आधार कार्डाच्या माहितीमध्ये कितीवेळा बदल करता येतो ?जाणून घ्या how many Changes can be made in Aadhar card
मित्रानो भरपूर जणांच्या अधारकार्डच्या माहिती मध्ये चुका झालेल्या आहे . ज्या वेळी प्रत्येक गावामधे आधारकार्ड चे कॅम्प चालू होते त्यावेळी खूप साऱ्या लोकांच्या माहितीमध्ये चुका झालेल्या आहेत. आणि त्या कशा दुरुस्त करायच्या ? चूक किती वेळा दुरुस्त केली जाऊ शकते ? जसे की नाव, जन्मतारीख ,पत्ता किती वेळा change करता येतो ? याबद्दल माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत. संपूर्ण वाचा
आधार कार्ड दुरुस्ती नवीन नियमानुसार
Name ( नाव )
तर मित्रानो नावात पूर्ण आयुष्य 2 वेळा बदल करता येईल. त्यामुळे आधार करेक्शन करताना ही माहिती तुम्हाला असायला हवी.
Date of Birth ( जन्म तारीख) - जन्मतारीखेमध्ये 1 एकदाच बदल करता येईल
Adress ( पत्ता ) - अड्रेसमध्ये बदल करण्यासाठी कोणतीही मर्यादा अजूनपर्यंत सरकारने ठरवलेली नाही. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा पत्त्यामध्ये बदल करू शकता
लिंग- केवळ एकदाच
Mobile Number ( मोबाईल नंबर ) - मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही .कितीही वेळेस तुम्ही अपडेट करू शकता.
Picture (फोटो) - जर तुमचा फोटो क्लिअर नसेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे फोटो बदलायचा असेल तर तो तुम्हाला कितीही वेळा बदलता येऊ शकतो.
तर मित्रांनो , आता समजल असेल तुम्हाला की आधारकार्ड मध्ये करेक्शन करायचं असल्यास किती वेळा ते करता येते. मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे . माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका.