असे काढा ऑनलाइन मतदान कार्ड ,अर्ज,कागदपत्रे

How to Apply online Votor ID Card मतदान कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल सर्व माहिती आज आपल्याला बघायची आहे. तर मित्रांनो आज तुम्हाला या पोस्टमध्ये समजेल की मतदान कार्ड तयार करणे किती सोपे आहे .सर्व माहिती आज आपल्याला बघायची आहे.तसेच मतदान कार्डचे फायदे काय आहे ? मतदान कार्डचा उपयोग कुठे होतो? इ. आता सर्व कामे ही ऑनलाईन झाली आहेत. त्यामुळे तुम्ही घरी बसून मतदान कार्ड ऑनलाईन काढू शकता.सर्व माहिती आपण क्रमाक्रमाने समजून घेऊया .


मतदान कार्ड म्हणजे काय आहे ? (What is votor id ) 
 
voter id card download with photo  मतदान कार्ड काय असते हे भारतातील सर्व नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे.मतदान कार्ड हे भारतातील नागरिकांना दिलेले एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे.ते भारतीय निवडणूक आयोग ( Election Commission Of India ) मार्फत 18 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रत्येक नागरिकाला दिले जाते.मतदान कार्ड मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे लागते.18 वर्षांवरील प्रत्येक नागरिक मतदान कार्डासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. भारतातील निवडणुकीच्या वेळेस या कार्डचा उपयोग मतदान करण्यासाठी होतो .ज्या व्यक्तीकडे हे कार्ड असते तोच व्यक्ती मतदान करण्यास पात्र असतो. हे फक्त मतदान करण्यासाठीच नव्हे तर इतर गोष्टींसाठी देखील उपयुक्त आहे .जसे की या कार्डाच्या माध्यमातून व्यक्तीची ओळख (Identity Proof) करण्यास मदत होते .ओळखपत्र म्हणून याचा उपयोग केला जातो.तसेच रहिवासी पुरावा म्हणून देखील याचा वापर केला जातो.तसेच भरपूर अशा सरकारी योजना आहे तिथे मतदान कार्ड हे महत्वाचे असते .मतदान कार्डाची कॉपी आपल्याला द्यावीच लागते.भारतात दर 5 वर्षांनी निवडणुका होतात . अशात जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. 
 
मतदान कार्ड कोण तयार करते ?(Who issue Votor ID Card )
 
voter id card online application form in marathi भारतामध्ये मतदान कार्ड हे भारतीय निवडणूक आयोगामार्फत ( ECI - Election Commission Of India) तयार करण्यात येते. निवडणुकीच्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण आहे असे व्यक्ती या कर्डासाठी आवेदन करू शकतात.या कार्डचा उपयोग निवडणुकीच्या वेळेस मतदान यादी तयार करण्यासाठी केला जातो .आणि त्या मतदान यादीच्या  आधारे लोक आपल्या पसंदीच्या उमेदवाराला मतदान करतात.
प्रत्येक निवडणुकीत एकच वेळेस मतदान करता येते.जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही.त्यामुळे सरकार आणि भारतीय निवडणूक आयोग अधिकाधिक व्यक्तींचे मतदान कार्ड काढण्यावर भर देत आहे.त्यासाठी सरकार व निवडणूक आयोगामार्फत ऑनलाईन संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं आहे.त्यामार्फत तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.व कार्ड प्राप्त करू शकतात.

 

मतदान कार्ड बनविण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ?( Doccument for Votor ID Card) 
 
ओळख आणि वयाचा पुरावा ( Identity /Age Proof )
  1. आधार कार्ड (Adhaar Card)
  2.  ड्रायव्हिंग लायसेन्स (Driving Licence)
  3. पासपोर्ट (पासपोर्ट)
  4. पॅनकार्ड (Pancard)
  5. जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
  6. दहावीचे प्रमाणपत्र (Matriculation Certificate)
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport size Photograph) 

पत्याचा पुरावा ( Address Proof) 

  1. आधार कार्ड (Adhaar Card)
  2. ड्रायव्हिंग लायसेन्स (Driving Licence)
  3. पासपोर्ट (पासपोर्ट)
  4. रेशनकार्ड (Ration Card)
  5. बँक पासबुक (Bank Passbook)
  6. पाण्याचे बील/गॅस पुस्तक/लाईट बील ( Water/Gas Connection/Electricity Bill)
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport size Photograph) 

मतदान कार्ड का महत्वाचे आहे ( Importance of Votor ID Card)

  1. हे भारतात राहणाऱ्या नागरिकाचे एक ओळखपत्र आहे.
  2. मतदान कार्ड पत्याचा पुरावा म्हणून महत्वाचे आहे.
  3. मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही.
  4. मतदान कार्ड हे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असतो.
  5. हे कार्ड आपल्याला मतदान करण्याचा अधिकार देते
 
मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढावे ( How to Apply Votor ID Card online)

voter id card online application form in marathi  मतदान कार्ड आपल्याला दोन प्रकारे काढता येते.पहिला म्हणजे ऑनलाईन आणि दुसऱ्याप्रकारे म्हणजे ऑफलाईन पहिल्यांदा आपण ऑफलाईन कसे काढता येते ते बघुया  

 

हे देखील वाचा »  ग्रामपंचायत मध्ये किती निधी,योजना,कामे पाहा मोबाईलवर

1) ऑफलाईन मतदान कार्ड (Votor card) कसे काढावे ?

  1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वरती दिलेले सर्व कागदपत्रे जमा करून स्वतः जवळ ठेवा.
  2.  आता जमा केलेली सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या वॉर्ड साठी असलेले सरांना तुम्हाला भेटावे लागेल.
  3. ते सर तुम्हाला मतदान कार्डचा (Votor ID Application) चा फॉर्म देतील .त्या फॉर्म मध्ये सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल .जसे की नाव,लिंग,पत्ता , निवडणुकीचे क्षेत्र आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो त्या फॉर्म वर चीटकवा लागेल.
  4. हे सर्व केल्यानंतर मतदान फॉर्मला सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला तुमच्या वॉर्ड अध्यक्षाला तो फॉर्म द्यावा लागेल.
  5.  त्यानंतर वॉर्ड अध्यक्षामार्फत तो फॉर्म निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल.
  6. काही दिवसांनंतर तुमचे कार्ड तयार होईल आणि ते तुम्हाला राहत्या पत्यावर पोहच केले जाईल.

2) ऑनलाईन मतदान कार्ड कसे काढावे ? (How to apply online Votor ID Card) 
 
1) . ऑनलाईन मतदान काढण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय मतदाता पोर्टल ( National Votor service Portel) nvsp.in या वेबसाईट वर जावे लागेल. 

2) . त्यानंतर समोर तुम्हाला Login/register बटणावर क्लिक करा

 


3) . त्यांनतर तुम्हाला Register as new user वर क्लिक करावे लागेल

 


4) . तुमच्या समोर रजिस्टर फॉर्म ओपन होईल.इथे तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. 

5) . रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.

6) . युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

7) . आता समोर तुम्हाला काही पर्याय दिसतील. त्यापैकी दिसणारा पहिला पर्याय New Votor Ragistration वर क्लिक करा.

 

8) . त्यांनतर Yes ,I am applying for the first time या पर्यायावर क्लिक करा.

9) . पुढे गेल्यावर Yes I'm an Indian citizen वर क्लिक करा.voter id card online application form in marathi


10) . इथे तुम्हाला तुमची जन्म तारीख , राज्य आणि जिल्हा याबद्दल माहिती भरायची आहे.जन्म तारखेचा पुरावा म्हणून फोटोत दिसणाऱ्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र अपलोड करायचा आहे.

हे देखील वाचा »  ITR फाईल करताना ह्या चुका टाळा नाहीतर होईल मोठे नुकसान

11) . प्रोसेस पुढे घ्या ,इथे तुम्हाला तुमचे नाव, लिंग आणि फोटो अपलोड करायचा आहे ,
12) . फोटो अपलोड केल्यानंतर पुढे या ,इथे तुम्हाला तुमच्या घरातील एका व्यक्तीच्या मतदान कार्डाविषयी माहिती भरायची आहे ,जसे की घरातील व्यक्तीचा मतदान कार्ड क्रमांक, नाव आणि ज्या व्यक्तीचे मतदान कार्ड नंबर देत आहात त्याच्याशी तुमचे नाते काय आहे.  अशी सर्व माहिती  तिथे भरा.

 

हे देखील वाचा »  श्रम कार्ड असंघटित कामगारांना मिळणार 3000 रु महिना

13) . जवळ पास आता शेवटच्या प्रोसेस पर्यंत आपण पोहचलो आहे.आता पुढे तुम्हाला तुमचा सर्व अड्रेस भरायचा आहे .जसे की घर क्रमांक, घराचा परिसर, पोस्ट ऑफिस, गावाचे नाव  आणि तुमचा परिसर कोणत्या विभागात येतो म्हणजे ग्रामीण का शहरी ते निवडा.आणि तुमच्या गावाचा किंवा शहराचा पिंडकोड टाकावा.

पुढे गेल्यानंतर एक स्वयं घोषणापत्र (self Declaration) असेल ते सबमिट करायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही मतदान कार्ड साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता .

voter id card online application form in marathi  ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज प्राप्त होईल त्यामध्ये तुमचा मतदान कार्ड फॉर्म नंबर असेल त्याद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता 


मतदान कार्ड फॉर्म कसा ट्रॅक करावा?

Website वर गेल्यानंतर तुम्हाला तिथे Track Application Status असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.दिलेल्या बॉक्स मध्ये तुम्हाला मिळायला application nambar टाका आणि track status वर क्लिक करा.

समोर तुम्हाला तुमचा फॉर्म ची स्थिती दिलेलं.

अशाप्रकारे तुम्ही ऑनलाइन मतदान कार्ड काढू शकतात.

माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका. काही शंका असल्यास खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद.

Previous Post Next Post