्ज करताना खालील सूचनांचे पालन करावे.
1) अर्ज व्यवस्थितरीत्या भरावा.
2) कोणतीही माहिती चुकीची भरू नका.
3) ज्या बँक अकाउंट आधारकार्ड लिंक आहे तेच बँक अकाउंटची डिटेल्स भरावी.
4) जे आधारकार्ड लिंक असलेले बँक अकाउंट देणार नाही त्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार नाही
5) सर्वांनी मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे ( अनिवार्य )